Thursday, July 23, 2015

पुण्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाची दडी

पुणे (प्रतिनिधी) - गेल्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाने मारलेली दडी कायम आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात या संपूर्ण भागात कोठेही पावसाची नोंद झाली नाही. घाटमाथ्यालगतच्या भागात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. लोणावळा येथे सर्वाधिक 68 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

दिवसभरात पुण्यात 2.1 मिलीमिटर, पौड येथे 18 मिलीमिटर, मुठे 27, पिरंगुट 19, मुळशी 16.7, भोर 13, भोलवडे 39, निगुडघर 39, काले 29, कार्ला 35, वेल्हे 23, पानशेत 18, राजुर 52, कुडे 12 तर खेड व जुन्नर येथे प्रत्येकी तीन मिलीमिटर पाऊस पडला. इंदापूर, दौड, बारामती, पुरंदर, शिरुर व आंबेगाव या तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही.

जिल्ह्याची जुन महिन्याची सरासरी 139.9 मिलीमिटर आहे. प्रत्यक्षात 203.9 मिलीमिटर म्हणजेच 145.7 टक्के पाऊस पडला आहे. जुलै महिन्याची सरसारी 202.9 मिलीमिटर आहे. तुलनेत महिन्याचे अखेरचे सहा-सात दिवस शिल्लक असताना आत्तापर्यंत फक्त 73.3 मिलीमिटर म्हणजेच अवघा 33.5 टक्के पाऊस झाला आहे. दोन्ही महिन्यांचा विचार करता आत्तापर्यंत 275.2 मिलीमिटर पाऊस (78.1 टक्के) पाऊस पडला आहे. सरासरीहून हा पाऊस 22 टक्के कमी आहे.

जिल्यातील काही तालुक्यात पाऊस सरासरीच्या आसपास दिसत असला तरी तरी पावसाचे वितरण अत्यंत असमाधानकारक असून पडल्यापैकी बहुतेक पाऊस पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात पडला आहे. भोर, मावळ व खेड या तीनच तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत सरासरीएवढा किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यांत सरासरीहून मोठ्या प्रमाणात कमी पाऊस आहे. इंदापूर सर्वात कमी (52.2 टक्के) पाऊस पडला आहे.

- धरणांच्या पाणलोटातील पाऊस
निरा देवघर 39, वडीवळे, पवना प्रत्येकी 29, टेमघर 27, गुंजवणी 18, वरसगाव 17, पानशेत, मुळशी प्रत्येकी 16, आंध्रा 12, माणिकडोह, भामा आसखेड प्रत्येकी 11, भाटघर 10, पिंपळगाव जोगे 8, कळमोडी, विर प्रत्येकी 5, कासारसाई 4, येडगाव, वडज प्रत्येकी 3, चासकमान, खडकवासला प्रत्येकी 2, घोड, विसापूर, नाझरे, उजनी 0 (भिमा खोरे), कोयना, कासारी प्रत्येकी 70, पाटगाव 49, धोम बलकवडी 37, राधानगरी 24, वारणा 17, तुळशी, दुधगंगा प्रत्येकी 12, उरमोडी 10, तरळी 9, धोम 6, कन्हेर 5 (कृष्णा खोरे)
------------------------------- 

No comments:

Post a Comment