Saturday, July 25, 2015

मॉन्सून जोरदारपणे सक्रीय

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात
मॉन्सून जोरदारपणे सक्रीय

कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी, खानदेशात सर्वदूर पाऊस

पुणे (प्रतिनिधी) - मध्य प्रदेशवरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाने शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) जोरदार पावसासह सक्रीय झाले. मराठवाडा वगळता उर्वरीत तीनही विभागात सर्वदूर पाऊस पडतानाच तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. पुढील चार दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची, मराठवाड्यात पाऊस वाढण्याची तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात कमी होण्याची चिन्हे आहेत.

हवामान खात्याने बुधवारपर्यंत (ता.29) कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकणात सर्वदूर, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेश व लगतच्या राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने राज्यात वाढलेला पाऊस आणखी काही काळ सुरु राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे कोकणात पुढील आठवडाभर राज्यातील इतर भागाच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात तळकोकण व खानदेशात जोरदार पाऊस झाला. घाटमाथ्यावरही ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र व विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसला. तुलनेत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असून ठिकठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. पुढील दोन दिवसात मराठवाड्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा पश्चिम पूर्व दिशेने राजस्थानपासून मध्य प्रदेशावरील कमी दाबाचा पट्टा ते उपसागरापर्यंत सक्रीय आहे. दोन्ही कमी दाबाचे पट्टे एकाच भागात सक्रीय असल्याची स्थिती आहे. जोडीला कर्नाटक व केरळच्या किनारपट्टीलगत किनारी कमी दाबाचा पट्टा सक्रीय झालेला आहे. यामुळे उपसागराकडून येणाऱ्या मॉन्सूनच्या शाखेबरोबरच अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांनाही बळ मिळाले असून दोन्ही बाजूने बाष्पयुक्त ढग येण्याचे प्रमाण वाढले आहे. उपसागराच्या उत्तर भागात सक्रीय असलेल्या चक्राकार वाऱ्यांची तिव्रता वाढली असून रविवारी दुपारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याचा अंदाज आहे. या क्षेत्राच्या प्रभावाने पावसात आणखी वाढ होऊ शकते.

शनिवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या चोविस तासात पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये -
कोकण व गोवा : दाभोलीम २००, मामाागोवा १९०, फोंडा १७०, सावंतवाडी १६०, केपे १५०, म्हापसा १४०, कानकोन १३०, भिरा, कुडाळ प्रत्येकी ११०, तलासरी १००, कणकवली, माथेरान, पेण, शहापूर प्रत्येकी ९०, पेडणे, सांगे प्रत्येकी ८०, कर्जत, खालापूर, मोखेडा, वाल्पोई प्रत्येकी ७०, माणगाव, पोलादपूर प्रत्येकी ६०, चिपळूण, दोडामार्ग, जव्हार, खेड, पनवेल, सुधागड पाली, वाडा, वेंगुर्ला प्रत्येकी ५०, लांजा, पालघर, राजापूर, रोहा, संगमेश्वर-देवरुख प्रत्येकी ४०, अंबरनाथ, महाड, मंडणगड, म्हसाळा, मुंबई, तळा, ठाणे, उल्हासनगर, उरण, विक्रमगड प्रत्येकी 3०, भिवंडी, दापोली, कल्याण, मालवण, मुरबाड, मुरुड प्रत्येकी 2०, अलिबाग, डहाणू, गुहागर, हर्णे प्रत्येकी १०

घाटमाथा: ताम्हणी १७०, डुंगेरवाडी १३०, लोणावळा, दावडी प्रत्येकी १२०, शिरगाव, अम्बोणे प्रत्येकी ११०, खोपोली १००, वळवण ९०, कोयना ७०, शिरोटा, खंद प्रत्येकी ४०, भिवपुरी, वाणगाव प्रत्येकी ३०, ठाकूरवाडी २०.

मध्य महाराष्ट्र : नवापूर १६०, इगतपूरी १३०, धडगाव, नंदुरबार प्रत्येकी १२०, अक्कलकुवा, तळोदा प्रत्येकी ११०, महाबळेश्वर ९०, पेठ, सुरगाणा प्रत्येकी ८०, हरसूल, शहादा प्रत्येकी ७०, दिंडोरी, गगनबावडा, शिरपूर प्रत्येकी ४०, गिधाडे, साक्री, सिंदखेडा प्रत्येकी ३०, अकोले, ओझर, पाटण, शाहूवाडी प्रत्येकी २०, आजरा, चंदगड, चांदवड, गारगोटी, जळगाव, कळवण, ओझरखेडा, पन्हाळा, राधानगरी, शिराळा, सिन्नर प्रत्येकी १०

मराठवाडा: उमरी ३०, बसमत, कळमनुरी, नांदेड प्रत्येकी २०, बिल्लोली, हिंगोली, कंधार, उस्मानाबाद, पालम, पूर्णा प्रत्येकी १०

विदर्भ : सेलू, वर्धा प्रत्येकी ९०, मौदा ८०, बाभूळगाव, चामोशी, देवळी, समुद्रपूर, यवतमाळ प्रत्येकी ६०, भंडारा, धामणगाव, दिग्रस, काटोल, खारांगा, कुही, मोहाडीफाटा, नारखेडा, सावनेर, तिरोडा, तुमसर, वरूड प्रत्येकी ५०, आर्वी, भिवापूर, कळमेश्वर, पारशिवनी, पुसद प्रत्येकी ४०, आर्णी, आष्टी, गोंदिया, गोरेगाव, मोशी, नागपूर, रामटेक, तिवसा, उमरेड प्रत्येकी ३०, अकोला, अकोट, चिखलदरा, धानोरा, घाटंजी, हिंगणघाट, हिंगणा, कामठी, खामगाव, लाखनी प्रत्येकी २०, आमगाव, अमरावती, भातकुली, चांदरू बाजार, दारव्हा, देवळी, एटापल्ली, जळगाव जामोद, कळंब, महागाव, मनोरा, मुर्तीजापूर, नागभिड, नांदगाव काजी, नेर, परतवाडा, पवनी, सडक अर्जूनी, झारीझामनी प्रत्येक १०.
---------------

Thursday, July 23, 2015

विदर्भात मॉन्सून सक्रीय

वरोरा १३०, नागभिड, शिंदेवाही प्रत्येकी १२०, भिवंडी ११०, मुल १००, महाबळेश्वर १००

पुणे (प्रतिनिधी) - विदर्भात मॉन्सून सक्रीय झाला असून पुढील चार दिवस उर्वरीत महाराष्ट्रातही त्याचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने येत्या सोमवारपर्यंत (ता.२७) दररोज कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा त्याच्या मुळ स्थानाच्या दक्षिणेकडे झुकलेला असून राजस्थानमधील बिकानेरपासून ते बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागापर्यंत तो सक्रीय आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिम भागातील चक्कार वारे या कमी दाबाच्या पट्ट्यात विलीन झाले आहे. या अनुकूल स्थितीमुळे महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. पश्चिम राजस्थान व लगतच्या भागात हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे सक्रीय आहेत. गुजरातवरील चक्राकार वारे सौराष्ट्र, कच्छ व लगतच्या अरबी समुद्रावर सरकले आहेत. शनिवारच्या (ता.२५) आसपास उपसागरात नवीन चक्राकार वारे सक्रीय होण्याचा अंदाज
आहे.

विदर्भात गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मॉन्सून सक्रीय होता. विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीहून ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भात ढगांची दाटी झालेली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात आकाश अंशतः ढगाळलेले आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये - कोकण - भिवंडी ११०, अंबरनाथ, कर्जत, उल्हासनगर प्रत्येकी ८०, कल्याण, माथेरान, पालघर, ठाणे प्रत्येकी ८०, पोलादपूर, तलासरी प्रत्येकी ७०, भिरा, मुरबाड प्रत्येकी ६०, डहाणू, दापोली, दोडामार्ग, मंडणगड, मुंबई, पेण, उरण, वाडा प्रत्येकी ५०, खेड, पनवेल, विक्रमगड प्रत्येकी ४०, चिपळूण, जव्हार, खालापूर, महाड, पेडणे, फोंडा, संगमेश्वर, देवरुख, सावंतवाडी, शहापूर, श्रीवर्धन, वाल्पोई प्रत्येकी ३०, गुहागर, हर्णे, लांजा, माणगाव, पणजी, राजापूर, रत्नागिरी, तळा प्रत्येकी २०, अलिबाग, दाभोलीम, देवगड, कणकवली, कुडाळ, म्हापसा, मार्मागोवा, म्हसाळा, मोखाडा, मुल्दे, मुरुड, रोहा, सांगे, सुधागड, पाली, वेंगुर्ला प्रत्येकी १०

घाटमाथा - ताम्हिणी ९०, लोणावळा ८०, वळवण, डुंगरवाडी, कोयना प्रत्येकी ७०, भिरा, शिरगाव, अम्बोणे, दावडी, खंद प्रत्येकी ६०, खोपोली ५०, ठाकूरवाडी, भिवपुरी प्रत्येकी ४०, धारावी ३०, शिरोटा, वाणगाव प्रत्येकी ३०

मध्य महाराष्ट्र - महाबळेश्वर १००, गगनबावडा, कोल्हापूर, गिरणा धरण, इगतपुरी, मालेगाव, वडगाव मावळ प्रत्येकी ३०, भोर, मुळशी, पेठ, तळोदा, वेल्हा प्रत्येकी २०, आजरा, अक्कलकुवा, चंदगड, दहीगाव, जुन्नर, मुक्ताईनगर, पन्हाळा, पाटण, राधानगरी, रावेर, शाहूवाडी प्रत्येकी १०

मराठवाडा - परतूर १०

विदर्भ - वरोरा १३०, नागभिड, शिंदेवाही प्रत्येकी १२०, मुल १००, हिंगणघाट, जळगाव जामोद प्रत्येकी ९०, अर्जुनी मोरगाव, जोईती प्रत्येकी ८०, अहिरी, पवनी, समुद्रपूर प्रत्येकी ७०, बार्शीटाकळी, पोंभुर्णा प्रत्येकी ६०, अकोला, बाळापूर, बल्लारपूर, भद्रावती, चामोर्शी, चिमूर, धारणी, कोपर्णा, मुलचेरा, पवनी, सडकअर्जुनी, तिवसा, वर्धा प्रत्येकी ५०, अमरावती, चांदूर, देसाईगंज, गोंडपिंपरी, लाखांदूर, सावळी, सावनेर, सिरोंचा, तुमसर, उमरेड, झारीझामनी प्रत्येकी ४०, आष्टी, बाभूळगाव, भंडारा, भिवापूर, ब्रम्हपुरी, दारव्हा, एटापल्ली, पांढरकवडा, राजुरा, यवतमाळ प्रत्येकी ३०, चंद्रपूर, चिखलदरा, गडचिरोली, गोंदिया, गोरेगाव, कळंब, कारंजा लाज, खामगाव, खारंघा, मारेगाव, नांदगाव काजी, नारखेडा, नेर, पातुर, राळेगाव प्रत्येकी २०, अंगाव, आरमोरी, बतकुली, देवळी, धामणगाव, धानोरा, दिग्रस, हिंगणा, मंगरुळपीर, मनोरा, मौदा, मोर्शी, मुर्तीजापूर, नागपूर, शेगाव, तिरोरा, उमरखेड, वरुड प्रत्येकी १०
------------------------------- 

पुण्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाची दडी

पुणे (प्रतिनिधी) - गेल्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाने मारलेली दडी कायम आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात या संपूर्ण भागात कोठेही पावसाची नोंद झाली नाही. घाटमाथ्यालगतच्या भागात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. लोणावळा येथे सर्वाधिक 68 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

दिवसभरात पुण्यात 2.1 मिलीमिटर, पौड येथे 18 मिलीमिटर, मुठे 27, पिरंगुट 19, मुळशी 16.7, भोर 13, भोलवडे 39, निगुडघर 39, काले 29, कार्ला 35, वेल्हे 23, पानशेत 18, राजुर 52, कुडे 12 तर खेड व जुन्नर येथे प्रत्येकी तीन मिलीमिटर पाऊस पडला. इंदापूर, दौड, बारामती, पुरंदर, शिरुर व आंबेगाव या तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही.

जिल्ह्याची जुन महिन्याची सरासरी 139.9 मिलीमिटर आहे. प्रत्यक्षात 203.9 मिलीमिटर म्हणजेच 145.7 टक्के पाऊस पडला आहे. जुलै महिन्याची सरसारी 202.9 मिलीमिटर आहे. तुलनेत महिन्याचे अखेरचे सहा-सात दिवस शिल्लक असताना आत्तापर्यंत फक्त 73.3 मिलीमिटर म्हणजेच अवघा 33.5 टक्के पाऊस झाला आहे. दोन्ही महिन्यांचा विचार करता आत्तापर्यंत 275.2 मिलीमिटर पाऊस (78.1 टक्के) पाऊस पडला आहे. सरासरीहून हा पाऊस 22 टक्के कमी आहे.

जिल्यातील काही तालुक्यात पाऊस सरासरीच्या आसपास दिसत असला तरी तरी पावसाचे वितरण अत्यंत असमाधानकारक असून पडल्यापैकी बहुतेक पाऊस पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात पडला आहे. भोर, मावळ व खेड या तीनच तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत सरासरीएवढा किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यांत सरासरीहून मोठ्या प्रमाणात कमी पाऊस आहे. इंदापूर सर्वात कमी (52.2 टक्के) पाऊस पडला आहे.

- धरणांच्या पाणलोटातील पाऊस
निरा देवघर 39, वडीवळे, पवना प्रत्येकी 29, टेमघर 27, गुंजवणी 18, वरसगाव 17, पानशेत, मुळशी प्रत्येकी 16, आंध्रा 12, माणिकडोह, भामा आसखेड प्रत्येकी 11, भाटघर 10, पिंपळगाव जोगे 8, कळमोडी, विर प्रत्येकी 5, कासारसाई 4, येडगाव, वडज प्रत्येकी 3, चासकमान, खडकवासला प्रत्येकी 2, घोड, विसापूर, नाझरे, उजनी 0 (भिमा खोरे), कोयना, कासारी प्रत्येकी 70, पाटगाव 49, धोम बलकवडी 37, राधानगरी 24, वारणा 17, तुळशी, दुधगंगा प्रत्येकी 12, उरमोडी 10, तरळी 9, धोम 6, कन्हेर 5 (कृष्णा खोरे)
------------------------------- 

Saturday, July 18, 2015

पावसाचा जोर वाढला

पुणे (प्रतिनिधी) - बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रातही मॉन्सूनची अनुकूलता वाढल्याने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात मॉन्सून आक्रमकपणे सक्रीय झाला असून उपसागरात आज (ता. १९) कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होणार आहे. कोकण व घाटमाथ्यासह राज्यात इतरत्रही पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याने बुधवारपर्यंत (ता.22) कोकणात सर्वदूर, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.

बंगालच्या भागात समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमिटर उंचीपर्यंत सक्रीय असलेल्या चक्राकार वाऱ्यांचे रुपांतर रविवारी सकाळी कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याचा अंदाज आहे. हे क्षेत्र सक्रीय झाल्यानंतर देशातील पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा अनुपगड, चारु, आग्रा, गया, धनबाद ते बंगालच्या उपसागरापर्यंतच्या भागात समुद्रसपाटीच्या पातळीहून 3.1 किलोमिटर उंचीपर्यंत मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून तो त्याच्या दक्षिणेकडे झुकलेला आहे. मध्य भारतात जोरदार पाऊस पडण्याच्या दृष्टीने ही स्थिती अनुकूल समजली जाते.

विदर्भ व अरबी समुद्राच्या दक्षिण भागात ढगांची दाटी वाढली असून दक्षिण अरबी समुद्रात जोरदार पाऊस सुरु आहे. पश्चिम बंगाल कर्नाटकचा दक्षिण भाग, केरळात आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात मॉन्सून सक्रीय आहे. शनिवारी सकाळपर्यंत कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. मराठवाड्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकणात कमाल तापमान सरासरीहून उंचावलेले तर किमान तापमान सरासरीहून किंचीत घसरलेले होते.

शनिवारी (ता.18) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये - कोकण - माथेरान 60, कानकोन, मडगाव, सांगे प्रत्येकी 50, केपे, वाल्पोई प्रत्येकी 40, दाभोलीम, कणकवली, कर्जत प्रत्येकी 30, फोंडा, सावंतवाडी, तळा प्रत्येकी 20, अंबरनाथ, दोडामार्ग, कल्याण, महाड, माणगाव, मार्मागोवा, म्हसळा, पनवेल, पेण, पोलादपूर, रोहा, शहापूर, श्रीवर्धन, सुधागड, पाली प्रत्येकी 10, मुंबई 4

मध्य महाराष्ट्र - गगणबावडा 50, महाबळेश्वर 30, इगतपुरी 20, आजरा, अक्कलकुवा, चंदगड, गारगोटी, पेठ, राधानगरी प्रत्येकी 10, पुणे 1, घाटमाथा - शिरगाव 80, दावडी 70, अम्बोणे 50, भिरा, डुंगरवाडी, कोयना, ताम्हिणी प्रत्येकी 40, लोणवळा, शिरोटा, वळवण प्रत्येकी 30, वाणगाव, भिवपुरी, खंद प्रत्येकी 20, खोपोली, ठाकूरवाडी प्रत्येकी 10

मराठवाडा - निलंगा, उमरगा प्रत्येकी 20, परभणी, सिल्लोड, सोयगाव प्रत्येकी 10
विदर्भ - समुद्रपूर, मालेगाव, वाशिम प्रत्येकी 30, महागाव 20, ब्रम्हपुरी 14, सेलू, देसाईगंज, पोंभुर्णा, आर्णी, मानोरा, पवनी, चिखली प्रत्येकी 10, वर्धा, यवतमाळ प्रत्येकी 3, अमरावती व बुलडाणा प्रत्येकी 2  

Friday, July 17, 2015

कोकणात पावसाला दमदार सुरवात

पुणे (प्रतिनिधी) - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर गुरुवारपासून कोकण व घाटमाथ्यावर पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत कोकणात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मॉन्सूनच्या अनुकूलतेत वाढ होत असल्याने हवामान खात्याने मंगळवारपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून कोकण-गोव्यात बहुताशां ठिकाणी, मध्य-महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मध्य भारतात सक्रीय असलेला कमी दाबाचा पट्टा आणि उपसागरातील चक्राकार वारे यांची सक्रीयता वाढल्याने उत्तर भारतासह देशात ठिकठिकाणी पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशात मॉन्सून सक्रीय असून पुढील चार दिवस महाराष्ट्रात विशेषतः कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असून सध्या ठिकठिकाणी सुरु असलेला पाऊस किमान येत्या मंगळवारपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत.

शुक्रवारी सकाळपर्यंत कोकण-गोव्यात बहुताशां ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाडयात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भात किमान तापमान सरासरीहून दोन ते चार अंश सेल्सिअसने उंचावलेले होते. हीच स्थिती पुढील चार दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत.

मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील गंगानगरपासून ग्वाल्हेर, जमशेदपूर, दिघा ते उपसागरापर्यंतच्या भागात सक्रीय असून त्याचा विस्तार समुद्रसपाटीच्या पातळीहून 2.1 किलोमिटरपर्यंत वाढला आहे. उपसागरच्या उत्तर भागात समुद्रसपाटीच्या पातळीहून 7.7 किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांचा विस्तार वाढला आहे. त्यात आणखी वाढ होऊन रविवारी सकाळपर्यंत उपसागराच्या उत्तर भागावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याचा अंदाज आहे.

जम्मू काश्मिरच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्यांच्या स्वरुपात पश्चिमी चक्रावात सक्रीय असून तो चिनच्या दिशेने पुढे सरकत आहे. याच वेळी अफगाणीस्तानवर सक्रीय झालेला पश्चिमी चक्कावात पाकिस्तानच्या उत्तर सिमावर्ती भागात दाखल झाला आहे. आसाम व लगतच्या भागातील चक्राकार वारे नागालॅन्ड, मनीपूर, मिझोरम व त्रिपूरा राज्यांवर सरकले असून समुद्रसपाटीच्या पातळीहून 3.1 किलोमिटर उंचीपर्यंत सक्रीय आहेत.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यातील प्रमुख ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये - कोकण - वाल्पोई ५0, कर्जत ४0, कानकोन, चिपळूण, दोडामार्ग, खेड, पोलादपूर प्रत्येकी ३0, अलिबाग, गुहागर, कणकवली, लांजा, माथेरान, म्हसळा, पेण, पेडणे, सुधागड, पाली प्रत्येकी २0, अंबरनाथ, दापोली, जव्हार, खालापूर, कुडाळ, महाड, मांडणगड, रोहा, संगमेश्वर, देवरुख, सावंतवाडी, शहापूर, तळा, वाडा प्रत्येकी १0

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ५0, गगनबावडा ३0, इगतपुरी २0, रावेर, चंदगड, हरसूल, पाटण, मुळशी, शाहूवाडी, सुरगाणा, तळोदा, वडगाव मावळ प्रत्येकी १0, घाटमाथा : शिरगाव, दावडी ६ प्रत्येकी, लोणावळा, ताम्हणी प्रत्येकी 50, अम्बोणे ४0, वळवण, डुंगेरवाडी प्रत्येकी ३0, भिरा, शिरोटा, वाणगाव, कोयना, खोपोली, खांद प्रत्येकी 20, ठाकूरवाडी, भिवपुरी प्रत्येकी 10.

विदर्भ : बुलढाणा, जोईती प्रत्येकी २0, मोहाडीफाटा १0. 

डी.डी. किसानच्या नावाने बोगस भरती प्रक्रीया सुरु


प्रशिक्षणासाठी पैशांची मागणी, नाशिकमधील प्रकरण उघडकीस

पुणे (प्रतिनिधी) - केंद्र सरकारमार्फत नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या डी.डी. किसान या दुरचित्रवाणी वाहिनीच्या नावाने अज्ञात व्यक्तींकडून बोगस भरती प्रक्रीया राबविण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या व्यक्तींनी भारतीय दुरसंचार केंद्राच्या नावाने उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठवून आपली पत्रकार पदी निवड झाली असून प्रशिक्षणासाठी 15 हजार रुपये बॅंक खात्यात भरुन नोकरी नक्की करण्याचे आवाहन केले आहे. यातून राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे.

महिनाभरापुर्वी एका मराठी वृत्तपत्रात (सकाळ, अॅग्रोवन नव्हे) छोटी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात किसान वाहिनीत शेती पत्रकार म्हणून काम करण्यास इच्छूक असलेल्यांकडून पत्ता व संपर्क क्रमांक मागविण्यात आले. ही माहिती दिलेल्या व्यक्तींना संबंधीतांनी दुरध्वनीवर संपर्क साधून पाच प्रश्नांची मुलाखत घेतली आणि त्यानंतर दहा पंधरा दिवसात संबंधीतांना निवडपत्र पाठविण्यात आले. या सर्वांकडून प्रशिक्षणासाठी अनामत रक्कम म्हणून 15 हजार 500 रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

दूर संचार मंत्रालयाच्या प्रसारण विभागामार्फत भारत सरकारच्या रोजगार नियमावलीनुसार आपली डी.डी.किसान पत्रकार या पदावर आपली नियुक्ती करण्यात आली आहे. आपले मासिक वेतन 25,500 रुपये (वार्षिक 3.15 लाख) निश्चित करण्यात आले आहे. सर्व नियमांचे पालन करुन आपण आपली नोकरी निश्चित करण्यासाठी 15 हजार 500 रुपये बॅंक खात्यात भरावेत. सर्व माहितीची खातरजमा केल्यानंतर मुंबईत एक महिन्याचे प्रशिक्षण व पत्रकारिता पदविका प्रदान करण्यात येईल. त्याआधारे किसान वाहिनीत पत्रकार म्हणून रुजू करुन घेतली जाईल, असे अमिष उमेदवारांना दाखविण्यात आले आहे.

उमेदवारांनी कसलाही विचार न करता पैसे बॅंकेत जमा करावेत यासाठी प्रशिक्षणार्थी कालावधीत 18 हजार रुपये वेतन, रेल्वेने जाण्या येण्याचा खर्च, निवास, भोजन आदी खर्च किसान मार्फत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महिलांना त्यांच्या सोईच्या जिल्ह्यात तर पुरुषांना राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. शासन प्रत्येक उमेदवारावर 65 हजार रुपये खर्च करणार आहे. तुम्हाला फक्त 15 हजार 500 रुपये द्यायचेत व ते ही प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला परत केले जातील अशी लालूच दाखविण्यात आली आहे.

- चौकट
- भामट्याची पसंती कृषी भरतीला
गेल्या काही वर्षात भामट्यांमार्फत कृषी पदवीधर व पदविकाधारक उमेदवारांना रोजगाराचे अमिष दाखवून फसवणूक करण्यासाठी सातत्याने लक्ष करण्यात आले आहे. सेंद्रीय शेती प्रमाणिकरण संस्था, खादी ग्रामोद्योग भरती, केंद्रीय कृषी विभागात भरती, भारतीय कृषी संशोधन संस्थेत भरती अशा विविध बोगस जाहिराती देवून संबंधीत संस्थांच्या माहितीची, चिन्हांची नकल करुन उमेदवारांना थेट निवड झाल्याचे कळवायचे आणि त्यांना प्रशिक्षणासाठी 15 ते 50 हजार रुपये अनामत रक्कम भरायला सांगायचे. पैसे गोळा करुन पोबारा करायचा असा हा फंडा आहे. भामट्यांची ही टोळी दिल्लीतून हे सर्व रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे.

- कोट
जाहिरातीनुसार फक्त पत्ता पाठवला तर नियुक्ती पत्र आले. एवढ्या सहज नोकरी कशी मिळेल, ते ही फक्त फोनवर जुजबी मुलाखतीने. साडेपंधरा हजार रुपये भरण्याचा आग्रह पाहून हे प्रकरण बोगस असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पैसे भरले नाहीत.
- प्रतिक देशमुख, सिन्नर, नाशिक
----------------------------------------------

Thursday, July 16, 2015

राज्य धरण पाणीसाठा

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा कालखंड असलेला पावसाळ्याच्या सुरवातीचा दीड महिना उलटल्यानंतरही पावसातील खंड कायम असल्याने राज्यातील जलसाठा यंदाच्या निचांकी पातळीवर पोचला आहे. त्यातही मराठवाड्यातील पाणीसाठ्यात गेल्या काही वर्षातील सर्वाधिक घट झाली आहे. राज्यात नऊ हजार 711 दशलक्ष घनमिटर (26 टक्के) तर मराठवाड्यात फक्त 470 दशलक्ष घनमिटर (6 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यात सध्या 84 मोठ्या धरणांमध्ये पाच हजार 186 दशलक्ष घनमिटर (24 टक्के), 222 मध्यम प्रकल्पांमध्ये एक हजार 275 दशलक्ष घनमिटर (27 टक्के) तर दोन हजार 195 लघु प्रकल्पांमध्ये 996 दलघमी (21 टक्के) पाणीसाठा आहे. राज्याची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 37 हजार 463 दशलक्ष घनमिटर आहे. मराठवाड्यातील जायकवाडी (औरंगाबाद), माजलगाव, मांजरा (बीड), तेरणा, सिना कोळेगाव (उस्मानाबाद) ही पाच मोठी धरणे पूर्णतः कोरडी पडली असून पूर्णा येलदरी प्रकल्पात एक टक्का तर पूर्णा सिद्धेश्वर प्रकल्पात दोन टक्के पाणी शिल्लक आहे. नांदेडमधील मनार प्रकल्पातही जेमतेम चार टक्के पाणी आहे.

विदर्भातील आसोलामेंढा (चंद्रपूर) तर नाशिकमधील तिसगाव, पुणेगाव प्रकल्पही कोरडे पडलेले आहेत. पुणे विभागात पिंपळगाव जोगे, घोड (पुणे) व उजनी (सोलापूर) ही तीन धरणे अद्याप कोरडी आहेत. कोकणात पालघर जिल्ह्यातील सूर्या कवडास प्रकल्प (10 दलघमी) 100 टक्के भरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरण 48 टक्के भरले आहे. पुणे विभागातील गुंजवणी धरण पूर्ण भरले आहे. राज्याच्या विजनिर्मितीच्या दृष्टीने महत्वाचे कोयना धरण 46 टक्के भरलेले आहे.

गेल्या आठ दिवसात कोकण, नागपूर व पुणे विभागातिल धरणांमध्ये पाणीसाठ्यात अल्पशी वाढ झाली आहे. मराठवाड्यासह उर्वरीत सर्व विभागातील जलसाठ्यात वेगाने घट सुरु आहे. मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठ्याने गेल्या काही वर्षातील निचांकी (6 टक्के) पातळी गाठली आहे. गेल्या वर्षी या वेळी राज्यात 19 टक्के तर त्याआधी (2013) सुमारे 40 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

- चौकट
- राज्यातील एकूण जलसाठ्यांची सद्यस्थिती
विभाग --- प्रकल्पांची संख्या --- उपयुक्त जलसाठा (दलघमी) --- उपयुक्त जलसाठा (टक्के)
कोकण --- 158 --- 845 --- 50
मराठवाडा --- 806 --- 470 -- 6
नागपूर --- 366 --- 1136 --- 28
अमरावती --- 452 --- 930 --- 32
नाशिक ---- 350 --- 973 --- 20
पुणे -- 369 --- 3103 --- 30
इतर धरणे --- 16 --- 2254 -- 37
एकूण ---- 2517 --- 9711 --- 26
--------------------------------------------- 

Wednesday, July 15, 2015

आयएटी संस्थेची स्थापना

कृषी पदवीधरांमार्फत कृषी विकासासाठी
आयएटी संस्थेची स्थापना

अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील, उपाध्यक्षपदी उमाकांत दांगट

पुणे (प्रतिनिधी) - राज्यभरातील कृषी पदवीधर तंत्रज्ञांच्या पुढाकाराने आणि राज्यातील शेतीला स्थिरता प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने फक्त कृषी पदवीधरांचाच समावेश असलेली इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजिस्ट, महाराष्ट्र (आयएटी) ही संस्था नुकतीच कार्यरत झाली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे विभागिय आयुक्त उमाकांत दांगट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये १९६८ पासून इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स ही संस्था कार्यरत आहे. याच संस्थेच्या धर्तीवर गेल्या वर्षी (२०१४) आयएटी, महाराष्ट्र ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील शेतीला स्थिरता प्राप्त करुन देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असून त्यासाठी कृषी पदवीधर संघटन, कृषी प्रक्रीया, विपणन, प्रशिक्षण आदी विविध क्षेत्रात क्षेत्रात काम करण्यात येणार आहे.

संस्थेच्या संचालक मंडळाची पहिली बैठक श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच औरंगाबाद येथे पार पडली. राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांचे पदवीधर या संस्थेचे सदस्य होऊ शकतात. राज्याच्या कृषी विकासासाठी भरिव योगदान देण्याची संधी यातून कृषी पदवीधरांना उपलब्ध करण्यात येणार आहे. सभासद नोंदणीसाठी संस्थेच्या www.iatmaharashtra.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

संस्थेचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे - राधाकृष्ण विखे पाटील (अध्यक्ष), डॉ. उमाकांत दांगट (उपाध्यक्ष), डॉ. रामकृष्ण मुळे (सचिव), विजय घावटे, विनायक देशमुख (सहसचिव), डॉ. सु. ल. जाधव (खजिनदार), गोविंद हांडे (सहखजिनदार), डॉ. शंकरराव मगर, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. कृष्णा लव्हेकर, डॉ. जे. पी. महल्ले, डॉ. आप्पासाहेब भुजबळ, डॉ. पी. एन. राऊत, अरुण नरके, जयंत देशमुख, जनार्दन जाधव, अशोक लोखंडे, विनयकुमार आवटे, डॉ. भगवानराव कापसे, डॉ. मेघना केळकर, अरिफ शहा, अर्चना कडू, श्रीराम गाढवे, सोपान कांचन, संतोष डुकरे, के. एम लवांडे, किशोर राजहंस, संदिप केवटे, अंजना सोनवळकर, प्रेमचंद मांगवे (सदस्य) 

द्राक्ष डाळिंब महायात्रा

21 ऑगस्टपासून अॅग्रोवनची
द्राक्ष डाळिंब महायात्रा

- राज्यात प्रथमच पिकनिहाय कृषी प्रदर्शनांची मुहूर्तमेढ
- सांगली, बारामती, नाशिकमध्ये आयोजन

पुणे (प्रतिनिधी) - राज्यभरातील शेतकऱ्यांना त्यांची गरज व मागणीनुसार हवे ते सर्व काही उपलब्ध करुन देण्याचा विडा उचललेल्या दै. अॅग्रोवनमार्फत खास शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव पिकनिहाय राज्यस्तरीय कृषी प्रदशर्नाची नवी मालिका सादर करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच अभिनव उपक्रम असून त्याअंतर्गत सांगली, बारामती व नाशिकमध्ये द्राक्ष-डाळींब महायात्रा कृषी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 21 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान प्रत्येकी तीन दिवसांची ही प्रदर्शने होणार आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गरजांमध्ये मोठ्या प्रमाणात समानता असली तरी पिकनिहाय या गरजा वेगळ्या असतात. सर्वसाधारण प्रदर्शनामध्ये एखाद्या पिकाच्या लागवड पूर्व स्थितीपासून ते प्रक्रीया उत्पादनांची विक्री किंवा निर्यातीपर्यंतची इत्यंभूत माहिती मिळण्यात अनेक अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठीच्या नेहमीच्या कृषी प्रदर्शनाशिवाय शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध पिकांना वाहिलेली कृषी प्रदर्शने त्या त्या पिकाच्या बालेकिल्ल्यांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय अॅग्रोवनने घेतला आहे. या अंतर्गत द्राक्ष व डाळिंब या दोन्ही पिकांसाठीची तीन कृषी प्रदर्शने जाहिर करण्यात आली आहेत.

द्राक्ष व डाळींब पिकांचे इत्यंभूत अत्याधुनिक तंत्रज्ञान या प्रदर्शनांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असून लागवडीपासून ते निर्यातीपर्यंतच्या संपूर्ण मुल्य साखळीतील विषयांच्या मान्यवर तज्ञांशी संवाद साधण्याची संधीही या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रदर्शनाची प्रसिद्धी दै. सकाळ, अॅग्रोवन आणि साम टीव्हीवर करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील या पिकांकडे वळू पाहणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही पर्वणी साधता येणार आहे.

अॅग्रोवनच्या या कृषी प्रदर्शनांतून शेतकऱ्यांप्रमाणेच द्राक्ष व डाळींब या पिकांसाठी कार्यरत असलेल्या विविध कंपन्या, खते, औषधे, रोपे, यंत्र व अवजारे उत्पादक, वित्तपुरवठादार, निर्यातदार, सुक्ष्म सिंचन, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, संशोधन संस्था, शासनाचे विविध विभाग यांनाही यातून संबंधीत पिकांच्या जाणकार, जिज्ञासू आणि तंत्रज्ञान लगेच अमलात आणण्यासाठी इच्छूक असलेल्या लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याची संधी मिळणार आहे.

- चौकट
- प्रदर्शन स्थळ व कालावधी
सांगली - 21 ते 23 ऑगस्ट
बारामती - 28 ते 30 ऑगस्ट
नाशिक - 4 ते 6 सप्टेंबर

- चौकट
- सुवर्णसंधी सर्वांसाठी
प्रदर्शनात स्टॉल बुकिंगसाठी संपर्क - 9850569808, 8975675353 (पुणे), 9881129293 (कोकण, सांगली, कोल्हापूर, बेळगाव), 9881303883 (नाशिक), 9011030045 (औरंगाबाद), 9821973760 (मुंबई), 9881136035 (जळगाव), 8380072049 (सातारा, सोलापूर), 8888966582 (नगर), 8888718600 (नागपूर), 8586912108 (दिल्ली)
----------------------------- 

पुण्यात खरिप पिके खुरटली

- मृगाची पेरणी मोजतेय अखेरची घटका
- कृषी विभागाची दुबारसाठी तयारी सुरु

पुणे (प्रतिनिधी) - जिल्ह्यात पेरणी झालेली खरिप पिके वाढ खुंटलेल्या अवस्थेत तग धरुन आहेत. मात्र चालू आठवड्यात पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणात पिके हातची जावून दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत या दृष्टीने दुबार पेरणी हंगामाची तयारी सुरु करण्यात आली असून सोयाबीन व मका पिकाच्या बियाण्याची महाबीजला ऑडर देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार येत्या आठवडाभरात हे बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे.

गेल्या पाच वर्षात यंदा प्रथमच जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसावर मोठ्या प्रमाणात खरिप पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 84 हजार हेक्टर (36 टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत पेरण्या झाल्या नव्हत्या. यंदा बऱ्यापैकी पेरण्या उरकल्या असल्या तरी पावसाअभावी पिके हातची जाण्याचे संकट आहे. पेरणीची वेळ अद्याप उलटली नसली तरी हंगामाच्या सुरवातीलाच पेरलेली पिके पावसातील मोठ्या खंडामुळे जळू लागली आहे. भाताच्या रोपवाटीकांसह ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका या सर्वच पिकांची वाढ खुंटलेली आहे. चालू आठवड्यात पाऊस पडला नाही तर या सर्व पिकांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची धास्ती आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात भाताची रोपे लावणीच्या अवस्थेत आहेत. उर्वरीत भागात पिके चार पाने फुटव्यांच्या अवस्थेत आहेत. पावसातील खंडाचा सर्वात मोठा फटका सध्या भात पिकाला सहन करावा लागत आहे. आहेत ही रोपे हातची गेल्यास पुन्हा नवीन रोपे तयार करण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार असल्याने या शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पूर्णपणे नापेरीतच जाण्याचा धोका आहे. उर्वरीत भागात मका व सोयाबीनची लागवड होऊ शकते, अशा अंदाजाने कृषी विभागाचे नियोजन सुरु आहे. मात्र महाबीजकडे बियाण्याची मागणी नोंदविण्यापलिकडे कृषी विभागामार्फत याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही.

- कोट
भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, बारामती, पुरंदर आदी तालुक्यांतील पिकांची नुकतीच प्रत्यक्ष पहाणी केली. पिकांची वाढ खुंटली आहे. दुबार पेरणीची समस्या उद्भवलीच तर त्यासाठी महाबीजकडे यापुर्वीच बियाण्याची मागणी केली आहे. पुरेसा पुरवठा होणार आहे.
- एस. एम. काटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे
---------------------- 

Thursday, July 9, 2015

हवामान बातमी

पुणे (प्रतिनिधी) - उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वाऱ्यांमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) उपसागराकडील शाखा सक्रीय झाली असून त्यापासून छत्तीसगड, मध्य प्रदेश, बंगाल, नागालॅन्ड, मनीपूर, मिझारोम व त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तुलनेत मॉन्सूनची अरबी समुद्रावरील शाखा शांत असून येत्या दोन दिवसात या बाजूने मॉन्सून सक्रीय होण्याची शक्यता नाही.

हवामान खात्याने येत्या सोमवारपर्यंत (ता.13) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीहून अधिक वाढ झाली. संपूर्ण विदर्भात कमाल तापमान सरासरीहून उंचावले आहे. नागपूर, ब्रम्हपुरी व वर्धा येथे सर्वाधिक 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये सर्वात कमी 24 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

दिवसभरात कोकण व विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. विदर्भात गोंदपिंप्री येथे 20 मिलीमिटर तर सालेकसा व गोंदिया येथे प्रत्येकी 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मॉन्सून सक्रीय झाला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील गंगानगरपासून हरियानातील हिस्सार, उत्तर प्रदेशातील आग्रा, मिर्झापूर, बिहार, झारखंड ते उपसागरापर्यंत सक्रीय आहे. राजस्थानमधील चक्राकार वारे मॉन्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्यात विलीन झाले आहेत. उपसागर आणि झारखंडनजिक सक्रीय असलेले कमी दाबाचे क्षेत्र बिहारकडे सरकले असून बिहार, झारखंड व बंगालच्या भागात सक्रीय आहे. या क्षेत्राशी संलग्न असलेले चक्राकार वारेही कायम होते. हे कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वारे शनिवारपर्यंत ओसरण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग व मध्य प्रदेशच्या उत्तर भागात समुद्रसपाटीपासून दोन किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत.