Tuesday, April 1, 2014

कृषी रसायन एक्‍स्पोर्ट विरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पुणे (प्रतिनिधी) ः लोणी खुर्द (राहता, नगर) येथील शेतकरी रामभाऊ जगन्नाथ ढवणे यांच्या द्राक्ष बागेच्या नुकसानीवरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कृषी रसायन एक्‍स्पोर्ट कंपनीविरुद्धची राज्य कृषी विभागाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

कंपनीच्या क्रिपान (इथेफॉन 39 % एस एल) या संजिवकामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्याने कृषी विभागाने कंपनीच्या सर्व 52 उत्पादनांवर 31 डिसेंबर 2012 पर्यंत बंदी घातली होती. उच्च न्यायालयाने दोषी उत्पादनाव्यतिरिक्तच्या 51 उत्पादनांवरील बंदी चुकीची असल्याचा ताशेरा ओढला होता. त्यावर बंदी कायम ठेवण्याची मागणी कृषी विभागाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र बंदीचा कालावधी संपल्यानंतर याचिका दाखल केल्याने न्यायालयाने ती फेटाळल्याची माहिती कंपनीचे विपणन व्यवस्थापक अशोक व्यास यांनी दिली.
---------(समाप्त)---------

No comments:

Post a Comment