Monday, April 7, 2014

सिंधुदुर्गात कृषी अभ्यास सहली

सिंधुदुर्ग ः येथिल कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 350 शेतकरी, महिला व युवकांसाठी गावामध्येच उपजिविकेची साधणे निर्माण करण्याच्या उद्देशाने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत आठ जिल्हास्तरीय कृषी अभ्यास सहलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. कणकवली तालुक्‍यातील भरणी, आयनल, माईन, नांदगाव, तिवरे, डामरे, बावशी व बेळणे या आठ गावातील पाणलोट समित्यांच्या कक्षेतील शेतकरी, महिला बचत गट, उपभोक्ता गट, पाणलोट समिती सदस्य, ग्रामीण युवक व युवती या सहलींमध्ये सहभागी झाल्या.

सिंधुदुर्ग महिला भवन येथिल कोकण महिला विकास कंपनी, किर्लोस येथिल कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या प्रक्षेत्र, कुडाळ येथिल सागर इंजिनिअरिंग फळप्रक्रीया यंत्र निर्मिती केंद्र, वेंगुर्ला येथिल प्रादेशिक फळ संशोधन केंद्र या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. सहलीचे आयोजन कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. मंदार गिते, डॉ. विलास सावंत, बाळकृष्ण गावे यांनी या सहलींचे आयोजन केले.
----------------------
१ एप्रिल १४, पुणे

No comments:

Post a Comment