Sunday, April 20, 2014

"ऍग्रोवन'चे दहाव्या वर्षात दमदार पदार्पण

राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; विविध ठिकाणी झालेल्या चर्चासत्रांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यभरातील शेतकऱ्यांचा विश्‍वासू साथीदार, मित्र व मार्गदर्शक बनलेल्या "सकाळ ऍग्रोवन'ने रविवारी (ता. 20) नऊ वर्षे पूर्ण करत दहाव्या वर्षात दमदार पदार्पण केले. राज्यात ठिकठिकाणी थेट बांधावर शेतीविषयक चर्चासत्रांचे आयोजन करून "ऍग्रोवन'चा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. शेकडो शेतकऱ्यांनी या चर्चासत्रांना उपस्थित राहून "ऍग्रोवन'वरील प्रेम व्यक्त केले. "ऍग्रोवन'चे कार्यालय, फेसबुक पेज आणि प्रतिनिधींकडे दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.

सकाळ माध्यम समूहाने नऊ वर्षांपूर्वी 20 एप्रिल 2005 रोजी "ऍग्रोवन'ची मुहूर्तमेढ रोवली. समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार व व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या दुरदृष्टीतून "ऍग्रोवन'ची कल्पना पुढे आली. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या मागील उद्देश होता. फक्त शेती आणि शेतकऱ्यांसाठी वाहिलेले दैनिक किती दिवस चालणार असे प्रश्‍न यावेळी उपस्थित करण्यात आले. मात्र गेल्या नऊ वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाच्या जोरावर "ऍग्रोवन'ने दमदार मजल मारली आहे.

"ऍग्रोवन'च्या कामगिरीने देशाच्या कृषी पत्रकारितेच्या इतिहासात नवी यशोगाथा, नवा इतिहास निर्माण झाला आहे. देशातील पहिले कृषिदैनिक म्हणून "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, मराठी विज्ञान परिषदेकडून गौरव आदी अनेक मानाचे तुरे "ऍग्रोवन'च्या शिरपेचात खोवण्यात आले आहेत. या वर्धापनदिनानिमित्ताने राज्यभरातील शेतकऱ्यांनी सरपंच महापरिषद, कृषी प्रदर्शने, चर्चासत्रे, प्रशिक्षण कार्यक्रम, दुष्काळमुक्ती अभियान आदी उपक्रमांचा विशेष उल्लेख करत "ऍग्रोवन'ला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

- विशेषांकास मोठा प्रतिसाद
गेल्या काही वर्षांपासून वर्धापनदिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शेतकऱ्यांना विशेषांकाच्या माध्यमातून कृषी ज्ञान तंत्रज्ञानाची अनोखी मेजवानी देण्याचा "ऍग्रोवन'चा पायंडा आहे. यंदा वर्धापनदिनानिमित्त तीन विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहेत. "ऍग्रोवन'च्या मदतीने स्वतःची यशोगाथा घडविलेल्या शेतकऱ्यांच्या प्रेरक प्रतिक्रिया, मनोगतांचा "प्रगतीचा साथी ऍग्रोवन' हा विशेषांक रविवारी वर्धापनदिनी प्रसिद्ध झाला. त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आज (ता.21) "साथी हाथ बढाना' हा गटशेतीतून समृद्धीची वाट दाखवणारा विशेषांक, तर उद्या (ता. 22) "साथ साथ' हा कृषिकेंद्रित ग्रामविकास साधलेल्या गावांच्या यशोगाथांचा विशेषांक प्रसिद्ध होत आहे.


कोकणेतर महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः येत्या बुधवारी सकाळपर्यंत (ता.23) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणात प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत असलेला वादळी पाऊस पुढची आठ दिवस कायम राहण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. विदर्भात बाष्पयुक्त ढगांची दाटी अधिक असून उर्वरीत महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळलेले आहे.

रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणात अनेक ठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली. औरंगाबाद येथे सर्वाधिक 20 मिलीमिटर तर परभणी, उदगीर, सातारा व कोल्हापूर येथे प्रत्येकी 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पावसामुळे या भागात अनेक ठिकाणी पिके, झाडांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीहून तीन ते सहा अंशांनी उंचावलेला होता. ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक 41.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. ढगाळ हवामान कायम असल्याने पुढील दोन दिवस पावसाची शक्‍यताही कायम आहे. बुधवारपर्यंत किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः पुणे 39.8, नगर 39.6, जळगाव 39.5, कोल्हापूर 34.4, महाबळेश्‍वर 32.4, मालेगाव 40.2, नाशिक 37.2, सांगली 35, सातारा 38.8, सोलापूर 39, मुंबई 32, अलिबाग 30.3, रत्नागिरी 33, पणजी 34.3, डहाणू 31.4, भिरा 40.5, उस्मानाबाद 37.9, औरंगाबाद 37.2, परभणी 39, नांदेड 40, बीड 38.6, अकोला 40.6, अमरावती 40.4, बुलडाणा 37, ब्रम्हपुरी 41.9, चंद्रपूर 37, गोंदिया 39.3, नागपूर 40.1, वाशिम 38.8, वर्धा 41, यवतमाळ 38.8
---------(समाप्त)---------

Saturday, April 19, 2014

हिंदी महासागराला मॉन्सूनचे वेध !

एप्रिलअखेर स्पष्ट होणार चित्र; हवामान खात्याला अंदाज 23, 25 ला

पुणे (प्रतिनिधी) ः हिंदी महासागराच्या विषुववृत्ताकडील भागाला संपूर्ण भारतीय उपखंडातील जिवसृष्टीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) वेध लागले आहेत. पुढील दहा दिवस मॉन्सूनच्या ढग निर्मितीच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. समुद्रावरील हवेचा अधिक दाब व त्यानंतर किनारी भागाकडून देशांतर्गत भागाकडे कमी होणारा हवेचा दाब यामुळे मॉन्सूनचे वारे वाहण्यास हळूहळू अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

विषुववृत्तीय भागात मॉन्सूनचे ढग निर्माण होण्यासाठी समुद्रपृष्टाचे कमाल तापमान 300 केल्विनहून अधिक असणे उपयुक्त ठरते. सध्या हे तापमान 302 केल्विनच्या आसपास असून पुढील सात दिवसात त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. याबरोबरच भुपृष्टीय भागातील हवेचा प्रवाह व दाबाचा पॅटर्नही हळूहळू निश्‍चित होऊ लागल्याची चिन्हे आहेत. यामुळे मॉन्सूनचा ट्रेड निश्‍चित होण्यास मदत होणार असून पुढील पाच ते दहा दिवसात मॉन्सूनचे चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

मॉन्सूनची वाटचाल, पावसाचे प्रमाण, त्यातील खंड आदी बाबींवर 4 मार्च ते 20 मे या दहा आठवड्यांच्या कालावधीतील हवामानाचा मोठा प्रभाव असतो. विशेषतः एप्रिलमध्ये हवामानातील बदल अधिक तीव्र होऊन मॉन्सून व त्यासाठीची ढगनिर्मिती सुरू होते. हिंदी महासागरात मॉन्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. देशात ठिकठिकाणी वाऱ्यांची दिशा, आर्द्रता, तापमान आदी हवामान घटकांमध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. केरळपासून सुमारे तीन ते साडेतीन हजार किलोमीटर अंतरावर हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळील भागापासून नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरु होणार आहे.

- यंदा मॉन्सून धिमा ?
गेल्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हिंदी महासागरात विषुववृत्ताच्या खालच्या बाजूला मॉन्सूनचे ढग तयार होण्यास सुरवात झाली होती. समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 304 केल्विनपर्यंत वाढलेले व हवेचा समुद्रसपाटीच्या पातळीवरील दाब विषुववृत्ताकडून भारतीय उपखंडाकडे कमी कमी झालेला होता. यंदा आत्तापर्यंत ढगांची निर्मिती झाली नसल्याचे उपग्रह छायाचित्रांवरुन दिसते. याबाबत विचारणा केली असता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या लांब पल्ल्याचे हवामान अंदाज विभागाचे संचालक डॉ. डी. एस. पै म्हणाले की एप्रिल अखेरीस वा मेच्या सुरवातिला मॉन्सूनच्या ढगांचे चित्र स्पष्ट होईल. सध्या या भागात कोणतीही "सिस्टीम' तयार झालेली नाही.

- एल निनो दणका देणार ?
यंदा भारतीय उपखंडातील मॉन्सून हवामानावर पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे वाढलेले तापमान व एल निनोचा प्रभाव पडणार असल्याने मॉन्सून सरासरीपेक्षा कमी बरसण्याचा अंदाज हवामानविषयक खासगी संस्थांनी व्यक्त केला आहे. एल निनोचा प्रभाव असेल तर पाऊसमान कमी होते, असा सर्वसाधारण ठोकताळा आहे. हवामान खात्याच्या सुत्रांनीही यंदा एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचे नाकारलेले नाही, हे विशेष.

- पुण्यात दक्षिण आशियायी देशांची बैठक सुरु
दरम्यान, दक्षिण आशियायी देशांसाठीचा हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी साऊथ एशिया क्‍लायमेट आऊटलूक फोरमची (एसएसीएएफ) विशेष कार्यशाळा पुण्यात 14 एप्रिलपासून सुरु आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग, नॅशनल क्‍लायमेट सेंटर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, जागतीक हवामान संघटना (डब्लू एम ओ) या संस्था, संघटनांसह अफगाणिस्थान, बांग्लादेश, भुतान, मालदिव, मॅनमार, पाकिस्तान, नेपाळ व श्रीलंकेतील हवामानतज्ज्ञ या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. या फोरममार्फत 23 एप्रिलला दक्षिण आशियायी देशांसाठीचा मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात येणार आहे. सध्या हा अंदाज तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

*कोट
""यंदाचा संभाव्य मॉन्सून, एन निनोचा परिणाम याशिवायी अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. याबाबतच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे लवकरच स्पष्ट होतील. दक्षिण आशियायी देशांसाठीचा मॉन्सूनचा अंदाज 23 एप्रिलला तर भारतासाठीचा मॉन्सूनचा लांब पल्ल्याचा अंदाज 25 एप्रिलला जाहिर करण्यात येईल.''
- डॉ. डी. एस. पै, संचालक, लांब पल्ल्याचा अंदाज विभाग, भारतीय हवामानशास्त्र विभाग
------------(समाप्त)-------------


वर्धापनदिन विशेषांक - उमाकांत दांगट

कृषी आयुक्त म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ऍग्रोवन मला नेहमीच अतिशय उपयुक्त ठरला आहे. गेल्या दुष्काळातील आमचा अनुभव या दृष्टीने पुरेसा बोलका आहे. राज्यात गेल्या वर्षी टंचाईची स्थिती होती. तशातच जालना, बीड, औरंगाबाद भागातील मोसंबीच्या बागा सुकायला सुरवात झाली. ऍग्रोवनने याबाबतची वस्तुस्थिती अतिशय प्रभावीपणे मांडली. मी त्या वेळी मराठवाड्याच्याच दौऱ्यावर होतो. बातमी वाचल्यानंतर तातडीने ऍग्रोवनने उल्लेख केलेल्या भागात पोचलो. शेतकऱ्यांना भेटून माहीती घेतली. दुष्काळामुळे बागांची, शेतकर्यांची स्थिती खरोखरच फार बिकट झाली होती. दुष्काळाचा हा फिडबॅक आम्हाला सर्वप्रथम फक्त ऍग्रोवनच्याच माध्यमातून मिळाला. यानंतर तातडीने आम्ही कार्यवाही सुरु केली. दुष्काळात सापडलेल्या बागांचे गांभिर्य केंद्राच्या नजरेस आणून दिले. पाठपुरावा करुन केंद्राच्या अधिकाऱ्यांना पहाणी करण्यासाठी बोलवले. यातूनच पुढे दुष्काळग्रस्त फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठीचे पॅकेज तयार झाले. या प्रश्‍नाची, समस्येची जाणीव ऍग्रोवनने करुन दिली. यातून राज्यातील दुष्काळग्रस्त फळपिकधारकांसाठी सुमारे 660 कोटी रुपयांची मदत वाटण्यात आली. सुरवात मोसंबी पासून झाली, त्याचा फायदा सर्वांनाच झाला.

महाराष्ठ्राच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ऍग्रोवनचे कार्य अतिशय महत्वाचे ठरत आहे. कृषी विस्ताराचे प्रभावी माध्यम म्हणून ऍग्रोवन गेली 10 वर्षे महत्वाची भुमिका बजावत आहे. माझ्या दृष्टीने ऍग्रोवनचे काम दोन बाबतीत कौतुकास्पद आहे. एक म्हणजे शासनाचे धोरण, भुमिका, योजना व त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम. आणि दुसरे म्हणजे शेतकर्ऱ्यांचा प्रतिसाद, प्रतिक्रीया, अपेक्षा शासनापर्यंत पोचविण्याचे काम. ऍग्रोवन या दोन्ही दृष्टीने एकमेकाद्वितीय आहे. कृषी विस्तारासाठी राज्य व केंद्र शासनाची अनेक विस्तार माध्यमे आहेत. मात्र त्यांचा प्रसिद्धी कालखंड वेगळा आहे. संथ आहे. ऍग्रोवन हे दैनिक असल्याने त्यास रियलटाईम व्हॅल्यू आहे.

कृषी आयुक्त म्हणून गेल्या दोन वर्षापासून मी पाहतोय... ऍग्रोवनने आधुनिक तंत्रज्ञान, मार्केट, शेतकऱ्यांचे नाविन्यपुर्ण उपक्रम, यशोगाथा यास महत्वाचे स्थान दिले आहे. शेतकऱ्यांच्या मनाची शेतीपुरक मशागत करण्याचे, कृषी क्षेत्रात ग्रामीण भागातील युवक, नवीन पिढीला शेतीकडे आकर्षिक करण्याचे काम अतिशय महत्वाचे काम यातून घडत आहे. राज्याच्या शेती क्षेत्रासाठी ऍग्रोवनचे हे मोठे योगदान आहे.
-----------
उमाकांत दांगट, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
-----------

वर्धापनदिन विशेषांक - कैलास ठोळे

""ऍग्रोवन सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र फर्टिलायझर्स डिलर्स असोसिएशन ऍग्रोवनसोबत आहे. संघटनेचे 87 हजार खते, औषधे, बियाणे विक्रेते ऍग्रोवनचे वाचक आहेत. ऍग्रोवनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आमचे नॉलेज अपडेट होते. शासकीय पातळीवर कुठे काय हालचाली चालल्यात, नवीन काय घडतंय, काय येतंय, शासनाचे धोरण काय आहे हे सर्व फक्त ऍग्रोवनमधूनच समजतं. शेतकरी जागृत करण्याचं फार मोठं काम ऍग्रोवन करतोय. शेती संबंधीत प्रत्येक ठिकाणी ऍग्रोवन जातो. त्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी खुप वाढते. लहान मुद्दा जरी छापून आला तरी त्याची ताबडतोप दखल घेतली जाते.

संघटनेने उपस्थित केलेले अनेक विषय, प्रश्‍न ऍग्रोवनने उचलून धरले. तडीस नेले. कापसाच्या बियाण्याची किमती हे त्याचे उत्तम उदाहरण. कापूस बियाण्याचे दर कमी करावेत ही मागणी संघटनेने केली. ऍग्रोवनने ती लावून धरली. शासनानेही तो मुद्दा उचलला आणि बियाण्याच्या किमती कमी झाल्या. राज्यातील शेतकर्यांचा यामुळे कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला. ऍग्रोवन हे आमचे मुखपत्र आहे, एवढा आमचा ऍग्रोवनबद्दल विश्‍वास वाटतो. बाकी पेपर रद्दीत जातात. ऍग्रोवन कधीच रद्दीत जात नाही. कधी काही संदर्भ लागेल तो ऍग्रोवनमध्ये लगेच सापडून जातो. कृषी क्षेत्रात ऍग्रोवन सर्वाधिक उत्कृष्ट आणि एकमेकाद्वितीय आहे.''

कैलास ठोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर्स डिलर्स असोसिएशन
--------------- 

वर्धापनदिन विशेषांक - कोट संदीप केवटे

ऍग्रोवन हे आमचे हक्काचे एकमेव व्यासपीठ आहे. अनेकदा ऍग्रोवनच आमचे विषय, प्रश्‍न आमच्या आधी उपस्थित करतो. कृषी सहायक संघटनेच्या सर्व आंदोलनामध्ये ऍग्रोवनने हिरारीने भाग घेवून पाठपुरावा केला. वेळोवेळी आयुक्त, सचिव, मंत्री यांच्यापर्यंत आमच्या अडचणी पोचवून त्यावर उपाय काढण्याचे काम केले. राज्यातील शिक्षणसेवकांचे मानधन वाढले, मात्र कृषी सेवकांचे मानधन वाढविण्यास टाळाटाळ केली जात होती. त्या वेळी हा प्रश्‍न अतिशय प्रभावीपणे उचलून धरत ऍग्रोवन आमच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहीला. यामुळेच कृषी सेवकांची मानधनवाढ शक्‍य झाली. अशी अनेक उदाहरणे आहेत. ऍग्रोवन हे आमचे प्ररणास्थान आहे. ऍग्रोवनशिवाय दिवस सुरु होत नाही. राज्यभरातील शेतकर्यांचे प्रयोग, यशोगाथा, उपक्रम बातम्यांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा आम्हालाही प्रेरणा मिळते. राज्यातील सर्व कृषी सहायकांकडून ऍग्रोवनच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
----------
संदीप केवटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना.
-------- 

कोल्हापूर, सांगलीत रविवारी "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रे

सकाळ - कोल्हापूर आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

पुणे (प्रतिनिधी) ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) कोल्हापूर व सांगलीमध्ये अनुक्रमे एकरी शंभर टन ऊस उत्पादन व द्राक्ष एप्रिल छाटणी नियोजन या विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे सर्वांसाठी मोफत खुली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील चर्चासत्र पन्हाळा तालुक्‍यातील दिगवडे येथे प्रकाश कुलकर्णी यांच्या मळ्यात सकाळी साडेदहा वाजता सुरु होणार आहे. "एकरी शंभर टन ऊस उत्पादन आणि सेंद्रीय शेतीचे महत्व' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात कोल्हापूरातील प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्राचे डॉ. डी. एम. वीर मार्गदर्शन करणार आहेत. ग्रीनलॅंन्ड प्रा. लि. हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

सांगली जिल्ह्यातील चर्चासत्र तासगाव तालुक्‍यातील राजापूर गावातील गणेश मंदीराच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता सुरु होईल. "द्राक्ष एप्रिल छाटणी नियोजन' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात द्राक्षतज्ज्ञ एस. टी. शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. निसर्ग फर्टिलायझर्स प्रा. लि. हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत. शेतकर्यांना आपल्या पिकाविषयीच्या समस्यांवर थेट तज्ज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी या चर्चासत्रांतून उपलब्ध होणार आहे.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
--------(समाप्त)------- 

नागपूर - "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्र

नागपूर सकाळ साठी
---------------
पुणे (प्रतिनिधी) ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) काटोल तालुक्‍यातील पारडसिंगा येथे कपाशी पिकाचे व्यवस्थापन या विषयावरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरमधील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ डॉ. सौ. विनिता गोटमारे या चर्चासत्रात शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मातोश्री कौसल्याबाई सोमकुंवर सभागृहात सकाळी 11 वाजता या चर्चासत्राचा प्रारंभ होणार आहे.

कापूस पिक उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान, सघन कापूस लागवड, देशी वाण उपलब्धता, किड व रोग व्यवस्थान, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे कापूसविषयक नवीन उपक्रम आणि त्यातील शेतकरी सहभाग आदी विषयक माहिती या चर्चासत्रात देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकर्यांना आपल्या कापूस पिकाविषयीच्या समस्यांवर थेट शास्त्रज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी मोफत खुले आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

*चौकट
ठिकाण - मातोश्री कौसल्याबाई सोमकुंवर सभागृह, पारडसिंगा, ता. काटोल
वेळ - सकाळी 11
विषय - कपाशी पिक व्यवस्थापन
वक्ते - डॉ. सौ. विनिता गोटमारे, शास्त्रज्ञ, सीआयसीआर, नागपूर
--------(समाप्त)-------- 

औरंगाबाद, उस्मानाबादमध्ये "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्र


सकाळ - औरंगाबाद आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

पुणे (प्रतिनिधी) ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) औरंगाबाद व उस्मानाबादमध्ये अनुक्रमे आले व ऊस पिके आणि ठिबक सिंचन विषयक "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी मोफत खुले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील चर्चासत्र कन्नड तालुक्‍यातील चिंचोली लिंबाजी येथिल धारेश्‍वर शिक्षण व कला वाणिज्य महाविद्यालयात सकाळी साडेनऊ वाजता सुरु होणार आहे. "आले पीक व्यवस्थापन व ठिबक सिंचनाचे महत्व' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात प्रगतिशिल शेतकरी दीपक चव्हाण आणि नेटाफीम इरिगेशन कंपनीचे कृषीतज्ज्ञ रमाकांत गोळे शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील चर्चासत्र उमरगा येथिल महादेव मंदीराच्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल. "ऊस व्यवस्थापन व ठिबक सिंचनाचे महत्व' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात नॅचरल शुगरचे संचालक पांडुरंग आवाड व नेटाफिम इरिगेशन कंपनीचे कृषीतज्ज्ञ विजय आग्रे मार्गदर्शन करणार आहेत. शेतकर्यांना आपली पिके व सुक्ष्म सिंचन विषयक समस्यांवर थेट तज्ज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी या चर्चासत्रांतून उपलब्ध होणार आहे. सिद्धीविनायक एंटरप्रायजेस (नेटाफीम डिलर) हे या दोन्ही चर्चासत्रांचे प्रायोजक आहेत.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
--------(समाप्त)--------

पारनेर, नेवासा येथे रविवारी "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रे

सकाळ - नगर आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

नगर, ता. 17 ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) पारनेस व नेवासा तालुक्‍यांत डाळींब पिक विषयक "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे सर्वांसाठी मोफत खुली आहेत.

पारनेर तालुक्‍यातील चर्चासत्र भाळवणी येथिल विविध कार्यकारी सोसायटीच्या हॉलमध्ये सकाळी नऊ वाजता सुरु होणार आहे. "डाळिंब शेती नियोजन व खत व्यवस्थापन' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ श्री. प्रमोद देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. दीपक फर्टिलायझर्स हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

नेवासा तालुक्‍यातील चर्चासत्र कुकाणा (चिलेखनवाडी) येथिल तालुका फळरोप वाटिकेत सकाळी नऊ वाजता सुरु होईल. "डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात नेवासा येथिल कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ श्री नंदकिशोर दहातोंडे मार्गदर्शन करणार आहेत. नेवासा तालुक्‍यातील आत्मा विभाग हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत. शेतकर्यांना डाळींब पिकाविषयीच्या समस्यांवर थेट तज्ज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी या चर्चासत्रांतून उपलब्ध होणार आहे.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
--------(समाप्त)-------

कळवणमध्ये रविवारी "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रे

सकाळ - नाशिक आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

नाशिक, ता. 17 ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) कळवण तालुक्‍यातील कनाशी येथे मिरची व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान या विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कनाशीमधील जय योगेश्‍वर मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता चर्चासत्राला प्रारंभ होणार आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी मोफत खुले आहे.

चर्चासत्रात नाशिकमधील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक तुषार उगले शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकर्यांना मिरची व इतर भाजीपाला पिकांतील नवीन तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, उत्पादकता आणि गुणवत्तावाढीची सुत्रे या चर्चासत्रातून आत्मसाद करता येणार आहेत. तज्ज्ञांशी थेट संवाद साधून आपल्या भाजीपाला पिकविषयक समस्यांवर उपाय मिळवण्यासाठीही हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे. दीपक फर्टिलायझर्स हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

*चौकट
चर्चासत्र विषय - मिरची व भाजीपाला उत्पादन तंत्र
वक्ते - प्रा. तुषार उगले, के.के.वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक
ठिकाण - जय योगेश्‍वर मंगल कार्यालय, कनाशी, ता. कळवण, जि. नाशिक
वेळ - सकाळी 10.30
--------(समाप्त)-------

जळगाव, धुळे येथे रविवारी "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रे

सकाळ - जळगाव आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

जळगाव, ता. 17 ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) जळगाव व धुळे येथे अनुक्रमे केळी लागवड व व्यवस्थापन आणि कापूस पिकाची लागवड व व्यवस्थापन या विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांना आपल्या पिकाविषयीच्या समस्यांवर थेट तज्ज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी या चर्चासत्रांतून उपलब्ध होणार आहे. ही चर्चासत्रे सर्वांसाठी मोफत खुली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील चर्चासत्र चोपडा तालुक्‍यातील वेळोदे येथील श्रीराम मंदीरात सकाळी साडेआठ वाजता सुरु होणार आहे. त्यात "केळी लागवड व व्यवस्थापन' हा या विषयावर केळी तज्ज्ञ के. बी. देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. धुळे जिल्ह्यातील चर्चासत्र शिरधाणे गावातील हनुमान मंदीराच्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल. "कापूस पिकाची लागवड व व्यवस्थापन' हा या चर्चासत्राचा विषय असून त्यात जळगावमधील तेलबिया संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजीव शामराव पाटील मार्गदर्शन करणार आहेत. दीपक फर्टीलायझर्स हे या दोन्ही चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
--------(समाप्त)-------

मोहळमध्ये रविवारी "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्र

सकाळ - सोलापूर आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

सोलापूर, ता. 17 ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) मोहळ येथील शहाजीराव पाटील सभागृहात मृद व जलसंधारणाचे महत्व आणि पिक नियोजन या विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांना आपल्या माती, पाणी व पिकविषयक समस्यांवर थेट तज्ज्ञांशी संवाद साधून उपायही मिळविण्याची संधी या चर्चासत्रातून उपलब्ध होणार आहे.

चर्चासत्रात सोलापूरमधील विभागिय कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. एस. के. उपाध्ये यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्र सकाळी दहा वाजता सुरु होणार असून ते सर्वांसाठी मोफत आहे. बीके एंटरप्रायजेस हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

- चौकट
चर्चासत्र विषय - मृद व जलसंधारणाचे महत्व व पीक नियोजन
वक्ते - प्रा. एस. के. उपाध्ये, विभागिय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर
वेळ - सकाळी 10
ठिकाण - शहाजीराव पाटील सभागृह, मोहोळ, सोलापूर
--------(समाप्त)-------

इंदापूरमध्ये रविवारी "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्र

सकाळ - पुणे आवृत्तीसाठी
--------------
ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त आयोजन

पुणे, ता.१७ ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) इंदापूरमधील शेळगाव येथे क्षारयुत्त पाणी शेतीसाठी उपयुक्त करण्याचे तंत्रज्ञान या विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांना आपल्या शेतीसाठीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतच्या समस्यांवर थेट तज्ज्ञांशी संवाद साधून उपाय मिळविण्याची संधी या चर्चासत्रातून उपलब्ध होणार आहे.

शेळगावमधील भैरवनाथ सोसायटीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता चर्चासत्रास प्रारंभ होईल. जलतज्ज्ञ संतोष मधुकर खुरसाळे हे या चर्चासत्रात शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डिस्केल वॉटर कन्डिशन हे या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत. चर्चासत्र सर्वांसाठी मोफत खुले आहे. विभागातील अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

येत्या 20 एप्रिल रोजी दै. ऍग्रोवन 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांमध्ये शेतकर्यांना मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

-चौकट
चर्चासत्र विषय - क्षारयुक्त पाणी शेतीसाठी उपयुक्त करण्याचे तंत्रज्ञान
वक्ते - संतोष मधुकर खुरसाळे, जलतज्ज्ञ
वक्ते - सकाळी 10
ठिकाण - भैरवनाथ सोसायटी हॉल, शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे
--------(समाप्त)-------

टंक, लघुलेखक भरतीची चाचणी

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी विभागामार्फत केंद्रीय पद्धतीने घेण्यात आलेल्या लघुलेखक व टंकलेखक पदाच्या सरळसेवा भरतीत 45 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी परिक्षा शनिवारी (ता.19) व रविवारी (ता.20) पुण्यातील महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेत होणार आहे. या परिक्षेसाठी अद्याप प्रवेशपत्र न मिळालेल्या उमेदवारांनी कृषी आयुक्तालयातील (साखर संकुल) आस्थापना विभागाच्या सहसंचालक कार्यालयातून प्रवेशपत्रे घेवून चाचणी परिक्षेस उपस्थित रहावे असे आवाहन आस्थापना विभागामार्फत करण्यात आले आहे.

कृषी आयुक्तालय व त्याअंतर्गतच्या कार्यालयांमध्ये गट क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक या संवर्गाची केंद्रीय पद्धतीने सरळसेवेची रिक्तपदे भरतीची लेखी परिक्षा 23 नोव्हेंबर 2013 रोजी घेण्यात आली. या परिक्षेत किमान 45 टक्के गुण मिळवलेले उमेदवार व्यावसायिक चाचणी परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. ही परिक्षा शनिवार व रविवारी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद (17, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे 1) येथे होणार आहे. कृषी आयुक्तालयामार्फत परिक्षेची प्रवेशपत्रे संबधीत उमेदवारांना पोष्टाने पाठविण्यात आली आहेत.

वरिल पदांसाठी आवश्‍यक टंकलेखन व लघुलेखनाच्या किमान वेग मर्यादा विचारात घेऊन टंकलेखन मराठी किंवा इंग्रजी 20 गुणांची व लघुलेखन मराठी किंवा इंग्रजी 20 गुणांची व्यावसायिक चाचणी परिक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना पोष्टाने पाठविण्यात आलेले प्रवेशपत्र मिळाले नसल्यास ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला आहे, त्याचा पुरावा कृषी सहसंचालक (आस्थापना) कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर यांच्याकडे सादर करुन परिक्षेपुर्वी एक तास अगोदरपर्यंत प्रवेशपत्र उपलब्ध करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः 020 25510983
----------------------

Friday, April 18, 2014

2065 मंडळांमध्ये पाऊस मोजण्याची स्वयंचलित यंत्रणा


पुणे (प्रतिनिधी) ः तहसीलदार कचेरीत पडलेला पाऊस म्हणजेच संपूर्ण तालुक्‍यात पडलेला पाऊस ही गेल्या वर्षानुवर्षाची पद्धत आता मोडीत निघणार आहे. खुद्द महसूल विभागानेच ही सुधारणा करत राज्यातील सर्व 2065 मंडळांमध्ये पाऊस मोजण्याची स्वयंचलित यंत्रणा (ऍटोमॅटिक रेनगेज) बसवली आहे. यामुळे पावसाची आकडेवारी अधिक वास्तवदर्शी होणार आहे. गेल्या पावसाळ्यात मंडल स्तरावर हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर येत्या पावसाळ्यात त्याचे महत्व आणखी वाढणार आहे.

मंडळ स्तरावर पाऊस मोजण्याची मागणी केली अनेक वर्षे करण्यात येत होतील. गेली दोन वर्षे त्याबाबत कृषी विभागाकडून महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर तत्कालिन मुख्य सचिव जयंत बाठीया यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना दिलेल्या सुचनांनुसार सर्व महसूल मंडळांमध्ये ऍटोमॅटिक रेनगेज बसविण्यात आली. कृषी विभागामार्फत या रेनगेजने नोंदविलेल्या आकडेवारीचे संकलन व पृथःकरण करण्यात येत आहे. यासाठी एनआयसीकडून विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

मंडळाच्या ठिकाणच्या तलाठ्याकडे रेनगेजची आकडेवारी कळविण्याची अधिकृत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नोंदणीकृत मोबाईलवरुन संबंधीत तलाठी ही माहिती पावसाळ्या दररोज अद्ययावत करतात. यंदा बदली झालेल्या तलाठ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरु आहे. निवडणूकीनंतर संबंधीत कर्मचार्यांसाठी प्रशिक्षणही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य सांख्यिक अनिल बनसोडे यांनी दिली.

मंडळ स्तरावर बसविण्यात आलेली ही सर्व पर्जन्यमापके प्रत्येकी सुमारे 15 ते 20 हजार रुपये किमतीची आहेत. यापुर्वीच्या पर्जन्यमापकांप्रमाणे नरसाळे बदलण्याचे किंवा मोजमापात चुका होण्याच्या धोके यात नाहीत. स्वयंचलित पद्धतीने पाऊस मोजला जात असल्याने आकडेवारी अधिक बिनचुक मिळण्यास मदत होते. गेल्या वर्षी जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत मंडळ स्तरावर पाऊस मोजण्यात आला. यापुढे वर्षभर ही यंत्रणा सुरु ठेवण्याचा प्रयत्न आहे. www.mahaagri.gov.in/rainfall या संकेतस्थळावर एक जूनपासून मंडळनिहाय पावसाची आकडेवारी पाहता येईल, असे श्री. बनसोडे यांनी सांगितले.

*चौकट
अतिवृष्टी, खंडांचे यशस्वी मोजणी
मंडळ स्तरावर पाऊस मोजण्यास सुरवात झाल्याने तालुक्‍याच्या विविध भागात पडलेल्या पावसाचे प्रमाण, अतिवृष्टीची तिव्रता अधिक चांगल्या विश्‍वासाहार्यतेने स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. गेल्या वर्षी कोकण, विदर्भात झालेली अतिवृष्टी, मराठवाडा, खानदेशात पडलेले पावसातील खंड यांचे चित्र तालुकानिहाय पेक्षा मंडळनिहाय पावसाच्या आकडेवारीवरुन अधिक तिव्रतेने स्पष्ट होते. यापुढेही आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मंडळनिहाय आकडेवारी अधिक उपयुक्त ठरणार आहे.

*कोट
""मंडळ स्तरावरील पावसाची आकडेवारी शेतीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची आहे. पुढील तीन वर्षापर्यंत ही आकडेवारी नोंदवल्यानंतर पायाभूत (बेसलाईन) सरासरी तयार होईल. ही सरासरी पिक नियोजनापासून विम्यापर्यंत सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.''
अनिल बनसोडे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय.
-----------(समाप्त)-----------


लोकसभा निवडणूक उत्साहात - मतदानाचा टक्का वाढला

टीम ऍग्रोवन
पुणे ः लोकसभा निवडणूकीच्या दुसर्या टप्प्यात पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातील एकूण 19 लोकसभा मतदारसंघात काल (ता.17) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. यापैकी बहुतेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवारांच्या लढती होत असल्याने चुरशीचे वातावरण होते. अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाची अनिश्‍चिती अधिकच वाढली आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाड, मतदान यादीत नाव नसल्याचे प्रकार घडले. याव्यतिरिक्त सर्व मतदारसंघात सुरळित मतदान पार पडले. दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यात सरासरी 55 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले.

सर्वच मतदारसंघांतील मतदानाला उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा फटका बसला. राज्यभरात अनेक ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदान उत्साहात सुरू होते, पण तापमान वाढले तसे उकाड्यामुळे हळु-हळु मतदानाचा वेगही मंदावला. त्यामुळे दुपारी दोनपर्यंत राज्यात सरासरी 30 ते 35 टक्के इतकेच मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढत गेली. संध्याकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या. रांगेतील सर्वांचे मतदान घेणे बंधनकारक असल्याने वेळ उलटून गेल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदान सुरु होते. यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्‍यता आहे.

- मराठवाडयात उत्साहात मतदान
मराठवाडयातील सहाही मतदारसंघामध्ये मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली. यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 50 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले. उन्हाचा पारा वाढता असल्याने शेतकरी, महिला, युवक व नोकरदार यांनी सकाळच्या वेळेतच मतदान करण्याला पसंती दिली. सकाळी बारा वाजेपर्यंत मतदानला गर्दी झाली होती. दुपारनंतरही बहुतेक मतदानकेंद्रात लांब रांगा लागल्या होत्या. सर्व ठिकाणी सुरळित मतदान पार पडले. मतदारांच्या मोठ्या प्रतिसादामुळे या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याचा अंदाज आहे.

- कोल्हापूर, सांगलीत चुरस
कोल्हापूर-सांगली व हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी दिवसभर अत्यंत चुरशीच्या वातावरणात उत्साहात मतदान सुरु होते. दुपारी तीनपर्यंत सांगली-कोल्हापूरसाठी 50 तर हातकणंगलेसाठी 55 टक्के मतदान झाले. हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी तालुक्‍यातील सोनूर्ले गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी लवकर शेतात जाणारे शेतकरी, शेतमजूर यांनी सकाळी मतदान करुनच कामाला जाण्यास पसंती दिल्याने आठ वाजल्यापासून बहुतांशी ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र होते. यानंतर मतदारांना बाहेर काढण्यासाठी उमेदवार प्रतिनिधींची धावपळ सुरु झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने दुष्काळी भागात मतदानाचा जोर कमी होता. तर पूर्वेकडील भागात चुरशीने मतदान झाले. दुपारी तीन पर्यंत सांगलीत पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान झाले. सांगली व मिरजच्या पुर्वभागात दुपारी पावसामुळे सुमारे एक तास मतदान प्रक्रीया विस्कळित झाली.

- सोलापूर, माढ्यात कडक उन्हातही मतदारांच्या रांगा
सोलापूर व माढा मतदारसंघांमध्ये ऊन्हाचा कडाखा जाणवत असतानाही ग्रामीण भागात अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र होते. सोलापूर मतदारसंघात 45 हजार आणि माढ्यात सुमारे सव्वा लाखापर्यंत नव्याने मतदारांची नोंदणी झाली आहे. त्याचा परिणाम मतदानाचा टक्का वाढण्यावर झाल्याचे सांगितले जाते. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर भागात सकाळी मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यात महिलांची संख्या अधिक होती. माढा मतदरसंघात करकंब, टेंभुर्णी, अकलूज, करमाळा, माढा येथे मतदानासाठी मोठी चुरस दिसून आली. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यात येथेही मतदारांची गर्दी दिसली. दुपारी मात्र उन्हामुळे काहीशा संथगतीने मतदान सुरु होते. एकूणच सर्वत्र चुरस दिसून आली.

- पुण्यात दुपारनंतर गर्दी
पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये दुपारी तीन पर्यंत अवघे 30 ते 35 टक्‍क्‍यांदरम्यान मतदान झाले. दुपारनंतर मात्र मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेतली. यामुळे अवघ्या दीड दोन तासात सायंकाळी पाच पर्यंत चारही मतदारसंघांमध्ये 50 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. पुणे शहरात मतदान यंत्र बिघाडाचे काही प्रकार घडले. मतदारांनी तक्रार केल्यानंतर ही यंत्रे बदलण्यात आली. शिरुर, पुणे व मावळ या तिन मतदारसंघांत अधिक चुरशीचे वातावरण होते. ग्रामिण भागातही पोलिसांच्या कडक पहारा व गस्त सुरु होती. मतदान केंद्र परिसरातील सर्व दुकाने, गर्दीची ठिकाणे र्निमनुष्य करण्यात आली होती.

- मातब्बरांचे भवितव्य पेटीबंद
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे, शिवाजीराव आढळराव पाटील, कल्लापाण्णा आवाडे, धनंजय महाडीक, केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, डॉ पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रियाताई सुळे, राजीव सातव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील आदी मातब्बरांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले.

- अंतिम टप्पा येत्या गुरुवारी
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उर्वरीत 19 मतदारसंघात पुढील आठवड्यात गुरुवारी (दि.24) होणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश आहे.
------
मतदारसंघनिहाय मतदान (सायंकाळी 5 पर्यंत)
पुणे - 51.20 टक्के
बारामती - 50.44 टक्के
मावळ - 50.65 टक्के
शिरुर - 53 टक्के
सातारा - 50.32 टक्के
नांदेड - 55.30 टक्के
परभणी - 55.79 टक्के
हिंगोली - 58.27 टक्के
उस्मानाबाद - 55.61 टक्के
लातूर - 57.88 टक्के
बीड - 55.62 टक्के
नगर - 50 टक्के
शिर्डी - 50 टक्के
सोलापूर - 48 टक्के
माढा - 53 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 53.43 टक्के
सांगली - 60 टक्के
कोल्हापूर - 62 टक्के
हातकणंगले - 61 टक्के
---------(समाप्त)------------

ऍग्रोवन वर्धापनदिनानिमित्त "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रे

अॅग्रोवनसाठी
---------------
पुणे (प्रतिनिधी) ः दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या रविवारी (ता.20) राज्यात ठिकठिकाणी विविध जलव्यवस्थापन, पिकव्यवस्थापन, फलोत्पादन आदी विषयांवरील "ऍग्रोवन संवाद' चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवर तज्ज्ञांकडून भाजीपाला, केळी, डाळींब, कापूस, द्राक्ष, आले, ऊस आदी पिकांचे उच्चांकी उत्पादन घेण्याची गुरुकिल्ली मिळविण्याची संधी या चर्चासत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या भागातच उपलब्ध होणार आहे.

दीपक फर्टिलायझर्स, नेवासा आत्मा विभाग, डिस्केल वॉटर कन्डिशन, बीके एंटरप्रायजेस, ग्रीनलॅंन्ड प्रा.लि., निसर्ग फर्टिलायझर्स प्रा. लि. व सिद्धीविनायक एंटरप्रायजेस (नेटाफीम डिलर) हे या चर्चासत्रांचे प्रायोजक आहेत. ही सर्व चर्चासत्रे मोफत असून अधिकाधिक शेतकरी व कृषी संबंधीत व्यक्तींनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व प्रायोजकांमार्फत करण्यात आले आहे.

चर्चासत्रांचे ठिकाणे, वेळ, विषय व वक्ते पुढीलप्रमाणे...
ठिकाण - विविध कार्यकारी सोसायटी हॉल, भाळवणी, ता. पारनेर, जि. नगर
वेळ - सकाळी 9
विषय - डाळिंब शेती नियोजन व खत व्यवस्थापन
वक्ते - प्रमोद देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

ठिकाण - तालुका फळरोप वाटिका कुकाणा (चिलेखनवाडी), ता. नेवासा, ता. जि. नगर
वेळ - सकाळी 9
विषय - डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान
वक्ते - नंदकिशोर दहातोंडे, कृषी विज्ञान केंद्र नेवासा

ठिकाण - श्रीराम मंदीर, वेळोदे, ता. चोपडा, जि. जळगाव
वेळ - सकाळी 8.30
विषय - केळी लागवड व व्यवस्थापन
वक्ते - के. बी. देशमुख, केळी तज्ज्ञ

ठिकाण - जय योगेश्‍वर मंगल कार्यालय, कनाशी, ता. कळवण, जि. नाशिक
वेळ - सकाळी 10.30
विषय - मिरची व भाजीपाला उत्पादन तंत्र
वक्ते - प्रा. तुषार उगले, के.के.वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक

ठिकाण - हनुमान मंदीर हॉल, शिरधाणे, ता. जि. धुळे
वेळ - सकाळी 9.30
विषय - कापूस पिकाची लागवड व व्यवस्थापन
वक्ते - डॉ. संजीव शामराव पाटील, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव

ठिकाण - भैरवनाथ सोसायटी हॉल, शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे
वेळ - संतोष मधुकर खुरसाळे, जलतज्ज्ञ
विषय - क्षारयुक्त पाणी शेतीसाठी उपयुक्त करण्याचे तंत्रज्ञान
वक्ते - सकाळी 10

ठिकाण - शहाजीराव पाटील सभागृह, मोहोळ, सोलापूर
वेळ - सकाळी 10
विषय - मृद व जलसंधारणाचे महत्व व पीक नियोजन
वक्ते - प्रा. एस. के. उपाध्ये, विभागिय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर

ठिकाण - प्रकाश कुलकर्णी यांचा मळा, दिगवडे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
वेळ - सकाळी 10
विषय - एकरी 100 टन उत्पादन व सेंद्रीय शेतीचे महत्व
वक्ते - डॉ. डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

ठिकाण - गणेश मंदीर हॉल, राजापूर, ता. तासगाव, जि. सांगली
वेळ - सायंकाळी 5.30
विषय - द्राक्ष एप्रिल छाटणी नियोजन
वक्ते - एस.टी.शिंदे, द्राक्षतज्ज्ञ

ठिकाण - धारेश्‍वर शिक्षण व कला वाणिज्य महाविद्यालय, चिंचोली लिंबाजी,ता. कन्नड, जि. औरंगाबाद
वेळ - सकाळी 9.30
विषय - आले पीक व्यवस्थापन व ठिबक सिंचनाचे महत्व
वक्ते - दीपक चव्हाण, प्रगतशिल शेतकरी व रमाकांत गोळे, कृषीतज्ज्ञ, नेटाफीम

ठिकाण - महादेव मंदीर सभागृह, महादेव गल्ली, उमरगा, जि. उस्मानाबाद
वेळ - सकाळी 9.30
विषय - ऊस व्यवस्थापन व ठिबक सिंचनाचे महत्व
वक्ते - पांडुरंग आवाड, संचालक नॅचरल शुगर व विजय आग्रे, कृषीतज्ज्ञ, नेटाफीम

ठिकाण - मातोश्री कौसल्याबाई सोमकुंवर सभागृह, पारडसिंगा, ता. काटोल, जि. नागपूर
वेळ - सकाळी 11
विषय - कपाशी पिकाचे व्यवस्थापन
वक्ते - डॉ. सौ. विनिता गोटमारे, शास्त्रज्ञ, सीआयसीआर, नागपूर.
--------(समाप्त)--------


Wednesday, April 16, 2014

19 मतदारसंघांत आज मतदान

358 उमेदवार रिंगणात

पुणे (प्रतिनिधी) ः कोकणातील एक, मराठवाड्यातील सहा आणि मध्य महाराष्ट्रातील 12 अशा एकूण 19 लोकसभा मतदारसंघात आज (ता.17) 16 व्या लोकसभेसाठी मतदान होत आहे. निवडणूकीच्या या दुसऱ्या टप्प्यात एकूण 358 उमेदवार या निवडणूकीत आपले कर्तृत्व आजमावत असून त्यात 24 महिला आणि 201 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सुमारे 36 हजार 879 मतदार केंद्रांमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान मतदान होणार आहे.

ेदेशातील 12 राज्यातील लोकसभेच्या 121 जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. यात कर्नाटकातील सर्वाधिक 28, राजस्थानमधील 20, ओदिशा व उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी 11 तर मध्य प्रदेशमधील 10 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील 10 जागांसाठी यापुर्वीच मतदान पार पडले असून 19 जागांसाठी आज तर उर्वरीत 19 जागांसाठी 24 एप्रिलला मतदान होणार आहे. आज होणार्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 44 हजार 225 मतदान यंत्र वापरण्यात येणार असून त्यांच्या संरक्षणासाठी दोन लाख 76 हजार 5922 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

काही अपवाद वगळता राज्यात आज होणाऱ्या बहुतेक लढती चुरशीच्या होण्याची शक्‍यता आहे. सुप्रिया सुळे, गोपिनाथ मुंडे, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, सुरेश धस, शिवाजीराव आढळराव पाटील, निलेश राणे, पद्मसिंह पाटील, उदयनराजे भोसले, शेतकरी नेते राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत आदींचे राजकीय भवितव्यावर आज मतदारांकडून शिक्कामोर्तब होणार आहे. त्यातही माढा, बीड, शिरुर, पुणे, हातकणंगले, नांदेड, सातारा येथिल लढतींकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
------------(समाप्त)----------

मराठवाडा पुन्हा टंचाईच्या उंबरठ्यावर

पाणीसाठा 30 टक्‍क्‍यांवर; दोन महिन्यांचे आव्हाण

पुणे (प्रतिनिधी) ः कोकण, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चांगला पाणीसाठा शिल्लक असताना भूजलापाठोपाठ भुपृष्ठावरील जलसाठ्यांनाही ओहोटी लागल्याने मराठवाड्यातील बहुतेक जिल्हे पुन्हा एकदा टंचाईच्या उंबरठ्यावर उभे राहीले आहेत. जायकवाडीसह मराठवाड्यातील अनेक धरणांच्या साठ्यात वेगाने घट सुरु असून पुढील दोन महिने पाणी कसे पुरवायचे हा प्रश्‍न आ वासून उभा राहीला आहे. त्यातल्या त्यात मे महिना अधिक भिषण जाण्याचा धोका आहे.

जलसंपदा विभागाने धरणातील पाणीसाठ्याच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सात एप्रिलपर्यंत 41 टक्के पाणी शिल्लक राहीले आहे. नागपूर विभागात सर्वाधिक 51 टक्के, अमरावती विभागात 45 टक्के, कोकणात 44 टक्के, पुण्यात 42 टक्के तर नाशिकमध्ये 40 टक्के जलसाठा शिल्लक आहे. याउलट मराठवाड्यात मात्र जलसाठ्यात वेगाने घट सुरु असून तेथे अवघा 32 टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या वेळी आठ टक्के साठा शिल्लक होता. उर्वरीत विभागांमध्ये जलसाठ्यांची गेल्या तीन वर्षातील सर्वात चांगली स्थिती असताना मराठवाड्यात मात्र जलसाठे कोरडे पडण्यास सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी चांगला पाणीसाठा असलेल्या मांजरा व इतर धरणांच्या साठ्यात यंदा चिंताजनक घट झाली आहे.

उत्तर मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली नाशिक जिल्ह्यातील धरणेही उपयुक्त पाणीसाठ्याच्या दृष्टीने वेगाने रिकामी होत असल्याचे चित्र आहे. भंडारदरा, गंगापूर, दारणा, करंजवण, मुळा व चणकापूर धरणांचा अपवाद वगळता नाशिकमधील उर्वरीत सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. यामुळे मराठवाड्यापाठोपाठ नाशिक व खानदेश विभागातही टंचाई वाढण्याची चिन्हे आहेत.

सद्यस्थितीत मांजरा (बीड), निम्न तेरणा, सिना गोळेगाव (उस्मानाबाद), बाघ कालिसरार (भंडारा), लोणावळा (पुणे), वैतरणा (ठाणे), कडवा (नाशिक), निळवंडे (नगर) ही मोठी धरणे उपयुक्त पाणीसाठ्याच्या दृष्टीने कोरडी पडली आहेत. तर जायकवाडी (औरंगाबाद), पोथरा (वर्धा), पालखेड, तिसगाव, पुणेगाव, गिरणा (नाशिक), पिंपळगाव जोगे, टेमघर (पुणे) व धोम बलकवडी (सातारा) या धरणांमध्ये अवघा पाच ते 15 टक्‍क्‍यांच्या आसपास उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.

- जलसंपन्न धरणे
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार सुर्या कवडास (ठाणे) व गोसी खुर्द (भंडारा) ही दोन धरणे सद्यस्थितीत 100 टक्के भरलेली आहेत. यातील सुर्या कवडासमध्ये 10 दशलक्ष घनमिटर तर गोसीमध्ये 300 दशलक्ष घनमिटर साठा आहे. याशिवाय ठाण्यातील सुर्या धामणी (66 टक्के), परभणीतील पूर्णा येलरी (60 टक्के), नांदेडमधील उर्ध्व पेनगंगा (66 टक्के), नागपूरमधील कामठी खैरी (78 टक्के), पेंच रामटेक (65 टक्के), बाघ शिरपूर (62 टक्के), यवतमाळमधील बेंबळा (67 टक्के), बुलडाण्यातील वाण (70 टक्के), रवड (68 टक्के), नाशिकमधील गंगापूर (72 टक्के), जळगावमधील हातनूर (86 टक्के) व वाघूर (83 टक्के) या धरणांमध्ये चांगला भरिव जलसाठा शिल्लक आहे.

- मुंबईचा पाणीसाठी निचांकी पातळीवर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांच्या पाणीसाठ्यात गेल्या वर्षीएवढीच निचांकी घट झाली आहे. गेल्या पाच सहा वर्षातील ही निचांकी पातळी आहे. सर्वसाधारणपणे या वेळी या तलावांमध्ये 90 टक्‍क्‍यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक असतो. मुंबईच्या पाणीपुरवठ्याची मुख्य भिस्त असलेले वैतरणा धरण कोरडे पडले आहे. पाठोपाठ तानसामध्ये 39 टक्के, मोडकसागरमध्ये 23 टक्के, विहारमध्ये 32 टक्के तर तुळशीमध्ये 50 टक्के पाणी शिल्लक राहीले आहे. साठ्याचा विचार करता मुंबईसाठी आता फक्त 100 दशलक्ष घनमिटर पाणी शिल्लक आहे.

- विभागनिहाय जलसाठा
विभाग --- धरणे --- उपयुक्त साठा (द.ल.घ.मी.) --- टक्के
कोकण --- 158 --- 718 --- 44
पुणे --- 368 --- 4319 --- 42
नाशिक --- 350 --- 1882 --- 40
मराठवाडा --- 804 --- 2454 --- 32
नागपूर --- 366 --- 1995 --- 51
अमरावती --- 379 --- 1310 --- 45
इतर --- 16 --- 2534 --- 41
एकूण --- 2441 --- 15212 --- 41
-------------(समाप्त)------------

कृषी विद्यापीठांच्या रचनेचाच होणार फेरविचार

राज्य शासनामार्फत डॉ. अलग समिती स्थापन

पुणे (प्रतिनिधी) ः राज्याच्या कृषी क्षेत्रात होत असलेल्या बदलांची दखल घेवून कृषी विद्यापीठांची उद्दीष्टे आणि कामकाज पद्धतीचा फेरविचार करुन सुधारणांसाठीचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनामार्फत नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. वाय. के. अलग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यात ही समिती आपल्या शिफारशी राज्य शासनास सादर करणार आहे.
-----------------
...अशी आहे उच्चस्तरिय समिती
डॉ. वाय. के. अलग, माजी उपाध्यक्ष, नियोजन आयोग, भारत सरकार (अध्यक्ष)
डॉ. वाय. एस. पी. थोरात, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कोरडवाहू शेती अभियान (उपाध्यक्ष)
उमाकांत दांगट, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
एकनाथ डवले, पशुसंवर्धन आयुक्त, महाराष्ट्र राज्य
डॉ. एस. एन. पुरी, कुलगुरु, केंद्रीय कृषी विद्यापीठ, इंफाळ
डॉ. सी. डी. मायी, माजी अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ
डॉ. एस. ए. पाटील, माजी संचालक, भारतीय कृषी संशोधन संस्था, अध्यक्ष, कर्नाटक कृषी अभियान
डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
डॉ. शंकरराव मगर, माजी कुलगुरु, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
डॉ. एस. एस. कदम, माजी कुलगुरु, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी
डॉ. उत्तम कदम, शिक्षण संचालक, कृषी परिषद (सदस्य सचिव)
------------------
... समितीच्या मदतीसाठी
चारही कृषी विद्यापीठे व माफसूचे विद्यमान कुलगुरु, हैदराबादमधील अखिल भारतीय कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाचे समन्वयक डॉ. व्हि. यु. एम. राव, आयसीएआरच्या कृषी यंत्रे व शक्ती विभागाचे माजी प्रकल्प संचालक डॉ. सुरींदर सिंग, आयसीएआरच्या काढणी पश्‍चात तंत्रज्ञान माजी प्रकल्प संचालक डॉ. आर. टी. पाटील, गोकुळ सहकारी दुघ संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके, औरंगाबादमधील उद्योजक अतुल बंगीनवार हे या समितीसाठी मदतनिसाची भुमिका पार पाडणार आहेत.
------------------
डॉ. अलग समितीची कार्यकक्षा
- मनुष्यबळ विकासासाठीचे बदल, सुधारणा सुचविणे.
- जुन्या अभ्यासक्रमात सुधारणा, नवीन अभ्यासक्रम याबाबत सुचना करणे.
- कृषी उत्पादकता वाढ, उत्पन्नवाढ आणि शेतकऱ्यांचे जिवनमान स्थिरावण्यासाठीचे उपाय सुचविणे.
- साधनसामग्री वापराचे मुल्यांकन करणे व विद्यापीठे स्वयंपूर्ण करण्यासाठीचे मार्ग, साधणांची शिफारस करणे.
- भविष्यातील गरज लक्षात घेवून विद्यापीठांची रचना, मनुष्यबळ, भरती प्रक्रीया, पायाभूत सोईसुविधा याबाबत सुधारणा सुचविणे.
- स्थानिक गरजेभिमुख अभ्यासक्रम, संशोधन, विस्तार, बिजोत्पादन, रोपे, कलमे इत्यादी बाबींचे पुनर्विलोकन करणे.
- शासकीय, अनुदानित, विना अनुदानित कृषी व संलग्न महाविद्यालये, कृषी तंत्रनिकेतन, कृषी तंत्र विद्यालयांचे मुल्यांकन करणे. त्यात केंद्रीय प्रवेश प्रणाली व विद्यार्थी मुल्यांकन पद्धतीचा अंतर्भाव करणे व शिक्षणाची गुणवत्ता सुधारणेसाठी सुचना करणे.
- संशोधन केंद्रांनी केलेल्या कार्याचे मुल्यांकन, सुरु असलेल्या संशोधनाचे परिक्षण करणे व सद्यस्थितीनुसार स्थानिक भाग केंद्रीत सुधारीत उद्दीष्टे ठरवणे. बाजारपेठ व बदलत्या हवामानाशी समन्वय साधून शिफारशी करणे.
- कृषी विद्यापीठांतील तंत्रज्ञान प्रसाराची गती वाढविण्यासाठी सुचना करणे.
------------------
कार्यकक्षेत समाविष्ठ नसलेल्या बाबी
- विद्यापीठांच्या विस्तार कार्याचे मुल्यांकन
- महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे मुल्यांकन
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू)
- शिक्षण, संशोधन व प्रकल्पांचे इम्पॅक्‍ट ऍनालेसीस
------------------
फेरविचार कशासाठी ?
- विद्यापीठे स्थापन होतानाची स्थिती आणि आताची स्थिती यात मोठा फरक. यामुळे उद्दीष्टे, धेय्य धोरणात बदलांची गरज.
- गेल्या दहा वर्षात शेती व संलग्न क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल, या बदलांच्या अनुषंगाने विद्यापीठांतही बदलांचा विचार.
- उथळ, कमी सुपीक जमीनीची कमी उत्पादकता, पावसाचा लहरीपणा, अन्नधान्य उत्पादन, बाजारपेठेत मोठे बदल.
- ग्राहकांच्या अन्न घेण्याच्या पद्धती आणि सवयींमध्ये अमुलाग्र बदल. नवीन पिके, उत्पादने, मुल्यवर्धीत अन्नपदार्थ वाढती मागणी.
- बदलांचा फायदा घेवून कृषी विकास दर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी धोरण व उपाययोजना ठरवणे.
------------------

शेतकरी संघटनांतील राजकीय झुंज टिपेला

साखर कारखानदारांचीही कसोटी; बळीराजाचा कौल ठरणार महत्वाचा 

पुणे (प्रतिनिधी) ः ऊस व इतर शेतमालाच्या भावावरुन साखर कारखानदार व शासनाशी झुंजणाऱ्या राज्यातील शेतकरी संघटना या लोकसभा निवडणूकीत आपापसातच झुंजत आहेत. तर दुसरीकडे आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सहकारी व खासगी कारखानदारांचीही कसोटी लागली आहे. राज्यभरातील बळीराजा गुरुवारी आपल्या मतदानातून या सर्वांच्या राजकीय भवितव्याच्या दशा आणि दिशा निश्‍चित करणार आहे. 

राज्यभर पडघम वाजत असलेल्या या लोकसभा निवडणूकीत राजू शेट्टींची स्वामीभानी शेतकरी संघटना महायुतीच्या झेंड्याखाली तर रधुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना आप चा झाडू हातात घेऊन रिंगणात उतरली आहे. हातकणंगले मतदार संघात शेट्टी व रघुनाथदादा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. स्वाभीमानीचे सदाभाऊ खोत हे साखर कारखाना संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात माढ्यातून कडवी लढत देत आहेत. याशिवाय संघटनांचे अनेक लहानमोठे नेते या निवडणूकीत विविध पक्षांसाठी मोलाची भुमिका पार पाडताना दिसत आहेत. 

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने कार्यकर्त्यांना त्यांना वाटेल त्या पक्षाकडून किंवा पक्षासाठी लढण्याची मोकळीक दिली आहे. यामुळे या संघटनेचे अनेक नेते आप व इतर पक्षांच्या पाठीशी सक्रीयपणे उभे राहीले आहेत. एरवी एकमेकांसमोर येण्याचेही टाळणारे पाशा पटेल व राजू शेट्टी यांनी महायुतीत खांद्याला खांदा लावला आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले व त्यांची पलटण बारामतीत आपचे उमेदवार सुरेश खोपडे यांच्यासाठी जिवाचे रान करत असल्याचे चित्र आहे. 

- साखर कारखानदारांचे वर्चस्व काट्यावर 
नितिन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक सहकारी व खासगी साखर कारखानदारांचे भवितव्य या निवडणूकीत टांगणीला लागले आहे. साखर कारखान्यांशी संबंधीत देवदत्त निकम, प्रतिक पाटील, संजय महाडिक, कलाप्पा आवाडे, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, राजीव राजळे, संजय पाटील, संजय मंडलिक रिंगणात आहेत. यातील बहुसंख्य उमेदवारांनी कारखान्यांच्या माध्यमातून केलेल्या कामाच्याच आधारे मतदारांचा कौल मागितला आहे. 

- पत आणि पैसा पणाला 
याशिवाय सद्यस्थितीत साखर कारखानदारीत पडद्यामागचे मुख्य सुत्रधार असलेल्या माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी फलोत्पादनमंत्री विनय कोरे, कल्लपा आवाडे, विक्रमसिंह घाडगे, आमदार सारे पाटील, सी.डी. नरके, सदाशिव मंडलिक, डी.वाय. पाटील, पतंगराव कदम, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हर्षवर्धन पाटील, यशवंतराव  मोहिते, अभयसिंह राजेभोसले, बाळासाहेब देसाई, रामराजे निंबाळकर, अनंतराव थोपटे, अशोक काळे, अंकुश टोपे या घराण्यांचीही पत आणि पैसाही या निवडणूकीत पणाला लागला आहे. 
---------------------- 

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थंडावला

लोकसभा निवडणूक 2014
-------
19 मतदारसंघात उद्या मतदान

पुणे (प्रतिनिधी) ः देशातील 16 व्या लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 19 लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा प्रचार मंगळवारी (ता.15) सायंकाळी थंडावला. हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, शिर्डी, शिरुर, बारामती, मावळ, पुणे, सोलापूर, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये गुरुवारी (ता.17) मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ आहे.

निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 10 एप्रिलला विदर्भातील 10 मतदारसंघांत मतदान झाले. त्यानंतर गेली पाच दिवस सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दुसर्या टप्प्यातील मतदारसंघ पिंजून काढले. पंतप्रधानपदाचे दावेदार भाजपचे नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गोपिनाथ मुंडे, देवेंद्र फडणविस यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभांमधील आरोप प्रत्यारोप आणि आश्‍वासनांनी मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील हे मतदारसंघ ढवळून निघाले. अगदी शेवटच्या दिवशी आचारसंहीतेच्या अंतिम मुदतीपर्यंत जिल्हा व तालुका तालुक्‍यात सभा सुरु होत्या.

संबंधीत सर्व जिल्हा प्रशासनामार्फत कर्मचार्यांच्या प्रशिक्षणासह मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्यातील 48 पैकी 19 मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. विदर्भातील दहा मतदारसंघात 10 एप्रिलला मतदान पार पडले असून उर्वरीत 19 मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यात 24 एप्रिलला मतदान होणार आहे. या सर्व जागांची मतमोजणी 16 मे रोजी होणार असून मतदानप्रक्रिया 28 मे पर्यंत पूर्ण होणार आहे.

*चौकट
आजची रात्र वैऱ्याची ?
सर्वसाधारणपणे काठावरचे मतदार फिरवण्यासाठी मतदानाच्या आदली रात्र अतिशय महत्वाची समजली जाते. वैयक्तीक भेटीगाठी, घोंगडी बैठका यातून मतदारांना प्रलोभणे दाखवणे, पैसा वा भेटवस्तू वाटप यासारखे गैरप्रकारही या रात्रीच सर्वाधिक घडत असल्याचा पूर्वानुभव आहे. यामुळे आजची रात्र वैऱ्याची रात्र ठरु नये म्हणून बहुतेक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पोलिस प्रशासनानेही हे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आखल्या आहेत. वाड्या वस्त्यांवर, गल्ल्या सोसायट्यांवर नजर ठेवण्यापासून पोलिसांच्या दक्षता फेऱ्या वाढविण्यापर्यंत अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
------
*चौकट
- लक्षवेधी लढती
बीड ः गोपिनाथ मुंडे (भाजप), सुरेश धस (राष्ट्रवादी)
नांदेड ः अशोक चव्हाण (कॉंग्रेस), डी.बी.पाटील (भाजप)
हातकणंगले ः राजु शेट्टी (स्वाभीमानी शेतकरी संघटना), रघुनाथदादा पाटील (आप), कलप्पा आवाडे (कॉंग्रेस)
माढा ः विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी), सदाभाऊ खोत (स्वाभीमानी शेतकरी संघटना)
शिरुर ः शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना), देवदत्त निकम (राष्ट्रवादी)
सातारा ः उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी), राजेंद्र चोरगे (आप), अशोक गायकवाड (महायुती)
नगर ः राजीव राजळे (राष्ट्रवादी), दिलीप गांधी (भाजप)
पुणे ः विश्‍वजित कदम (कॉंग्रेस), अनिल शिरोळे (भाजप), दीपक पायगुडे (मनसे)
--------------

Tuesday, April 15, 2014

अंदाज उत्पादनाचा - भाग 3

उन्हाळी हंगाम सरासरीएवढा

पुणे (प्रतिनिधी) ः खरीप व रब्बी हंगामाच्या तुलनेत अत्यंत नगण्य क्षेत्र असलेल्या उन्हाळी हंगामात जेमतेम सरासरीएवढे उत्पादन मिळण्याचा नजरअंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अंदाज व्यक्त करताना पेरणी किती होईल तर सरासरीएवढी, उत्पादन किती येईल तर सरासरीएवढे असा ढोबळ ठोकताळा कृषी विभागाने मांडला आहे. प्रत्यक्षात अंदाज व्यक्त करण्याआधी सरासरीहून 10 टक्के जास्त पेरणी झाल्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.

कृषी विभागाने खरीप व रब्बी उत्पादनाबरोबरच संभाव्य उन्हाळी हंगाम उत्पादनाचा अहवालही केंद्राला नुकताच सादर केला आहे. यात तेलबियांची 91 हजार हेक्‍टरवर पेरणी होऊन एक लाख 28 हजार टन उत्पादन तर तृणधान्याची 48 हजार हेक्‍टरवर पेरणी होऊन 95 हजार टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात उन्हाळी पिकांखालील सरासरी एक लाख 38 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जेमतेम 75 हजार हेक्‍टरवर पेरणी होऊ शकली होती. यामुळे कृषी विभागाने यंदा सरासरीएवढ्या क्षेत्रावर पेरणीचा अंदाज व्यक्त करत त्यानुसार उत्पादनाचाही अंदाज व्यक्त केला आहे.

प्रत्यक्षात यंदा आत्तापर्यंत एक लाख 51 हजार हेक्‍टरवर (110 टक्के) उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाजापेक्षा 13 हजार हेक्‍टरवर उन्हाळी पिकांची पेरणी अधिक झाली आहे. यामुळे उत्पादनाचा अंदाज बरोबर येण्याची शक्‍यता अधिक वाढली आहे. राज्यात चालू उन्हाळी हंगामात आत्तापर्यंत भाताची 45 हजार हेक्‍टर, मक्‍याची 22 हजार हेक्‍टर तर भुईमुगाची 72 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पिकांची वाढ चांगली आहे.

- उन्हाळी पिकनिहाय उत्पादन अंदाज (2013-14)
पिक --- क्षेत्र --- उत्पादन --- उत्पादकता
भुईमुग --- 0.81 --- 1.19 --- 1471
सुर्यफुल --- 0.06 --- 0.08 --- 890
भात --- 0.31 --- 0.70 --- 2288
मका --- 0.17 --- 0.25 --- 1450

- अंतिम आकडेवारीला अवकाश
कृषी विभागाने खरिप, रब्बी व उन्हाळी हंगामांच्या उत्पादनाचे व्यक्त केलेले हे अंदाज अंतिम नाहीत. अंतिम आकडेवारीत खरिप व रब्बीच्या अंदाजात पाच ते दहा टक्के तर उन्हाळी उत्पादनाच्या आकडेवारीत त्याहून अधिक बदल होण्याची शक्‍यता आहे. खरिपाच्या उत्पन्नाची अंतिम आकडेवारी येत्या जूनपर्यंत, रब्बी उत्पादनाची अंतिम आकडेवारी डिसेंबर 2014 पर्यंत तर उन्हाळी उत्पादनाची अंतिम आकडेवारी पुढच्या वर्षीच्या सुरवातीला निश्‍चित होईल, असे कृषी आयुक्तालयातील सांख्यिकी विभागामार्फत सांगण्यात आले.

- आलेख एकूण वार्षिक उत्पादनाचा (लाख टनात)
पिके --- 2013-14 (अंदाज) --- 2012-13 --- सरासरी (06-07 ते 10-11)
तृणधान्य --- 117.37 --- 88.60 --- 110.60
कडधान्य --- 31.84 --- 23.60 --- 24.90
अन्नधान्य --- 149.21 --- 112.20 --- 135.50
तेलबिया --- 52.94 --- 51.05 --- 37.98
-------------(समाप्त)--------------

Monday, April 14, 2014

विदर्भात उष्मा वाढला

कमाल तापमानाचा पारा 42 अंशांवर; तुरळक ठिकाणी पावसाचाही अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः विदर्भात कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होऊन पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत उंचावला आहे. विभागात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंशांहून अधिक आहे. याच वेळी ढगाळ हवामानात वाढ झाल्याने बुधवारी (ता.16) सकाळपर्यंत विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याची शक्‍यता आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात हवेच्या खालच्या थरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे या दोन्ही विभागांसह राज्यात अनेक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेले आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक एक मिलीमिटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः कोरडे होते.

कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट झाली आहे. उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात वर्धा येथे सर्वात जास्त 42 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून एक ते चार अंश सेल्सिअसने घट झालेली आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी सोमवारी (ता.14) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 31, रत्नागिरी 33.2, पणजी 33.7, डहाणू 31.5, भिरा 40, पुणे 38.1, जळगाव 39.7, कोल्हापूर 37.9, महाबळेश्‍वर 31.5, मालेगाव 40.6, नाशिक 37.2, सांगली 37, सातारा 37.1, सोलापूर 40.5, उस्मानाबाद 38.9, औरंगाबाद 37.5, ुपरभणी 40, नांदेड 40.5, अकोला 40.8, अमरावती 39.8, बुलडाणा 39.2, ब्रम्हपुरी 40.3, चंद्रपूर 33, नागपूर 41.1, वाशिम 40, वर्धा 42, यवतमाळ 39.8
-------------(समाप्त)--------------

पुणे जिल्हा लोकसभा निवडणूक वार्तापत्र

शेती अन्‌ ग्रामविकासाचेही बोला ः पुणे, शिरूर, बारामती, मावळ
-----------
कृषीच्या राजधानीत शेतीप्रश्‍नच उपेक्षित
-----------
संतोष डुकरे
पुणे ही राज्याच्या कृषिक्षेत्राची जणू राजधानीच. केंद्रीय कृषिमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री ते अगदी विधानसभा अध्यक्षही याच जिल्ह्यातले. कृषीविषयक देश व राज्यस्तरीय प्रशासकीय कार्यालये, संशोधन संस्था असलेला हा जिल्हा शेतीबाबतीत कृती व चर्चा या दोन्हीतही कायम आघाडीवर असतो. ऊसशेती, साखर कारखानदारी, बाजार समित्या, दूध संघ व व्यावसायिकांचे व्यापक जाळे हे इथल्या राजकारणाचे बलस्थान. नेमक्‍या याच बाबीवर भर देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी गेल्या 10 वर्षांत शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत शेतीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मतांचा जोगवा मागण्यास सुरवात केली आहे. त्या तुलनेत शिवसेना, मनसे, आप व अपक्ष उमेदवारांनी शेतीला फारसे महत्त्व दिले नसल्याचे चित्र आहे.

शिरूर, बारामती, पुणे व मावळ या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये पुणे जिल्हा विभागलेला आहे. सुप्रिया सुळे यांचा जनसंपर्क व काम यामुळे बारामतीतील लढत एकतर्फी वाटत असली, तरी उर्वरित तीनही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती आहेत. काही प्रमाणात पुणे शहराचा अपवाद सोडला तर उर्वरित सर्व भाग व मोठी लोकसंख्या शेतीबहुल आहे. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍नही अनेक आहेत. मात्र, बहुतेक उमेदवारांनी शेतीचे वा पाण्याचे मुद्दे आपल्या अजेंड्यावर तर दूर, पण चर्चेतही आणलेले नाहीत.

बारामती ः पारडे जड; पण प्रश्‍न कायम
जिल्ह्यात शेतीच्या दृष्टीने बारामती हा सर्वांत एकतर्फी मतदारसंघ आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे हा मतदारसंघ आघाडीसाठी एकतर्फी ठरणार आहे. व्यापक जनसंपर्क, महिला बचत गट, युवती अभियान, दुष्काळ निवारण आणि पाणलोट विकासाच्या माध्यमातून झालेले काम यामुळे सुप्रिया सुळे यांचे पारडे जड आहे. मात्र, याच वेळी खडकवासला भागात वाढते शहरीकरण, भोर व वेल्हा तालुक्‍यात "धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी असलेली स्थिती, मुळशीमध्ये वाढती जमीन खरेदी-विक्री आणि त्या माध्यमातून वाढलेली गुन्हेगारी हे शेतकऱ्यांच्या चिंतेचे विषयही या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. डाळिंब व द्राक्षाचे मोठे क्षेत्र असलेल्या इंदापूरमध्ये सिंचनाबरोबरच शेतीच्या पायाभूत सुविधांचा प्रश्‍नही महत्त्वाचा आहे.

शिरूर ः बिगरशेती प्रकल्प जोमात
भाजीपाला आणि उसाचे आगार असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) यांच्यात आहे. श्री. निकम यांची जनमानसातील प्रतिमा हाडाचा शेतकरी अशी आहे, तर मूळचे शेतकरीच असलेले श्री. आढळराव हे उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रस्तावित चाकण विमानतळ, एसईझेड, भोसरी खेडपर्यंत एमआयडीसी, प्रकल्पांसाठीचे जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, जमिनींना योग्य मोबदला हे पुण्यापासून 50 किलोमीटरच्या परिघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे आणि अस्तित्वाचे प्रश्‍न आ वासून उभे आहेत. तर वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, बदलत्या पीकपद्धतीनुसार पायाभूत सुविधांचा अभाव, पाण्याचा तुटवडा, कालव्यांचा प्रश्‍न, धरणांमधील पाण्याचे वाटप, शेतीमाल भाव हे ग्रामीण भागातील मुख्य प्रश्‍न आहेत. पुणे-नाशिक रेल्वे, आणे माळशेज घाट विकासाचे प्रश्‍न अनेक दिवस फक्त चर्चेत आहेत. एकही मोठा प्रक्रिया उद्योग गेल्या काही वर्षांत सुरू होऊ शकलेला नाही. सद्यःस्थितीत शहरी भागातील प्रश्‍नांवर श्री. आढळराव यांचा, तर ग्रामीण भागातील प्रश्‍नांवर श्री. निकम यांचा अधिक जोर आहे. कृषिमंत्री शरद पवार यांच्यापासून ते नव्यानेच शिवसेनेत दाखल झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांच्या सभांनी सध्या वातावरण तापले आहे.

मावळ ः शेती कमजोर, शहरीकरणावर जोर
शेतीच्या मूलभूत प्रश्‍नांपेक्षा शहरीकरणाशी निगडित प्रश्‍नांनाच मावळ मतदारसंघात जास्त भाव असल्याची स्थिती आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचा प्रश्‍न, वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमिनींची अकृषक कामांसाठी होत असलेली विक्री आणि त्या अनुषंगाने वाढती गुंडगिरी, विकासाच्या प्रश्‍नांपेक्षा पक्ष बदल, उद्योग आणि कामगारांभोवतीचे राजकारण यावरच राजकीय पक्षांचा अधिक जोर असल्याचे चित्र आहे. मावळातील शेतकऱ्यांच्या पाण्यापासून रस्त्यांपर्यंतच्या अनेक मूलभूत समस्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

- पुणे ः शेती हद्दपार; पाण्याचे राजकारण
पुणे शहरात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांची संख्या मोठी असली तरी इथल्या निवडणुकीचे सर्व प्रश्‍न अकृषक बाबींशेजारीच फिरत आहे. शहराभोवती शेतीचे मोठे प्रश्‍न आहे. विशेषतः पुण्यातील पाणी प्रदूषणाचा मोठा फटका आसपासच्या शेतकऱ्यांना बसत आहे. सर्वच नद्यांचे प्रदूषण अतिधोकादायक पातळी ओलांडून पुढे गेले आहे. मात्र, याकडे सर्वच उमेदवारांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. पुणेकरांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी "शेतीला जाणारे पाणीही पिण्यासाठी वळवले जाईल', असे जाहीर आश्‍वासन माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया यांनी आपल्या "पीपल्स गार्डियन पार्टी'च्या जाहीरनाम्यात दिले आहे. इतर पक्ष व उमेदवारही घशाला कोरड पडेपर्यंत पुणेकरांना 24 तास मुबलक पाणी देण्याची आमिषे दाखवत आहेत. मात्र, यात उपलब्ध पाणी, खरी गरज, पुणेकरांकडून होत असलेला पाण्याचा गैरवापर, उधळपट्टी व पाणी प्रदूषण आणि त्यामुळे शहराजवळील शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या यातना या सर्व बाबींकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे. पक्षांच्या पातळीवरही शहरात एक व शहराबाहेर दुसरी भूमिका असे चित्र आहे.
-----------
प्रमुख लढती
शिरूर
शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
देवदत्त निकम (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
बारामती
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
महादेव जानकर (महायुती)
पुणे शहर
विश्‍वजित कदम (कॉंग्रेस)
अनिल शिरोळे (भाजप)
दीपक पायगुडे (मनसे)
मावळ
श्रीरंग बारणे (शिवसेना)
राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
------------

अंदाज उत्पादनाचा - भाग 2

रब्बीने राखले

अन्नधान्य उत्पादनात भरिव वाढ

पुणे (प्रतिनिधी) ः खरिपाच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसाच्या जोरावर पुरेशी ओल टिकल्याचा फायदा रब्बी पिकांना होवून हंगामातील अन्नधान्य उत्पादनात भरिव वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या तिसऱ्या नजर अंदाजानुसार आधीच्या हंगामाच्या तुलनेत गेल्या रब्बी हंगामात उत्पादकतेत तब्बल 46 टक्‍क्‍यांनी वाढ होवून सुमारे 57 लाख 13 हजार टन अन्नधान्य उत्पादन हाती येण्याचा अंदाज आहे. यात तृणधान्याच्या उत्पादनात 70 टक्‍क्‍यांनी तर कडधान्यांच्या उत्पादनात 90 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार रब्बी 2013-14 मध्ये तृणधान्याचे 39 लाख 86 हजार टन, कडधान्यांचे 17 लाख 27 हजार टन तर तेलबियांचे एक लाख आठ हजार टन उत्पादन अपेक्षित आहे. रब्बीचे सर्वाधिक 35 लाख 73 हजार हेक्‍टर क्षेत्र तृणधान्य पिकांखाली आहे. यापैकी सर्वाधिक 22 लाख 44 हजार हेक्‍टर क्षेत्रावर यंदा रब्बी ज्वारी पेरण्यात आली. उर्वरीत क्षेत्रावर गहू, मका आदी पिकांची पेरणी झाली. उत्पादनात मका वगळता इतर सर्व पिकांची सरासरीहून घसरण तर आधीच्या वर्षाहून वाढ असे चित्र आहे.

रब्बी हरभरा पिकाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षात भरिव वाढ होत आहे. इतर पिकांना विशेषतः तेलबियांना या वाढीचा फटका बसला आहे. तेलबियांचे सरासरी चार लाख 38 हजार हेक्‍टर क्षेत्र आता एक लाख 85 हजार हेक्‍टरपर्यंत कमी झाले आहे. तर हरभऱ्याचे सरासरी 13 लाख सात हजार हेक्‍टर क्षेत्र 18 लाख 20 हेक्‍टरपर्यंत वाढले आहे. क्षेत्र वाढतानाच हरभर्याची उत्पादकताही 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. यामुळे अन्नधान्य उत्पादनात कडधान्यांचा वाटा वाढला आहे. तुलनेत तेलबियांच्या क्षेत्र आणि उत्पादनात घट आली आहे. रब्बीत कडधान्यांचे 17 लाख 27 हजार टन तर तेलबियांचे एक लाख आठ हजार टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

- क्षेत्रातील घट कायम
गेल्या काही वर्षात हरभरा वगळता उर्वरीत रब्बी पिकांच्या क्षेत्रात सातत्याने घट सुरु आहे. सलगच्या दुष्काळांनी यात अधिकच भर पडली. मात्र गेल्या हंगामात पाऊस कमी पडूनही ही घट कायम राहीली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत एकूण तृणधान्य क्षेत्रात आठ लाख हेक्‍टरने, ज्वारीच्या क्षेत्रात 27 टक्‍क्‍यांनी, गहू 7 टक्‍क्‍यांनी, तीळ 30 टक्‍क्‍यांनी, करडई 50 टक्‍क्‍यांनी, सुर्यफुल 80 टक्‍क्‍यांनी तर जवस 38 टक्‍क्‍यांनी घटले. या घटीचे प्रतिबिंब या पिकांच्या उत्पादनातही उमटले आहे. या पिकांच्या उत्पादनात दोन ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत घटीचा अंदाज आहे.

- आलेख रबी उत्पादनाचा
पिके --- सरासरी (लाख टन) --- 2012-13 (लाख टन) --- 2013-14 (लाख टन)
तृणधान्य --- 44.26 --- 23.46 --- 39.86
कडधान्य --- 11.01 --- 9.11 --- 17.27
अन्नधान्य --- 55.27 --- 32.57 --- 57.13
तेलबिया --- 2.45 --- 0.87 --- 1.08

- रब्बीचा पिकनिहाय उत्पादन अंदाज (2013-14)
पिक --- क्षेत्र (लाख हेक्‍टर) --- उत्पादन (लाख टन) --- उत्पादकता (किलो प्रति हेक्‍टर)
ज्वारी --- 22.44 --- 17.85 --- 795
गहू --- 10.97 --- 16.69 --- 1522
मका --- 2.26 --- 5.30 --- 2339
हरभरा --- 18.20 --- 16.71 --- 918
तिळ --- 0.02 --- 0.006 --- 268
करडई --- 1.07 --- 0.72 --- 677
सुर्यफुल --- 0.35 --- 0.24 --- 682
जवस --- 0.31 --- 0.08 --- 245
मोहरी व इतर --- 0.10 --- 0.04 --- 344
---------------(समाप्त)-----------------

अंदाज उत्पादनाचा - भाग 1

अन्नधान्य उत्पादनात
खरिप दुष्काळीच

कापूस, सोयाबीनची मोठी आघाडी

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या हंगामात सर्व जिल्ह्यांत चांगला पाऊस होऊनही राज्यात प्रमुख खरिप पिकांचे जेमतेम दुष्काळी वर्षांएवढेच उत्पन्न हाती येणार आहे. सुमारे 76 लाख 56 हजार टन अन्नधान्य, 14 लाख 57 हजार टन कडधान्य तर 50 लाख 58 हजार टन तेलबियांचे उत्पादन होणार आहे. तेलबिया, ज्वारी, भात आदी पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता या तिन्ही आघाड्यांवर फटका बसल्याचे चित्र आहे.

खरिप पिकांची काढणी करताना महसूल मंडळ पातळीवर घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगांच्या निष्कर्षावरुन कृषी विभागाने खरिपाच्या उत्पन्नाचा सुधारीत अंदाज नुकताच केंद्र शासनाला कळविला आहे. राज्यात 2012-13 च्या खरीपात अत्यल्प पावसामुळे दुष्काळ लांबला होता. त्या स्थितीतही आलेल्या उत्पादनापेक्षा गेल्या 2013-14 या हंगामात अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यात खरिप ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक 40 टक्‍क्‍यांनी घटले आहे. सरासरीच्या तुलनेत हीच घट 50 टक्के आहे. तुर, उडीद, भुईमुग, तीळ, कारळे या पिकांचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने उत्पादन घटीचे गांभिर्य आणखी वाढले आहे.

सोयाबीन व कापूस या दोन पिकांचा अपवाद सोडला तर राज्यातील उर्वरीत सर्व पिकांच्या बाबतीत मोठी पिछेहाट झाली आहे. गेल्या खरीपात भात, ज्वारी, बाजरी, रागी, तुर, मुग, उडीद, भुईमुग, तीळ, कारळे, सुर्यफुल, कापूस या सर्वच पिकांच्या क्षेत्रात मोठी घट झाली. काही पिकांचे क्षेत्र तर सरासरीहूनही मोठ्या प्रमाणात कमी झाले. पाठोपाठ पावसातील खंड व ऐन पिक काढणीच्या वेळी झालेली अतिवृृष्टी, जोरदार पावसाचा फटकाही या पिकांना बसला. याचे पडसाद उत्पादनात उमटले आहेत.

खरिपात 40 लाख 52 हजार हेक्‍टरवर अन्नधान्याची पेरणी झाली होती. त्यापासून हेक्‍टरी 1.9 टन सरासरी उत्पादकतेने 76 लाख 56 हजार टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आहे. मका या एकमेव पिकाचा अपवाद वगळता या गटातील ज्वारी, भात, बाजरी, रागी या चारही प्रमुख अन्नधान्य पिकांना कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. कडधान्याची 19 लाख 79 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यापासून हेक्‍टरी 736 किलोच्या सरासरी उत्पादकतेने 14 लाख 57 हजार टन उत्पादन होणार आहे. तेलबियांची 41 लाख 96 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यात हेक्‍टरी 1.2 टन सरासरी उत्पादकतेने एकूण 50 लाख 58 हजार टन उत्पादनाचा अंदाज आहे.

- सोयाबीनेतर तेलबियांवर संक्रात
गेल्या काही वर्षात सोयाबीनच्या क्षेत्रात प्रचंड मोठी वाढ होऊन ते राज्यातील सर्वात मोठे खरिप पिक बनले आहे. गेल्या खरिपात तर एकूण तेलबिया क्षेत्रापैकी सुमारे 94 टक्के क्षेत्र (39.17 लाख हेक्‍टर) एकट्या सोयाबीनचे होते. या सोया आग्रमनापुढे इतर तेलबिया पुरत्या निष्प्रभ ठरल्या असून खरिप भुईमुग, तीळ, कारळे, सुर्यफुल आदी तेलबिया पिकांच्या क्षेत्रात व उत्पादनात तब्बल 20 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. एकूण तेलबिया उत्पादनात सोयाबीनचा वाटा तब्बल 95 टक्के आहे.

- कपाशीची आघाडी कायम
कापूस पिकाच्या क्षेत्रात यंदा तीन लाख हेक्‍टरने घट होऊनही उत्पादनातील चढता आलेख कायम राहीला आहे. सरासरी प्रति हेक्‍टरी उत्पादकतेत 33 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन यंदा 83 लाख 78 हजार गाठी कापूस उत्पादन झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. हे उत्पादन सरासरीहून सुमारे 25 लाख तर आधीच्या वर्षाहून 15 लाख गाठींनी अधिक आहे. क्षेत्राच घट आणि उत्पादन व उत्पादकेत वाढ असे कापसाचे सकारात्मक चित्र आहे.

- उत्पादकता वाढीची उड्डाणे
आधीच्या वर्षाच्या तुलनेत गेल्या खरिपात बाजरीची उत्पादकता 49 टक्‍क्‍यांनी, मक्‍याची 45 टक्‍क्‍यांनी, सुर्यफुलाची 40 टक्‍क्‍यांनी तर कारळ्याची 16 टक्‍क्‍यांनी वाढल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मुख्य पिकांव्यतिरिक्त सर्वसाधारणपणे उल्लेखही न करता इतर या गटात समावेश करण्यात येणाऱ्या गौन (इतर) अन्नधान्याची 24 टक्‍क्‍यांनी, गौन कडधान्यांची 50 टक्‍क्‍यांनी तर गौन तेलबियांची उत्पादकता 45 टक्‍क्‍यांनी वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

- खरिप उत्पादनाचा पिकनिहाय अंदाज (2013-14)
पिक --- क्षेत्र ( लाख हेक्‍टर) --- उत्पादन (लाख टन) --- उत्पादकता (किलो प्रति हेक्‍टर)
भात --- 15.13 --- 28.45 --- 1880
ज्वारी --- 6.18 --- 7.27 --- 1177
बाजरी --- 8.12 --- 6.69 --- 947
रागी --- 1.02 --- 1.17 --- 1147
मका --- 9.55 --- 31.71 --- 3319
तुर --- 10.96 --- 9.73 --- 888
मुग --- 4.48 --- 2.33 --- 530
उडीद --- 3.29 --- 2.02 --- 612
भुईमुग --- 1.96 --- 2.28 --- 1163
तिळ --- 0.23 --- 0.07 --- 283
कारळे --- 0.22 --- 0.08 --- 348
सुर्यफुल --- 0.24 --- 0.14 --- 572
सोयाबीन --- 39.17 --- 47.97 --- 1225
कापूस (गाठी) --- 38.72 --- 83.78 --- 368
ऊस --- 9.37 --- 753.84 --- 80
(कापूस उत्पादन लाख गाठींमध्ये, प्रति गाठ 170 किलो प्रमाणे, ऊस उत्पादकता टनामध्ये)
-----------(समाप्त)---------

स्वयंचलित हवामान केंद्रांचा प्रकल्प रखडला, चार वर्षांपासून ग्रहण कायम


पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याचा प्रकल्प सुरु होण्यास चालू वर्षीही मुहुर्त सापडणार नसल्याची स्थिती आहे. या ना त्या कारणांनी या प्रकल्पाला लागलेले ग्रहण गेली चार वर्षे कायम आहे. आता त्यास प्रकल्प खर्चवाढीचे कारण पुढे आले आहे. गेल्या चार वर्षांचा कारभार पाहता पुढील दोन वर्षे ही हवामान केंद्रे बसवली जाण्याची चिन्हे नाहीत. यामुळे राज्यातील शेतकर्यांसाठीच्या हवामान नोंदीबाबतची अवकळा आणि अवहेलना कायम राहणार आहे.

शेतकर्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर राज्य शासनाने 2011 साली सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्याचा निर्णय घेतला. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 2011-12 साठी 50 कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले. दोन वर्षांत म्हणजेच मार्च 2013 अखेरीस ही केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात या कालावधीत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना व राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांमध्ये 40 लाख रुपयांच्या जाहिराती यापलीकडे प्रगती झाली नाही. गेल्या वर्षभरात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून ही केंद्रे बसवण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले. केंद्रांची ठिकाणेही निश्‍चित झाली. कृषीमंत्री विखे पाटील व कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी येत्या वर्षभरात केंद्रे सुरु होतील, असे वेळोवेळी जाहिरही केले. मात्र प्रत्यक्षात निधी, मनुष्यबळ व अंमलबजावणीचे स्वातंत्र्य असतानाही ही केंद्रे कागदावरच राहीली आहेत.

- आपत्तीसह दुर्लक्षही वाढले
गेल्या चार वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राला तीन कडक दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला आहे. या आपत्तीचे योग्य मोजमाप करण्यास ही स्वयंचलित हवामान केंद्रे निश्‍चितच उपयोगी ठरली असती. याशिवाय राज्यातील फळपिक विमा योजना व इतर काही विमा योजनाही हवामान घटकांतील बदलांवर आधारीत राबविण्यात येत आहेत. मात्र या घटकांचे मोजमाप करणारी कोणतीही यंत्रणा कृषी विभाग, हवामान विभाग वा विमा कंपन्यांकडे नाही. यामुळे शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतकर्यांनी या प्रकरणी न्यायालयातही धाव घेतली आहे. हवामान केंद्रांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल शेतकर्यांमार्फत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

- "पीपीपी'मुळे ग्रहण ?
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सुरवातीला प्रकल्प मंजूर होताना पूर्णतः शासकीय निधीतून स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचे नियोजन होते. मात्र कृषी विभागाला ही केंद्रे "मॅनेज' करणे झेपणार नाही, त्यामुळे ती खासगी कंपन्यांकडे द्यावीत व पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून ही केंद्रे उभारावीत, असा परभारे पर्याय कृषीच्या धुरिनांनी काढला. प्रत्यक्षात नगन्य कंपन्या या प्रकल्पासाठी इच्छूक आहेत. एका कंपनीला 2061 केंद्रांचे हे काम देण्यातही आले. मात्र आता 50 कोटींचा प्रकल्प खर्च 116 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे कारण देत फेरनिविदा काढण्याचा घाट घालण्यात आला आहे. "पीपीपी'चा आग्रह असल्याने प्रकल्पास ग्रहण लागल्याची स्थिती आहे.

- उपलब्ध यंत्रणाही कुचकामी
सध्या केंद्र शासनाच्या हवामानशास्त्र विभागमार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक स्वयंचलित हवामान केंद्र व प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे 69 स्वयंचलित पर्जन्यमापके कार्यरत आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठांकडे हवामान केंद्रे आहेत मात्र त्यापैकी बहुतेक केंद्रांची अवस्था दयनिय आहे. गेल्या काही नैसर्गिक आपत्तींचे स्वरुप पाहता गावोगाव हवामान घटकांची स्थिती वेगवेगळी आहे. या पार्श्‍वभूमीवर आधारासाठी प्रत्येक गावाची गरज वेगळी असताना प्रत्यक्षात ही यंत्रणा शेतकर्यांपासून कोसो दूर फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी मर्यादीत असल्याचे चित्र आहे.

- शेजार्यांनी मारली बाजी
गुजरातने "इस्रो'च्या मदतीने 54 स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू करून आनंद कृषी विद्यापीठामार्फत जिल्हानिहाय स्थानिक हवामानाचा अंदाज व कृषी सल्ला देण्यास सुरवात केली आहे. पाठोपाठ तमिळनाडूनेही कृषी विद्यापीठ व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे 385 पैकी 224 तालुक्‍यांमध्ये प्रत्येकी एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारून "कृषी हवामान यंत्रणा प्रकल्प' सुरू केला आहे. दर तासाला हवामानाच्या दहा घटकांची नोंद घेऊन त्यानुसार स्थानिक हवामानाचा सल्ला अधिकारी व शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात येत आहे. या राज्यांनी स्वबळावर हे प्रकल्प उभारले आहेत.
-----------------(समाप्त)------------------