Saturday, August 30, 2014

वसंतदादा साखर संस्थेला सहा कोटी रुपये अनुदान

- तीन कोटीचा पहिला हप्ता मंजूर

पुणे (प्रतिनिधी) ः मांजरी येथिल वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट (व्हीएसआय) या संस्थेला 2013-14 या वर्षासाठी साखर कारखान्यांच्या मुलभूत सुविधा, लेखा परिक्षण आणि संशोधनासाठी राज्य शासनामार्फत सहा कोटी 76 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यापैकी तीन कोटी रुपयांचा पहिला हप्ता संस्थेकडे वर्ग करण्याचे आदेश राज्य शासनामार्फत नुकतेच देण्यात आले आहेत.

राज्यात दर वर्षी 500 टन ऊस गाळप होतो असे गृहीत धरुन व्हीएसआयला प्रति टन एक रुपया याप्रमाणे दर वर्षी पाच कोटी रुपये अनुदान देण्याची अर्थसंकल्पिय तरतूद आहे. मात्र 500 टनाहून अधिक गाळप झाल्यास त्यापुढील गाळपासाठी प्रति टन एक रुपया याप्रमाणे अतिरिक्त अनुदान देण्याचीही तरतूद आहे. साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार गेल्या गाळप हंगामात राज्यात 676 लाख 28 हजार 995 टन ऊस गाळप झाले. यानुसार व्हीएसआयला सहा कोटी 76 हजार 28 हजार 995 रुपये अनुदान निश्‍चित झाले आहे.पहिल्या टप्प्यात यापैकी तीन कोटी रुपये संस्थेला देण्यास राज्य शासनाने नुकतिच मंजूरी दिली आहे. साखर आयुक्तालयाच्या लेखाधिकाऱ्यांची या निधीबाबत नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्य शासनाने 1992 मध्ये ऊस खरेदी कराच्या वाढीव महसूलातून साखर उद्योगाच्या मुलभूत सुविधासाठी तरतुद करण्यासाठी सहकारी साखर कारखाना मूलभूत सुविधा विकास आणि परिक्षण निधी व साखर संशोधन निधी असे दोन निधी निर्माण करण्यात आले होते. हे दोन्ही निधी 2008 साली रद्द करुन साखर उद्योगाच्या मुलभूत सुविधा व संशोधनासाठी अर्थसंकल्पिय तरतूदीतून निधी उपलब्ध करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी या संस्थेस 2009-10 या आर्थिक वर्षापासून दर वर्षी संशोधन सहाय्याची तरतूद किमान पाच कोटी करण्यात आली. वार्षिक गाळप 500 लाख टनाहून जास्त झाल्यास अधिकच्या गाळपासाठी प्रति टन एक रुपया याप्रमाणे वाढ करण्याचा निर्णय 2009 मध्ये घेण्यात आलेला आहे.
-------------- 

कृषी खात्यात रुजू होणार 170 नवीन अधिकारी

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा गट ब मधील 59 अधिकाऱ्यांपैकी 55 आणि गट ब (कनिष्ठ) मधील 120 पैकी 115 अशा एकूण 170 अधिकाऱ्यांची राज्य शासनाने विविध ठिकाणी नेमणूक केली आहे. यामध्ये 51 महिलांचा समावेश आहे. उर्वरीत नऊ उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य तपासणी व जात वैधता प्रमाणपत्र आदी बाबींची पुर्तता झाल्यानंतर कृषी विभागाच्या सेवेत रुजू होणार आहेत.

नियुक्ती आदेश दिलेल्या सर्व उमेदवारांनी एक महिन्याच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक आहे. या सर्वाचा रुजू झाल्यापासून दोन वर्षाचा कालावधी परिविक्षाधीन राहणार आहे. नियुक्तीच्या विभागात किमान नऊ वर्षे काम करणे आवश्‍यक असून त्यानंतर हे अधिकारी विभागाबाहेर राज्यात कोठेही बदलीसाठी पात्र ठरणार आहेत.

- ब वर्ग अधिकारी, कंसात नियुक्तीचे पद व ठिकाण
रुपाली शिंदे (तंत्र अधि, कळवण), अर्चना आखाडे (जि.कृ.अ, ठाणे), अश्‍विनी सकपाळ (सहायक संचालक, रामेती, खोपोली), शितल लिमकर (जि.कृ.अ, बीड), स्मिता धावडे (मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, रत्नागिरी), शितल थोरात (कृषी अधिकारी, मग्रारोहयो, जालना), मेघा पाटील (उप प्रकल्प व्यवस्थापक, वसुंधरा, वर्धा), रेश्‍मी हेंगड (तंत्र अधि, अकोट), पुनम चोरमले (तंत्र अधि, अमरावती), वृषाली घुले (तंत्र अधि, अकोला), मयुरी झोरे (तंत्र अधि, वर्धा), संजिवनी कणखर (जि.कृ.अ, बुलडाणा), सायली अडसूळ (तंत्र अधि, ठाणे), दिपाली अडसूळ (तंत्र अधि, रायगड), अर्चना सूळ (सहायक संचालक, रामेती, खोपोली), मिनाक्षी वळवी (तंत्र अधि, गोंदिया), मनिषा कौटे (तंत्र अधि, भंडारा),

संदिप स्वामी (तालुका कृषी अधिकारी, गेवराई), सचिन बऱ्हाटे (तंत्र अधिकारी, धुळे), गणेश भोसले (तंत्र अधि, गडहिंग्लज), मेघशाम गुळवे (तंत्र अधि, परभणी), दत्तात्रय काळभोर (तंत्र अधि, कोल्हापूर), प्रदिप कदम (तंत्र अधि, कोल्हापूर), रामचंद्र धायगुडे (तंत्र अधि, कोल्हापूर), बापुसाहेब शिंदे (तंत्र अधि, नगर), प्रशांत शेंडे (मोहीम अधिकारी, नंदुरबार), गणेश दुरंदे (जिल्हा कृषी अधिकारी, हिंगोली), विकास पाटील (ता.कृ.अ, मुलचेरा), चांगदेव गायकवाड (तंत्र अधि, सिंधुदुर्ग), मिलिंद वानखेडे (तंत्र अधि, वाशिम), अभिजित गडदे (ता.कृ.अ, गुहागर), जयंत गायकवाड (मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, बुलडाणा), सुधाकर पवार (ता.कृ.अ, रावेर), दिपक तायडे (तंत्र अधि, अकोला), रोहन भोसले (जि.कृ.अ, धुळे), सचिन हाके (तंत्र अधि, सावंतवाडी), प्रविण भोर (ता.कृ.अ, तळोदा), संतोष कोयले (तंत्र अधि, परतुर), किरण मोरे (तंत्र अधि, जळगाव), भगवान गोर्डे (जि.कृ.अ, जळगाव), अमोल शिंदे (तंत्र अधि, बुलडाणा), सचिन देवरे (तंत्र अधि, गडचिरोली), मंगेश ठाकरे (ता.कृ.अ, अकोट), वाल्मिक प्रकाश (तंत्र अधि, वरोरा), प्रशांत राहाने (ता.कृ.अ, मुल), ज्ञानेश्‍वर तारगे (ता.कृ.अ, अंबड), श्रीधर गोतरकर (तंत्र अधि, जालना), नितीन कांबळे (तंत्र अधि, हिंगोली), निलेश गेडाम (ता.कृ.अ, लाखांदुर), प्रशांत कासराळे (ता.कृ.अ, बल्लारपूर), उमाकांत हातागळे (कृषी अधिकारी, मग्रारोहयो, गडचिरोली), गोरख चौधरी (तंत्र अधि, भंडारा), राजेश मेरगेवार (मोहिम अधिकारी, वाशिम), विजयकुमार मुकाडे (जि.कृ.अ, बुलडाणा), प्रशांत गुल्हाने (ता.कृ.अ, आर्वी)

- ब (कनिष्ठ) वर्ग अधिकारी, कंसात नियुक्तीचे पद व ठिकाण
सुषमा मोरे (कृषी अधिकारी, औरंगाबाद), समृद्धी दिवाणे (कृ.अ, औरंगाबाद), सविता भिंगारदे (कृ. अ, शेगांव), मिलन राक्षे ( कृ.अ, नाशिक), प्रियांका क्षिरसागर (कृ.अ, पुणे), मोहिनी वाळेकर (कृ.अ, पालघर), संजीवनी राठोड (कृ.अ, लातूर), वैशाली फडतरे (कृ.अ, कोरेगाव), वैशाली ससाणे (कृ.अ, धामणगांव रेल्वे), अनुप्रिता जाधव (कृ.अ, अमरावती), सिमा चौधरी (कृ.अ, नाशिक), किरण बडोले (कृ.अ, रामटेक), क्रांती जाधव (कृ.अ, नाशिक), प्रेरणा जाधव (कृ.अ, वर्धा), खुशबू मुल्ला (कृ.अ, संगमेश्‍वर), शुभांगी मोहितकर (कृ.अ, हिंगणघाट), वृषाली चव्हाण (कृ.अ, वर्धा), मोनालीदेवी बागुल (कृ.अ, किटकनाशक चाचणी प्रयोगशाळा, औरंगाबाद), कुमुदिनी बोरकर (कृ.अ, साकोली), मनिषा पाटील (कृ.अ, सिंदखेडा), स्वाती ढोबळे (मंडळ कृषी अधिकारी, सावर्डे), कोमल घोडके (कृ.अ, आर्वी), सोनाली कवडे (कृ.अ, पांढरकवडा), आशा महारनवर (कृ.अ, ठाणे), प्रज्ञा माने (कृ.अ, नागपूर), कोमल शेजाळ (कृ.अ, ठाणे), सोनल गजभिये (मं.कृ.अ, गोंडपिंपरी), मनिषा शिंदे (कृ.अ, गोंदिया), वैशाली गच्चे (कृ.अ, यवतमाळ), नैरू भसारकर (कृ.अ, उमरेड), सोनाली सोनवणे (मं.कृ.अ, उमरखेड), पुनम भुसावार (कृ.अ, उमरखेड), अश्‍विनी ठाकूर (कृ.अ, हिंगणघाट), मिनाक्षी दुटे (कृ.अ, अमरावती),

कुलदिप राऊत (कृ.अ, बाळापूर), पुरुषोत्तम कात्रजकर (कृ.अ, जामखेड), कानिफनाथ मरकड (कृ.अ, शेवगाव), रविंद्र पाटील (मं.कृ.अ, करवीर), नानासाहेब लांडगे (कृ.अ, कोल्हापूर), जनार्दन भगत (कृ.अ, वाशी), अजिंक्‍य पवार (मं.कृ.अ, नागठाणे), सतिश महारनवर (मं.कृ.अ, मंचर), हरीश माकर (मं.कृ.अ, भाळवणी), अतुल ढवळे (मं.कृ.अ, मुरगुड), भागवत सरडे (मं.कृ.अ. कामती), विकास नारनाळीकर (कृ.अ, मुखेड), संतोष भालेराव (कृ.अ, गेवराई), महेश देवकते (कृ.अ, अक्कलकोट), अमोल सपकाळ (कृ.अ, पन्हाळा), संतोष चौधरी (मं.कृ.अ, सेलू बाजार), ज्ञानोबा रितपुरे (मं.कृ.अ, येडशी), सोमनाथ गावडे (कृ.अ, पुणे), हेमंत ठोंबरे (मं.कृ.अ, उंडाळे), सोमनाथ आहेरकर (मं.कृ.अ, करकंब), रविंद्र घुले (मं.कृ.अ, जवळा), अनिकेत माने (कृ.अ, शिराळा), प्रविण जाधव (कृ.अ, उत्तर सोलापूर), सोमनाथ साठे (मं.कृ.अ, नरखेड), सागर साळुंखे (कृ.अ, रत्नगिरी), सचिन पांचाळ (कृ.अ, माहुर), मगनदास तावरे (कृ.अ, घनसांगवी), समाधान वाघमोडे (मं.कृ.अ, केज), अमर एकळ (मं.कृ.अ, सावंतवाडी), महेश वेठेकर (कृ.अ, नाशिक), कैलास देवकर (कृ.अ, भुम), शिवकुमार पुजारी (मं.कृ.अ, मोहोळ), निलेश शिंदे (मं.कृ.अ, मेहकर), विलास वाशिमकर (कृ.अ, दर्यापूर), अमृत गांगर्डे (मं.कृ.अ, सुपा), हरीश कुंभलकर (मं.कृ.अ, कोरची), अभिमन्यू चोपडे (कृ.अ, नंदुरबार), निलेश धरम (मं.कृ.अ, चापडगाव), सचिन राठोड (कृ.अ, दारव्हा), योगेश सोनवणे (कृ.अ, नाशिक),

गणेश सावंत (मं.कृ.अ, जळगाव जामोद), श्रीपाद जाधव (कृ.अ, औरंगाबाद), सचिन सावंत (कृ.अ, जळगाव), महादेव करे (मं.कृ.अ, रोहा), रवी राठोड (मं.कृ.अ, देऊळगावराजा), दिपक लोंढे (कृ.अ, एरंडोल), दत्तात्रय क्षिरसागर (मं.कृ.अ, वळसंग), महेश खर्डे (मं.कृ.अ, तिर्थपूरी), विकास सोनावणे (कृ.अ, आष्टी), दिपक कांबळे (मं.कृ.अ, कोवाड), नयन मगर (मं.कृ.अ, लोहारा), धिरज तोरणे (मं.कृ.अ, कडावल), विशाल बोऱ्हाडे (कृ.अ, वरुड), वैभव विश्‍वे (कृ.अ, कर्जत), सागर कांबळे (कृ.अ, गुहागर), अतुल कांबळे (मं.कृ.अ, दोडामार्ग), सतिश सावंत (कृ.अ, हिंगोली), सुनिल गवळी (कृ.अ, मंगळवेढा), ज्ञानेश्‍वर सातपुते (कृ.अ, कर्जत), सचिन कांबळे (मं.कृ.अ, कोतळुक), गणेश मादेवार (कृ.अ, चिखलदरा), सुनिल पवार (मं.कृ.अ, पिंपळगाव), सिताराम पाखरे (मं.कृ.अ, दुगाव), सागर डोंगरे (मं.कृ.अ, शिराळा), पुरुषोत्तम वाघमारे (मं.कृ.अ, कळंब), आबासाहेब भोरे (कृ.अ, संगमनेर), रमेश शिंदे (मं.कृ.अ, धडगाव), उमेश जाधव (कृ.अ, मलकापूर), दिपक पारखे (कृ.अ, किनवट), हर्षद निगडे (मं.कृ.अ, परांडा), शेखर कांबळे (मं.कृ.अ, पोयनाड), विशाल साळवे (मं.कृ.अ, भोकरदन), मंगेश घोडके (मं.कृ.अ, पालांदूर), नवनाथ साबळे (मं.कृ.अ, परळी), जगन सुर्यवंशी (मं.कृ.अ, भांबेड), लक्ष्मण सरोगदे (मं.कृ.अ, रामटेक), दिनेश भोये (कृ.अ, कोरची), राहुल गायकवाड (मं.कृ.अ, मोहाडी), चेतन जाधव (मं.कृ.अ, गोंडपिंपरी), नितीन गांगुर्डे (मं.कृ.अ, कोंढा), सतिशकुमार दांडगे (मं.कृ.अ, बीबी)
------------------- 

कृषी विद्यापीठाच्या सेवानिवृतांना मिळणार वाढीव निवृत्तीवेतन



पुणे (प्रतिनिधी) ः सहा वेतन आयोग लागू करताना राज्य शासनाने एक जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2009 या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कमाल पाच लाख रुपये उपदान (ग्रॅच्युएटी) व त्यानंतर निवृत्त झालेल्यांना सात लाख रुपये कमाल उपदान देण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील 21 सेवानिवृत्त प्राध्यापकांना तीन महिने किंवा त्यापुर्वी उपदान व निवृत्ती वेतनाच्या फरकाची रक्कम द्यावी, असा आदेश राज्य शासनाला दिला आहे.

सहाव्य वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये अशा प्रकारची कोणतीही तफावत (कट ऑफ डेट) अथवा भेदभाव नसल्यामुळे तसेच असोसिएशन ऑफ कॉलेज ऍण्ड युनिव्हरसिटी सुपर ऍन्युएटेड टिचर्स यांच्या वतीने डॉ. एम. ए. बाहुळ यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर करुन महाराष्ट्र शासनाचा निर्णय "अन्यायकारक, भेदभावपूर्ण, असंवैधानिक व घटनेच्या कलम 14 व 16 चा भंग करणारा' ठरविला आहे. या निर्णयाच्या आधारे तफावत (कट ऑफ डेट्‌स) रद्द करण्यासाठी कृषी विद्यापीठातील 21 निवृत्त प्राध्यापकांनी राज्य शासन व विद्यापीठाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दावा दाखल केला होता.

न्यायमुर्ती श्रीमती वासंती नाईक व व्ही. के. जाधव यांनी 31 जुलै 2014 च्या आदेशान्वये कट ऑफ डेट्‌स रद्द करुन याचिकाकर्त्यांना तीन महिन्याच्या आत उपदान व निवृत्ती वेतनाच्या फरकाची रक्कम द्यावी, असा आदेश दिल्याची माहिती निवृत्त प्राध्यापकांच्या कृती समितीचे संयोजक आर. जी. देशमुख यांनी दिली.
----------------- 

Thursday, August 28, 2014

अमाप उत्साहात जलदिंडीला प्रारंभ

अष्टविनायकांहून 9 दिंडी मार्गस्थ; दुष्काळमुक्तीचा निर्धार होतोय पक्का

सकाळ वृत्तसेवा
पुणे ः अष्टविनायकांच्या पवित्र स्थानांपासून पर्जन्यधारांच्या साक्षीने निघालेल्या जलदिंड्या जलस्वयंपूर्णतेचा संदेश देत आज महाराष्ट्रभर मार्गस्थ झाल्या. पर्जन्यसुक्त, अर्थर्वशीर्ष, मंत्रोच्चारात गणरायाला अभिषेक व कलशपूजनाने गुरुवारी (ता.28) सकाळी डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशन व सकाळ माध्यम समुहाच्या सर्व जल अभियानाला प्रारंभ झाला. तनिष्का भगिनी विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच समाजातील विविध स्तरातील नागरिकांच्या प्रचंड उत्साहात भजने, लेझिम, ढोल ताशांचा गजर व शाहिरी जल्लोशाने जलदिंडी सोहळ्यात आगळीच रंगत भरली. जलदिंडी मार्गावरील गावागावात महिलांनी टॅंकरवर पुष्पवृष्टी करत दिंडीला शुभेच्छा दिल्या.

जलदिंडीबद्दल गेल्या आठ दिवसांपासून असलेली उत्सूकता गुरुवारी सकाळी टिपेला पोचली. अष्टविनायक परिसरातील गावांमधून अष्टविनायकांच्या ठिकाणी दिंडीत सहभागी होण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उसळला. दिंडीत सहभागी झालेल्या सर्वांनी दुष्काळमुक्तीचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थी, महिला, पुरुषांनी या उपक्रमात योगदानाची शपथ घेतली. अनेक संस्थांनी पाणी बचत, वापर व जलसंवर्धन विषयक उपक्रम राबविण्याचे निश्‍चित केले. या सर्वच उपक्रमांमध्ये तनिष्का भगिनींचा यात मोठा सहभाग होता. फिनोलेक्‍स पाईप्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर नेटाफिम इरिगेशन हे सहप्रायोजक आहेत.

रांजणगाव येथिल महागणपतीचे आशिर्वाद घेवून दोन जलदिंड्या विदर्भाकडे मार्गस्थ झाल्या. थेऊर येथे पावसाच्या सरी अंगावर झेलत शेकडो विद्यार्थ्यानी घोषणा देत जलदिंडीची रंगत वाढवली. कलशाचे मंत्रोच्चारात चिंतामणी मंदीरापासून दिंडीचे नांदेडच्या दिशेने प्रस्थान झाले. सिद्धटेकला विद्यार्थीनींचे लेझिम पथक व आसमंत दणाणून सोडणारा ढोलांचा नाद या वातावरणात सिद्धिविनायकाला जलाभिषेक करुन पवित्र तिर्थ टॅंकरमध्ये मिसळण्यात आले. कोकणातील दिंड्यांची सुरवात महडचा वरदविनायक व पालीच्या बल्लाळेश्‍वराचे आशिर्वाद घेवून झाली. या दोन्ही ठिकांनी विद्यार्थ्यांसह तनिष्का भगिनी व नागरिकांचा मोठा सहभाग होता.

ओझरमध्ये पारंपरिक वेशात विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले. विघ्नहर्त्याचे आशिर्वाद घेवून हलगी पथकाच्या गजरात दिंडीची ओझर गावातून मिरवणूक काढण्यात आली. मोरगावला पर्जन्यसुक्त व अथर्वशिर्षाचा मंत्रोच्चाराने वातावरण भारुन गेले. मयुरेश्‍वर मंदिरापासून जलदिंडींला पुष्पवृष्टीत प्रारंभ झाला. लेण्याद्री येथून गिरिजात्मजास महाअभिषेक घालून दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. बाल वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात आणि शालेय विद्यार्थ्यांनी लेझिमाच्या तालावर दिंडीची मिरवणूक काढली. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे लेण्याद्रीहून आलेल्या जलदिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, आमदार गिरिष बापट, पोलिस आयुक्त सतिश माथूर, सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, स्ट्रॅटेजिक कॉन्सिलचे प्रमुख बॉबी निंबाळकर, संपादक मल्हार अरणकल्ले, निवासी संपादक नंदकुमार सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. मल्हार अरणकल्ले यांनी यावेळी उपस्थितांना पाणी बचतीची शपथ दिली.

महाराष्ट्राचा पाणी प्रश्‍न येत्या पाच वर्षात पूर्णतः सोडविण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन आणि सकाळ माध्यम समुहामार्फत युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वॉटर लॅबमधून 32 उपाययोजना निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचवून दुष्काळमुक्तीच्या कार्यातील जनसहभाग वाढवून लोकचळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्व जल अभियानाअंतर्गत जलदिंडी आयोजन करण्यात आले आहे.
-----------(समाप्त)------------ 

राज्यभर जोरदार पाऊस

मॉन्सून सक्रीय; सर्वदूर हजेरी

टीम ऍग्रोवन
पुणे ः राज्यात सर्वत्र नैऋत्य मोसमी वारे सक्रीय झाले आहेत. यामुळे सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून कोकण व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. गुरुवारी दिवसभरातही बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. विदर्भाबरोबरच मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागातही बहुतेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. रत्नागिरी व मालवण येथे सर्वाधिक प्रत्येकी 110 मिलीमिटर पाऊस कोसळला.

- दुष्काळी तालुक्‍यात पाऊस वाढला
सातारा ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून माण तालुक्‍यात सार्वधिक सरासरी 35 मिलिमीटर पाऊस झाला आहे. माण, फलटण, खटाव, महाबळेश्वर व पाटण तालुक्‍यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. इतर तालुक्‍यातही कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात गुरूवारी (ता.28) सकाळी आठ वाजेपर्यत सरासरी 11.4 मिलिमीटर पाऊस झाला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना 35, नवजा 38 व महाबळेश्वर 19 मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात 94.94 टीएमसी पाणी साठा झाला आहे.

- सोलापुरात पावसाची रिपरिप सुरु
सोलापूर ः जिल्ह्यात गुरुवारी (ता.28) पहाटेपासून पुन्हा पावसाने रिपरिप सुरु केली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस होतो आहे. पण त्याचा जोर कमी आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी, पंढरपूर असा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरु आहे. पावसातील या सातत्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. बुधवारी दिवसभर कधी ढगाळ- कधी ऊन तर कधी पावसाच्या हलक्‍या सरी असा खेळ सुरु होता. पावसाने रात्री हलकी हजेरी लावली. पण गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास पुन्हा त्याचा जोर काहीसा वाढला. पण तो काही काळच होता. त्यानंतर मात्र थांबून-थांबून त्याची रिपरिप सुरुच राहिली.

- विदर्भात जोरदार पाऊस
नागपूर ः विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हयात गुरुवार (ता.28) पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. या तीन जिल्हयांसोबतच पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर परिसरात बुधवारी (ता.27) मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. महिनाभर गायब असलेला पाऊस गत आठवडाभरापासून बरसण्यात सुरवात झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळण्यास मदत झाली आहे. गुरुवारी पहाटे सहा वाजतासून अकोला, वाशीम व बुलडाणा परिसरात जोरदार पाऊस झाला. बुलडाणा जिल्हयातील जळगाव जामोद, खामगाव तसेच अकोला जिल्हयात सर्वदूर पावसाची नोंद करण्यात आली. पूर्व विदर्भातही बुधवारी सायंकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा परिसरात गुरुवारी वातावरण ढगाळ होते.

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
कोकण ः मालवण, रत्नागिरी प्रत्येकी 110, देवगड, पणजी प्रत्येकी 100, मार्मागोवा 90, दोडामार्ग, मडगाव, वाल्पोई, दाभोलीम प्रत्येकी 80, कणकवली, पेडणे, कानकोन प्रत्येकी 70, हर्णे, सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ प्रत्येकी 60, केपे, वेंगुर्ला, तलासरी, माणगाव, जव्हार प्रत्येकी 50, रोहा 40, म्हसाळा, उल्हासनगर, तळा, श्रीवर्धन, पालघर, पोलादपूर प्रत्येकी 30, सुधागड, अलिबाग, महाड, मोखाडा, वसई, वाडा, उरण, ठाणे प्रत्येकी 20, फोंडा, डहाणू, मुंबई, अंबरनाथ, माथेरान, ठाणे, कर्जत, कल्याण प्रत्येकी 10

मध्य महाराष्ट्र ः नगर, सांगोला प्रत्येकी 60, रहाता, जत प्रत्येकी 50, भडगाव, गगनबावडा, जेऊर, येवला, राहुरी प्रत्येकी 40, दहिवडी, गडहिंग्लज, श्रीरामपूर, गिरणा, चाळिसगाव, महाबळेश्‍वर, शिरुर, भुदरगड, पाचोरा, अक्कलकोट, पाथर्डी प्रत्येकी 30, चंदगड, शिराळा, आजरा, एरंडोल, दौंड, इंदापूर, राधानगरी, कागल, शेवगाव, पारनेर, शाहुवाडी, माळशिरस, पाटण, पंढरपूर, नवापूर, मालेगाव, पन्हाळा, कोल्हापूर, बोधवड, बारामती प्रत्येकी 20, इस्लामपूर, श्रीगोंदा, मंगळवेढा, करमाळा, फलटण, जामनेर, नेवासा, हातकणंगले, विटा, माढा, शिरोळ, पारोळा, कर्जत, कोपरगाव, सिन्नर, सांगली, जामखेड, मोहोळ, अमळनेर, जळगाव, दहीगाव, तासगाव, जुन्नर, शिरपूर, निफाड, वडूज, आंबेगाव, चांदवड, यावल प्रत्येकी 10

मराठवाडा ः पाथरी 70, जिंतूर, मानवत प्रत्येकी 60, अर्धपूर 50, बसमत, किनवट, उमरी, सेलू, परतूर प्रत्येकी 40, नांदेड, अंबड, हिंगोली, सेनगाव, पैठण, गेवराई, माजलगाव, बीड, कळमनुरी, मुदखेड, केज प्रत्येकी 30, धर्माबाद, सिल्लोड, फुलंब्री, घनसांगवी, जाफराबाद, चाकूर, लोहा, उमरगाव, रेणापूर, भोकर, पूर्णा, खुलताबाद, सोयगाव, धारुर, गंगापूर, अंबेजोगाई, परभणी, पाटोदा प्रत्येकी 20, लोहारा, सोनपेठ, वाशी, कळंब, बिलोली, कन्नड, वैजापूर, परांडा, भूम, भडगाव, औसा, गंगाखेड, देगलूर, मुखेड, तुळजापूर प्रत्येकी 10

विदर्भ ः देऊळगाव राजा, मानोरा, बाभूळगाव, पांढरकवडा प्रत्येकी 60, मुर्तीजापूर, बुलडाणा, कोपर्णा, चिखली, मोताळा, मुल, राजुरा प्रत्येकी 50, आरमोरी, बाळापुर, शेगाव, घाटंजी, पातुर, चंद्रपूर, करंडलाड, वणी, धामणगाव रेल्वे, अमरावती, सिरोंचा, गडचिरोली, मारेगाव, नांदगाव काझी, दिग्रस, मौदा, लोणार, मालेगाव प्रत्येकी 40, पोंभूर्णा, बार्शीटाकळी, साकोली, चांदूर रेल्वे, हिंगणघाट, चामोर्शी, कुरखेडा, मेहकर, बल्लाळपूर, जोईती, खारंघा, सेलू, सावनेर, दर्यापूर, एटापल्ली, सिंदेवाही, मुलचेरा, भद्रावती, झरीजामनी, आर्वी, पुसद प्रत्येकी 30, कोर्ची, गोंडपिंपरी, वरोरा, तिवसा, वर्धा, आष्टी, ब्रम्हपुरी, नरखेड, गोंदिया, नागपूर, वाशीम, उमरखेड, सालेकसा, चिमूर, नागभिड, सडकअर्जुनी, यवतमाळ प्रत्येकी 10
--------------------- 

राज्यभर पावसाचा जोर वाढणार


पुणे (प्रतिनिधी) ः आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात बंगालच्या उपसागरालगत सक्रीय असलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीवर सक्रीय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने शुक्रवारी (ता.29) मराठवाड्यात तर शनिवारी (ता.30) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दोन्ही दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

आंध्र प्रदेशचा उत्तर भाग व आदिशाच्या दक्षिण समुद्री भागावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. या क्षेत्राशी संलग्न असलेले चक्राकार वारे हवेच्या वरच्या थरात कायम आहेत. या कमी दाबाच्या क्षेत्राती तिव्रता शुक्रवारी सकाळपर्यंत आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भासह महाराष्ट्र सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला आहे. याच वेळी मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टाही त्याच्या मुळ स्थानाच्या जवळपास म्हणजेच अनुपगड, धोलपूर, झाशी, जबलपूर, रायपूर ते उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रापर्यंत सक्रीय आहे. या पट्ट्याच्या व कमी दाबाच्या क्षेत्राच्या एकत्रित प्रभावामुळे पुढील दोन दिवसात मध्य भारतातही पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे दक्षिण कोकणापासून केरळपर्यंत किनारी कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. मात्र त्याची तिव्रता गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमी झालेली आहे. सौराष्ट्र, कच्छ व अरबी समुद्राच्या उत्तर भागात समुद्रसपाटीच्या पातळीहून दीड व साडेतीन किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. राज्यात सर्वत्र आकाश बाष्पयुक्त ढगांनी ढगाळलेले असून ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मराठवाडा व विदर्भात ढगांची दाटी अधिक आहे.
---------- 

जलदिंडीच्या प्रारंभासाठी अष्टविनायक देवस्थाने सज्ज

विविध उपक्रमांचे आयोजन; तनिष्का करणार जलजागृती

पुणे (प्रतिनिधी) ः हरितालिकेपासून (ता.28) अष्टविनायकांपासून सुरु होणाऱ्या जलदिंडीसाठी सर्व अष्टविनायक देवस्थाने सज्ज झाली आहेत. स्थानिक ग्रामस्थ, महिला, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व तनिष्का भगिनींमार्फत यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतीक व प्रबोधनपर कार्यक्रमांबरोबरच घरा घरांवर गुढ्या उभारण्यात येणार आहेत. काही गावांमध्ये नदीतून पवित्र तिर्थाची कलशयात्राही काढण्यात येणार आहेत.

जलदिंडीचे स्वागत आणि पुजन पारंपरिक पद्धतीने केल्यानंतर सर्व अष्टविनायकांच्या ठिकाणी अथर्वशिर्ष, पर्जन्यसुक्‍ताने कार्यक्रमाला सुरवात होईल. पाण्याविषयीचा जागर करणारे सांस्कृतीक कार्यक्रम तनिष्का सदस्या आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सादर करणार आहेत. गेली तीन आठवडे त्याची तयारी सुरु आहे. या सांस्कृतीक कार्यक्रमांबरोबरच पाणीविषयक 32 उपक्रमांतील पर्जन्यजलसंवर्धन, सार्वजनिक नळांना तोट्या बसवणे, शुद्ध पाण्याचा आग्रह धरणे, जुन्या विहीरी व ओढ्यांतील गाळ काढणे, मिटर पद्धतीचा आग्रह, ठिबक सिंचनाचा अवलंब अशा एखाद्या उपक्रमाची जबाबदारी तनिष्का सदस्य व नागरिक घेणार आहेत.

रांजणगावमध्ये ग्रामस्थ घरावर गुढया उभारणार आहेत. सनई चौघड्याच्या निनादात पंचकलशाची पुजा होणार असून यावेळी तनिष्काच्या 300 हून अधिक सदस्या पर्जन्यसुक्त म्हणणार आहे. या जलदिंडीच्या मिरवणूकीची सजवलेल्या बैलगाड्या, तनिष्कांची दुचाकी रॅली, विद्यार्थ्यांची मानवी साखळी, मुख्याध्यापकांनी रचलेली पावसाची गाणी व तनिष्कांमार्फत पाण्याविषयक घोषणा ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

- नदीपात्रात होडीतून कलशयात्रा
सिद्धटेकमध्ये तहसिलदार टॅंकरला हिरवा झेंडा दाखवणार असून विद्यार्थीनींचे लेझिम पथक, विद्यार्थ्यांचा जलसंकल्प व पाच गावात नदीपात्रातून होड्यांमधून काढण्यात येणारी कलशयात्रा ही वैशिष्ट्ये आहे. थेऊरमध्ये ढोल लेझिम, बॅंड पथक, विद्यार्थ्यांनी केलेली घोषवाक्‍ये यांनी जलदिंडीची रंगत वाढणार आहे. मोरगावमध्ये स्काऊड गाईडचे विद्यार्थी जलदिंडीला सलामी देणार आहेत. विद्यार्थ्यांमार्फत जलगिते व पथनाट्येही सादर करण्यात येणार आहेत. ओझरमध्येही विद्यार्थी पाणी वाचवा, बचतीवर नाटक सादर होणार आहे. आळेफाटा व बेल्हा येथे पांडवकालिन बारव स्वच्छ करण्यात येणार आहे. लेण्याद्री येथेही ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.
------------- 

अष्टविनायकांपासून आज "जलदिंडी'ला प्रारंभ

अवघा महाराष्ट्र सज्ज; राज्यभर होणार जलजागर

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्रावरील पाणी प्रश्‍नांचे विघ्न कायमचे दूर करण्यासाठी सकाळ माध्यम समुहाने आयोजित केलेल्या जलदिंडीला आज (ता.28) गणरायाच्या आशिर्वादाने अष्टविनायकांचे पवित्र तिर्थ सोबत घेऊन प्रारंभ होणार आहे. राज्यभर जलदिंडीची उत्सूकता शिगेला पोचली असून दिंडीमार्गावरील ग्रामस्थ स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. अष्टविनायकांपासून निघणाऱ्या या जलदिंड्या पुढील चार दिवस राज्यभर जलजागर व जलजागृती करणार आहे.

मुंबईत पार पडलेल्या वॉटर लॅबमध्ये तयार झालेल्या दुष्काळमुक्ती आणि पाणी प्रश्‍न सोडविण्याच्या 32 उपाययोजना राज्यभर पोचवून त्याबाबत जनमत तयार करण्यासाठी नऊ जलदिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. रांजणगावहून दोन तर उर्वरीत अष्टविनायकांच्या ठिकाणांहून प्रत्येकी एक जलदिंडी निघणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात 31 ऑगस्टपर्यत अष्टविनायकांच्या पवित्र तिर्थाच्या रुपाने पाणी प्रश्‍न सोडविण्याचा वसा देत या दिंड्या संपूर्ण महाराष्ट्रभर जलजागर करणार आहेत. अनेक गावे, संस्था, मंडळे, महिला गट, शेतकरी गट, युवा मंडळे, महाविद्यालये, शाळा, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, संघटना या उपक्रमात उत्स्फुर्तपणे सक्रीय सहभागी होणार आहेत. फिनोलेक्‍स पाईप्स हे या अभियानाचे मुख्य प्रायोजक तर नेटाफिम इरिगेशन हे सहप्रायोजक आहेत.

जलदिंडीच्या निमित्ताने राज्यभर पाणी प्रश्‍नांवर जागृतीचे उपक्रम सुरु असून जलदिंडी सुरु होण्यापुर्वीच या उपक्रमांचा जागर टिपेला पोचला आहे. राज्यभरातील अनेक गावे, नगरपालिकांनी जलदिंडीमध्ये सक्रीय सहभागी होण्याची घोषणा व तयारी यापुर्वीच केली आहे. काही संस्थांनी पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी गावे दत्तक घेण्याचीही घोषणा केली आहे. अनेकांनी आर्थिक मदतही जाहिर केली आहे. काही संस्थांनी नळांना तोट्या बसविण्यासारख्या उपक्रमांची अंमलबजावणीही सुरु केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी वॉटर लॅबमधील उपययोजनांनी अंमलबजावणी शासनाने करावी, यासाठी पाठींबा दर्शविणारे ठराव संमत केले आहेत. शाळा, मदरशे, विद्यालये, महाविद्यालये, कृषी व संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे पाणी वापर व नियोजनाबाबत विशेष प्रबोधन करण्यास सुरवात केली असून विद्यार्थी पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी सक्रीय योगदान देण्याची शपथ घेत आहेत.

तनिष्का महिला गटामार्फत जलदिंडीच्या मार्गावर प्रबोधनपर सांस्कृतीक कार्यक्रमांसह विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीमार्गावरील ग्रामस्थांमार्फत गुढ्या उभारून दिंडींचे स्वागत करण्यात येणार आहे. हिंदु, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन, कोळी आदी विविध जाती धर्म समुदाय व संघटनांबरोबरच रिक्‍शा चालक, शिक्षण, दुकानदार, व्यवसायिक, बॅंजो वादक, ढोल पथके, जलमित्र, मोलकरीन, शिक्षक, छायाचित्रकार, वकील, डॉक्‍टर, आयटी, मजूर, एनसीसी, स्काऊड गाईड, मुर्तीकार, शासकीय कर्मचारी, देवस्थाने, व्यापारी यांच्या संघटना आणि महासंघांनीही जलदिंडीला पाठींबा व्यक्त केला असून ते या उपक्रमात सक्रीय सहभागी होणार आहेत.
----------- 

Wednesday, August 27, 2014

जावे पुस्तकांच्या गावा - दुसरी हरितक्रांती, शरद पवार

जावे पुस्तकांच्या गावा - संतोष डुकरे
---------------
पुस्तकाचे नाव - दुसरी हरितक्रांती
लेखक - शरद पवार
प्रकाशक - अमेय प्रकाशन, 1890, नातूबाग, पुणे 30. संपर्क ः 020 25677571
किंमत - 255 रुपये
पृष्ठे - 288
-----------------
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीए सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये सलग 10 वर्षे देशाच्या कृषीमंत्री पदाची धुरा सांभाळली. देशाच्या शेतीचा चेहरामोहरा या काळात पूर्णतः बदलला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कालखंडात देशातील शेती व्यवसायाला दुष्काळ, महापूर, अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. त्यात शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. मात्र अशा परिस्थितीतूनही समर्थपणे मार्ग काढत शेतीसाठीच्या पतपुरवठ्यापासून ते निर्यातीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात उच्चांकी कामगिरी झाली. यात श्री. पवार यांची भुमिका आणि त्यांनी आखलेली धोरणे महत्वाची ठरली. शेतीमधील जुन्या प्रस्थापित वाटा समृद्ध करण्याचे आणि नव्या वाटा शोधून प्रस्थापित करण्यावर त्यांनी भर दिला. फलोत्पादन, अन्न सुरक्षा, यांत्रिकीकरण, सुक्ष्म सिंचन, कृषी शिक्षण, शाश्‍वत शेती, पिक उत्पादकतावाढ आदी अभियाने यशस्वी केली.

देशाची पहिली हरितक्रांती ही काही ठराविक राज्यांपुरती व पिकांपुरती मर्यादीत होती. मात्र पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात गेली दशकभर झालेल्या कामाने कृषी क्षेत्रातील क्रांतीचा दुसरा टप्पा यशस्वीपणे गाठला गेला. कृषी क्षेत्राची पुढील वाटचाल आणि दिशा यांचे बिजारोपनही याच दशकात झाले. शरद पवार यांनी देशाला अवमानकारक स्थितीतून बाहेर काढून कृषीव्यवस्थेचा पाया यांनी खंबिर केला, या शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. श्री. पवार यांनी घातलेल्या कृषी व्यवस्थेच्या खंबिर पायाचे विविध आयाम त्यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहेत. कृषी क्षेत्राची भावी वाटचाल आणि संधींची चाहूल घेण्यासाठी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली घडलेली हरितक्रांती आणि तिचे विविध आयाम समजून घेणे महत्वाचे ठरेल. यासाठी श्री. पवार यांनी भाषणांतून उलगडलेला हरितक्रांतीचा प्रवास सुत्रबद्धपणे मांडणारे हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरु शकते.
----------------- 

माफसूमध्ये मुस्लिम समाजास 5 टक्के आरक्षण लागू

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यघटनेतील तरतूदीनुसार शासकीय तसेच खासगी अनुदानित व विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी सध्या राज्यात अस्तित्वात असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त पाच टक्के आरक्षण नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विशेष मागास प्रवर्ग- अ (एसबीसी - ए) या प्रवर्गास देण्यात आलेले आहे. यानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसू) अनुदानित व विना अनुदानित शैक्षणिक संस्थांनी आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असा आदेश राज्य शासनाने दिला आहे.

राज्यात शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजासाठी भारतीय राज्यघटनेतील तरतूदींनुसार विशेष मागास प्रवर्ग निर्माण करुन त्यात मुस्लिम गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यानुसार मुस्लिम गटासाठी शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरतीमध्ये व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय माफसूमधील सर्व संस्थांना आता या निर्णयाची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे.
-------------- 

विदेशी विद्यार्थ्यांचा कोटा राज्यातील विद्यार्थ्यांना खुला

माफसूचा विद्यार्थी हिताचा निर्णय; राज्य शासनाकडून शिक्कामोर्तब

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमांच्या अनिवासी भारतीय, विदेशी नागरिक, भारतीय वंशाचे विदेशी नागरिक यांच्यासाठी राखिव असलेल्या प्रवेश क्षमतेहून अधिकच्या 10 जागांपैकी रिक्त राहतील त्या जागा राज्यस्तरीय गुणवत्ता यातील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. राज्य शासनानेही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून या उमेदवारांकडून परदेशी विद्यार्थ्यांसाठी निश्‍चित असलेले शुल्क आकारण्यास मान्यता दिली आहे.

राज्य शासनाने आपल्या पुर्वीच्या आदेशांमध्ये सुधारणा करुन माफसूला प्रवेश प्रक्रीया राबविण्यात काही मुभा दिल्या आहेत. त्यानुसार परदेशी विद्यार्थ्यांसाठी राखिव असलेल्या जागा रिक्त राहील्यास त्या राज्यातील विद्यार्थ्यांमधून गुणानुक्रमे भरण्याची व त्यासाठी स्वतंत्र प्रवेशफेरी राबविण्याचा अधिकार विद्यापीठाला देण्यात आला आहे. याशिवाय राज्यस्तरीय व विभागिय कोट्यातील नियोजित प्रवेश फेऱ्या संपल्यानंतर रिक्त असलेल्या जागा अथवा विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागा विद्यापीठाला एक विशेष प्रवेश फेरी आयोजित करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमधून भरण्यासही मंजूरी देण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
------------- 

पालघर जिल्ह्यासाठी कृषीची ४१ पदे मंजूर

पुणे (प्रतिनिधी) ः ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन तयार करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत कृषी विकास अधिकारी कार्यालय सुरु करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. कृषी विभागाच्या 2009 च्या सुधारीत आकृतीबंधानुसार अधिक्षक कार्यालयासाठी 37 तर कृषी विकास अधिकारी कार्यालयासाठी चार अशा एकूण 41 पदांची भरती करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन एक ऑगस्ट 2014 पासून पालघर, वसई, डहाणु, तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा व विक्रमगड या तालुक्‍यांचा समावेश करुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. त्याचे मुख्यालय पालघर येथे ठेवण्यात आले आहे. यातील तालुका स्तरावर कार्यरत असलेला कृषी विभाग व पंचायत समित्यांचा अधिकारी व कर्मचारी वर्ग पुर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. मात्र जिल्हास्तरीय कार्यालये नवीन स्थापन करण्यात येणार असल्याने या ठिकाणी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय आकृतीबंधानुसार आवश्‍यक असलेली पदे नव्याने भरण्यात येणार आहेत.

कृषी विकास अधिकारी कार्यालयासाठी एक कृषी विकास अधिकारी, एक मोहीम अधिकारी व दोन जिल्हा कृषी अधिकारी अशी चार पदे मंजूर झाली आहेत. नव्या रचनेमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे शिपाई, पहारेकरी, नाईक, सफाईगार इ. वेगवेगळे संवर्ग न ठेवता चतुर्थश्रेणी कर्मचारी असा एकच संवर्ग चतुर्थश्रेणी कर्मचारी असे पद राहणार आहे. या सर्वांच्या कामाचे स्वरुप व जबाबदारी विविध प्रकारच्या (मल्टिटास्क्रींग) स्वरुपाच्या राहणार आहेत. या पदांची कामे बाह्यस्त्रोतांद्वारे करुन घेताना निकष ठरवून कामे द्यावीत, असेही शासनामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी मंजूर पदे व संख्या ः जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी 1, कृषी उपसंचालक 1, ब वर्ग अधिकारी 4, ब वर्ग कनिष्ट अधिकारी 2, सहाय्यक प्रशासन अधिकारी 1, लेखा अधिकारी 1, कृषी सहायक 2, अनुरेखक 2, आरेखक 1, अधिक्षक 2, वरिष्ठ लिपीक 5, लिपिक टंकलेखक 3, लघुलेखक 1, लघुटंकलेखक 2, वाहनचालक 2, चतुर्थश्रेणी कर्मचारी 7
--------------- 

Sunday, August 24, 2014

धो धो पाऊस, विजांचे तांडव

श्रावणात बरसताहेत मघा !!!

पुणे (प्रतिनिधी) ः श्रावणाचा पाऊस म्हटले की डोळ्यासमोर येते रिमझिम रिमझिम बरसात. हलक्‍या श्रावणसरी. रानात चरणाऱ्या म्हशीची पाठ ओली आणि पोट कोरडे ठेवणारा आल्हाददायक झिम्माड पाऊस... असे त्यांचे वर्षानुवर्षाचे स्वरुप. यंदा मात्र वर्षानुवर्षाची ही ओळख पुसून मघा लागल्यानंतर श्रावण अधिक आक्रमक झाला आहे. अतिवृष्टीची सिमा गाठून धो धो कोसळणारा, विजा कोसळून जिवित आणि वित्त हानी करणारा हाच का तो श्रावण असा प्रश्‍न प्रश्‍न पडावा इतपत त्यात धडधडीत बदल दिसून येत आहे.

यंदा एक तर श्रावण कोरडा आणि पाऊस पडला तर वादळी स्वरुपाचा धो धो असे त्याचे स्वरुप आहे. नेहमीचा रिमझिम श्रावण यंदा फारसा पडलाच नसल्याने राज्यभर हवामान अभ्यासक आणि शेतकयांकडूनही अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी श्रावण शुक्‍ल दशमीला सुर्याने घोडा या वाहनासह मघा नक्षत्रात प्रवेश केला होता. त्या वेळी फारसा पाऊस झाला नाही. यंदा सुर्याने श्रावण कृष्ण शष्टी-सप्तमीला कोल्हा या वाहनासह मघा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, कोकणात ठिकठिकाणी जोरदार तर मराठवाड्यातही बहुतेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.

जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चारही महिन्यांचे पाऊसमान विचारात घेता पावसाची ठराविक पद्धत किंवा सरासरी आहे. त्यात यंदा मोठ्या प्रमाणात बदल दिसत आहेत. ऊन, पाऊस, इंद्रधनुष्य असे सर्व प्रकार श्रावणात सुरु असतात. नेहमीच्या श्रावणापेक्षा यंदा सुर्यप्रकाशाचा कालावधी कमी आहे. सलग पाऊस नाही पण दोन तीन तास जोरदार होतो आणि पुन्हा आभाळ मोकळे. अनेक ठिकाणी विजा कोसळताहेत. असे श्रावणात चित्र सहसा दिसून येत नाही. यंदा जुन व जुलैपाठोपाठ ऑगस्टमध्ये व चालू त्यातच श्रावणातील पावसाच्या पॅटर्नमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत, अशी माहिती जेष्ठ हवामानशास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या हवामान समन्वय व सल्ला प्रकल्पाचे प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.

मघा तर मघा, वरतिच बघा
नाही तर चुल्हीपुढं बसा...
अशी म्हण संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. मघा नक्षत्राचा पाऊस कसा असतो हे त्यातून पुरेसे स्पष्ट होते. या नक्षत्रात शक्‍यतो पाऊस पडत नाही आणि पडलाच तर तो घराबाहेरही पडू देत नाही, असा त्याचा लौकीक आहे. हीच परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अनुभवास येत आहे. श्रावणाच्या मध्यावर सुर्याने मघा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. घाटमाथ्याबरोबरच कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ही परिस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. येत्या 13 सप्टेंबरला सुर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करत असून त्या वेळी त्याचे वाहन घोडा असेल.
-------------(समाप्त)------------- 

Saturday, August 23, 2014

123 तालुक्यात टंचाईसदृश्य स्थिती जाहिर

पुणे (प्रतिनिधी) ः चालू खरिपात 50 टक्‍क्‍यांहून कमी पाऊस झाल्याने टंचाईग्रस्त म्हणून जाहिर करण्यात आलेल्या 123 तालुक्‍यांपैकी सर्वाधिक 63 तालुके मराठवाड्यातील आहेत. याशिवाय विदर्भातील 38, नाशिक विभागातील 17 तर पुणे विभागातील पाच तालुक्‍यांत टंचाई जाहिर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 16 तालुके टंचाईग्रस्त आहेत.

मॉन्सूनचे आगमन उशीरा झाल्याने 19 ऑगस्टपर्यंत राज्यातील 123 तालुक्‍यात 50 टक्‍क्‍यांहून कमी पाऊस झाल्याने या तालुक्‍यांमध्ये टंचाई सदृश्‍य परिस्थिती जाहीर करण्यात येत आहे. या तालुक्‍यांमध्ये कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये 33 टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांची परिक्षा शुल्क माफी व शेतसारा माफी या सवलती लागू राहतील, असे शासन आदेशात म्हटले आहे. सर्व विभागिय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यासह मंत्रालयातील सर्व विभागांना अंमलबजावणीसाठी हा आदेश पाठविण्यात आला आहे.

*जिल्हानिहाय टंचाईग्रस्त तालुके
जिल्हा --- टंचाईग्रस्त तालुके
पुणे --- दौंड
नंदूरबार --- नवापूर
गडचिरोली --- सिरोंचा
वाशिम --- रिसोड, मालेगाव, मानोरा
जळगाव --- मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड
नाशिक --- मालेगाव, नांदगाव, येवले, देवळा
सोलापूर --- बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस
लातूर --- औसा, अहमदपूर, उदगीर, चाकूर, जळकोट
औरंगाबाद --- औरंगाबाद, पैठण, गंगापूर, खुलदाबाद, फुलंब्री
हिंगोली --- हिंगोली, कळमनुरी, बसमत, औंढा नागनाथ, सेनगाव
उस्मानाबाद --- उस्मानाबाद, तुळजापूर, परांडा, भूम, कळंब, उमरगा, लोहारा
बीड --- पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, केज, परळी, धारुर, शिरुर कासार
परभणी --- परभणी, गंगाखेड, पाथ्री, जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ, मानवत
जालना --- भोकरदन, जाफ्राबाद, जालना, अंबड, परतूर, बदनापूर, घनसांगवी, मंठा
नगर --- पारनेर, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता
चंद्रपूर --- चंद्रपूर, मुल, गोंडपिंपरी, वरोरा, भद्रावती, नागभीड, राजुरा, कोरपना, बल्लारपूर, पोंभुर्णा, जिवती
बुलडाणा --- चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा
यवतमाळ --- यवतमाळ, कळंब, दिग्रस, आर्णी, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मोरेगाव, झरी जामडी, केळापूर, घाटंजी, राळेगाव
नांदेड --- नांदेड, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव.
--------------------------------- 

2012 च्या गारपिट नुकसानिला ७.४५ कोटी रुपये मदत

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2012 या कालावधीत गारपीट व पूरपरिस्थितीमुळे 50 टक्‍क्‍यांहून जास्त नुकसान झालेल्या 23 हजार 604 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना सात कोटी 45 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मार्च 2015 पर्यंत ही मदत वाटपाचे काम पूर्ण करण्याचा आदेश कृषी विभागाला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एक हेक्‍टर क्षेत्रसाठी किंवा कमी क्षेत्र असल्यास किमान 500 रुपये मदत दिली जाणार आहे.

विशेष म्हणजे नुकसानीनंतर तब्बल दोन वर्षांनी मदतीचा निर्णय घेताना राज्य शासनाने केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे कोरडवाहू पिकांना हेक्‍टरी तीन हजार रुपये, बागायती पिकांना हेक्‍टरी सहा हजार रुपये तर फळबागांना हेक्‍टरी आठ हजार रुपये याप्रमाणे फक्त मदत देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निकषानुसार सर्वाधिक 22 हजार 855.52 हेक्‍टर कोरडवाहू क्षेत्रावरील शेतीपिकांना सहा कोटी 85 लाख 67 हजार रुपये, 741.84 हेक्‍टर फळपिकांना 59 लाख 35 हजार रुपये तर 6.70 हेक्‍टर सिंचनाखालील शेतीपिकांना 40 हजार रुपये मदत मिळणार आहे.

*अशी मिळेल मदत
- मदतीचे वाटप कृषी विभागामार्फत होणार.
- मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक बचत खात्यात थेट जमा होईल.
- कोणत्याही खातेदाराला रोखिने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत दिली जाणार नाही.
- योग्य व्यक्तींना, योग्य प्रमाणात मदत वाटपाच्या सुचना.
- लाभार्थ्यांची माहिती ग्रामपंचायत, चावडी, सुचनाफलकावर जाहिर करणे बंधनकारक.
- बॅंकेला या रकमेतून कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.
- मार्च 2015 पर्यंत मदत वाटप पूर्ण करण्याचे आदेश.

*चौकट
- जिल्हानिहाय पिकनिहाय मदतीस पात्र क्षेत्र
जिल्हा --- पिक व क्षेत्र (हेक्‍टर)
धुळे --- केळी 3
नंदुरबार --- मुग 1.20, कापूस 14.46
नगर --- ज्वारी 188.30, कापूस 33.70, कांदा 7.80, भाजीपाला 17.90, द्राक्ष 4
कोल्हापूर --- भुईमुग 39.64, इतर शेतीपिके 15.37, केळी 2.24, आंबा 7.14, इतर फळपिके 79.19
लातूर --- मुग 0.40, उडीद 0.40, तूर 6.59, सोयाबीन 2722.75, इतर शेतीपिके 3.30
अकोला --- मुग 2377.52, तूर 386.07, कापूस 2869.71, सोयाबीन 2964.18, इतर शेतीपिके 926.03
यवतमाळ --- ज्वारी 179.82, तूर 345.43, कापूस 3604.08, सोयाबीन 1632.92, इतर शेतीपिके 241.30
पुणे --- ज्वारी 1062.59, मका 59.26, भुईमुग 0.80, भाजीपाला 12.80, इतर शेतीपिके 45.51, ऊस 6.70, केळी 4.20, आंबा 1, डाळिंब 24.80, संत्रा 2, मोसंबी 3, इतर फळपिके16.19
जळगाव --- ज्वारी 179.64, मका 21.09, मुग 212.26, उडीद 139.59, तूर 16.24, कापूस 2456.90, भाजीपाला 1.85, इतर शेतीपिके 68.12, केळी 562.08, इतर फळपिके 33
---------------- 

राजा उदार झाला... "जीआर'ला ऊत आला !

पुणे (प्रतिनिधी) ः एरवी एखादा आदेश काढण्यासाठी महिना महिना वेळ घेणाऱ्या राज्य शासनाने आता विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहिर होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला असताना एकामागून एक शासन आदेश काढण्याचा धडाका लावला आहे. संपूर्ण जुलै महिन्यात सुमारे 500 आदेश काढण्यात आल्यानंतर ऑगस्टमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या 15 दिवसातच तब्बल 500 आदेश काढण्यात आले. विशेष म्हणजे मंगळवारी (ता. 19) एवघ्या एकाच दिवसात तब्बल 50 शासन आदेशांचा उच्चांकी पाऊस पाडण्यात आला.

राज्य शासनाच्या विविध खात्यांमार्फत लागू करण्यात येणार शासन आदेश राज्य शासनाच्या मुख्य संकेसस्थळावर दररोज प्रसिद्ध करण्यात येतात. याशिवाय मंजूर होऊनही संकेतस्थळावर जाहिर न केल्या जाणाऱ्या शासन आदेशांची संख्याही मोठी आहे. गेल्या काही महिन्यांचा आढावा पाहता सर्वसाधारणपणे दररोज सुमारे 20 शासन आदेश लागू केले जातात. यापुर्वी 20 जुलै रोजी राज्य शासनामार्फत फक्त एक आदेश जारी करण्यात आला होता. ही संख्या वाढत गेली. ऑगस्टपासून त्याचा वेग प्रचंड वाढल्याचे चित्र असून एका दिवसात 50 शासन आदेश जारी करण्यापर्यंत हा धडाका उंचावला आहे.

निवडणूक तोंडावर आल्याने शासन कशाला नाही म्हणणार नाही या आशेवर विविध संस्था, संघटनांनीही आपल्या प्रलंबीत मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मंत्रालयात "फिल्डींग' लावली असून अनेकांचे प्रतिनिधी त्यासाठी मंत्रालयात मुक्काम ठोकून असल्याची स्थिती आहे. यापुढे आचारसंहिता लागू होईपर्यंतच्या क्षणापर्यंत उत्तरोत्तर शासन आदेश लागू होण्याची ही लगिनघाई वाढत जाण्याची चिन्हे असून त्यातही "बॅक डेट'ने आदेश काढण्याचेही प्रकार होण्याची शक्‍यता असल्याची माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली.

लागू करण्यात आलेल्या शासन आदेशांमध्ये विविध योजनांसाठी निधी मंजूर करणे, नवीन प्रकल्पांना मंजूरी, शासकीय अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या पदोन्नत्या, नवीन अधिकारी व कर्मचारी भरती, कायमस्वरुपी विना अनुदानित शाळांना शासकीय अनुदान मंजुरी, विविध संस्था व पदाधिकाऱ्यांना आर्थिक लाभ, सल्लागारांच्या नेमणूका, संगणक व इतर यंत्र खरेदी, महागाई व इतर भत्ते, अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रकल्पांच्या वाढीव खर्चास मंजूरी, प्रोत्साहनपर वेतनवाढ, विविध प्रकल्पांचे भुमिपुजन, पारितोषिके व पुरस्कार यांचे या आदेशांमध्ये प्रमाण अधिक आहे.
------------- 

विखे पाटील जन्मदिन आता शेतकरी दिन

पुणे (प्रतिनिधी) ः सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी भरिव कार्य केलेले जेष्ठ नेते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस यापुढे राज्यभर दर वर्षी शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याच्या कृषी विभागाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने हिरवा कंदिल दाखवला आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. यंदा ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये शेतकरी दिन साजरा करण्यासाठी कृषी विभागाच्या निधीतून चार कोटी 44 लाख 14 हजार रुपये खर्च करण्यासही राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.

राज्यात विविध विभागांमार्फत कामगार दिन, महिला दिन, आरोग्य दिन, बाल दिन, कृषि दिन असे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. मात्र राज्यातील जनतेची अन्नधान्य, फळे, भाजीपाल्याची गरज भागविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्यात कोणताही विशेष असा दिवस साजरा केला जात नाही. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक उंची वाढविण्यासाठी भरिव कार्य केले. त्याबद्दल त्यांना पद्मश्री, डॉक्‍टरेट आदी सन्मान बहाल करण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून विखे पाटील यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याच्या कृषी विभागाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत असल्याचे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यमान कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू होत.

शेतकरी दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चहापाणी, मंडप, हारतुरे, फोटो, फ्लेक्‍स, प्रदर्शन आदी बाबींवरील खर्चासाठी गावपातळीवर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक हजार 500 रुपये याप्रमाणे 27 हजार 906 ग्रामपंचायतींसाठी चार कोटी 18 लाख 59 हजार रुपये, तालुका स्तरावरील कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्‍यास दोन हजार 500 रुपये याप्रमाणे 356 तालुक्‍यांना आठ लाख 90 हजार रुपये तर जिल्हा स्तरीय कार्यक्रमासाठी प्रति जिल्हा पाच हजार रुपये याप्रमाणे 33 जिल्ह्यांसाठी एक लाख 65 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय शेतकरी दिनाच्या प्रचार व प्रसिद्‌धीसाठी आणखी 15 लाख रुपये खर्च करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. हा सर्व खर्च कृषी आयुक्तांच्या स्तरावर उपलब्ध असलेल्या निधीतून भागविण्यात यावा, असेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले असून याबाबतच्या मार्गदर्शक सुचना तयार करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना देण्यात आले आहेत.
------------------ 

एमपीएस्सीच्या घोळामुळे कृषीचे विद्यार्थी संकटात

वन सेवा पूर्व परिक्षेचे मराठी माध्यम ऐनवेळी रद्द

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल 2014 मध्ये घेतलेल्या पूर्व परिक्षेत मराठी भाषेतून परिक्षा देण्याची सुविधा ऐनवेळी रद्द केल्याने संकटात सापडलेल्या कृषी व संलग्न विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी या परिक्षेच्या निकालास विरोध केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) दिलेल्या निर्णयानुसार या विद्यार्थांच्या नुकसानीचा विचार करुन सर्वांना मुख्य परिक्षेस बसू द्यावे, अशी मागणी परभणी, पुणे व औरंगाबाद येथिल कृषी व संलग्न विद्याशाखांच्या पदविधरांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2014 मध्ये वन सेवेच्या 282 जागांसाठी अर्ज मागविले. या जाहिरातील पूर्वपरिक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषा असल्याचे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात 27 एप्रिलला फक्त इंग्रजी भाषेतूनच परिक्षा घेण्यात आली. यामुळे मराठी माध्यम निवडलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. यापैकी दानिश पठाण व इतर विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आयोगाने कायदेशीर मुद्‌द्‌यांचा खल न करता पूर्वपरिक्षेचा निकाल लागल्यावर परिक्षार्थींनी तक्रार केल्यास त्याचा विचार करावा व त्यांना कसा दिलासा देता येईल हे ठरवावे, असा निर्णय मॅटने 11 ऑगस्टला निर्णय दिला.

आयोगाने पूर्व परिक्षेचा निकाल या निर्णयाच्या अधिन राहून जाहिर केलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी आक्षेप असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेस बसु द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परभणी, पुणे, अकोला, औरंगाबाद आदी भागातील सुमारे 500 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत लोकसेवा आयोगास वैयक्तिक व सामुहिक तक्रारी नोंदविल्या आहेत. अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोफाईलवरुन लोकसेवा आयोगाकडे प्रतिक्रीया नोंदवाव्यात, असे आवाहन परभणी येथिल स्पर्धा परिक्षा मंचामार्फत करण्यात आली आहे.

दरम्यान, एमपीएस्सीमार्फत वन सेवा पुर्व परिक्षेचा निकाल 20 ऑगस्टला जाहिर झाला आहे. पुणे केंद्रातून दोन हजार 292, औरंगाबादमधून 512, नागपूरहून 373 व मुंबईतून 326 असे एकूण तीन हजार 503 विद्यार्थी मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. मुख्य परिक्षा 27 सप्टेंबरला पुणे, मुंबई, औरंगाबाद व नागपूर या चार केंद्रांवर घेण्यात येणार आहे. पूर्व परिक्षेच्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधिन राहून मुख्य परिक्षेस प्रवेश देण्यात येईल, असे एमपीएस्सीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------- 

राज्यात पुन्हा माॅन्सून सक्रीय

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात आता पुन्हा एकदा नैऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सक्रीय झाला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र व विदर्भात मॉन्सून सक्रीय होता. या दोन्ही विभागांसह कोकण व मराठवाड्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. मॉन्सूनची सक्रीयता कायम राहण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व या चारही विभागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्राबरोबरच उपसागराच्या बाजूनेही राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याच्या दृष्टीने अनुकूल हवामान आहे. राज्यभर आकाशात बाष्पयुक्त ढगांची दाटी आहे. मध्यपूर्व अरबी समुद्र आणि त्यालगतच्या महाराष्ट्र व कर्नाटकच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मराठवाड्यावरील चक्राकार वाऱ्यांची तिव्रता शनिवारी कमी झाली. समुद्रसपाटीच्या पातळीवर असेला मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा त्याच्या मुळ स्थानाच्या उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याशी सक्रीय आहे. या सर्व स्थितींच्या एकत्रित प्रभावामुळे पावसाची शक्‍यता अधिक वाढली आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. यवतमाळ येथे सर्वाधिक 110 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पाऊस पडलेल्या बहुतेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडासह वादळी पाऊस अनुभवास आला.

राज्यात ठिकठिकाणी शनिवारी (ता.23) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
कोकण ः विक्रमगड, कर्जत प्रत्येकी 60, वाडा 50, जव्हार, भिवंडी प्रत्येकी 30, कल्याण, मुरुड, पनवेल, माथेरान, पोलादपूर, उरण, शहापूर, मुंबई प्रत्येकी 20, रोहा, संगमेश्‍वर, देवरुख, मोखाडा, पालघर, सुधागड, उल्हासनगर, राजापूर, चिपळूण, कानकोन, ठाणे प्रत्येकी 10

घाटमाथा ः भिवपुरी 90, खंद 70, वाणगाव, ताम्हिनी प्रत्येकी 50, डुंगरवाडी 30, अम्बोणे, भिरा प्रत्येकी 10

मध्य महाराष्ट्र ः गिरणा 50, गिधाडे, श्रीरामपूर, नाशिक, सोलापूर प्रत्येकी 40, पुणे, चांदवड, साक्री, चोपडा, शहादा प्रत्येकी 30, चाळीसगाव, यावल, नगर, दिंडोरी, तळोदा, धाडगाव, नांदगाव, बागलाण, जुन्नर, हरसूल, कोरेगाव, जामनेर प्रत्येकी 20, सिन्नर, येवला, पुणे, सिंदखेडा, शिरपूर, सातारा, अकोले, संगमनेर, इगतपुरी, पौंड, वेल्हे, सांगोला, दहिवडी, खेड, शिरुर, पेठ, पाटण, वाई, मालेगाव, खंडाळा बावडा, फलटण, वडगाव, ओझरखेडा प्रत्येकी 10

मराठवाडा ः औरंगाबाद 40, बीड, खुलताबाद प्रत्येकी 30, सेनगाव, सिल्लोड, वैजापूर, आष्टी प्रत्येकी 20, लोहारा, उमरगा, भोकरदन, कळमनुरी प्रत्येकी 10

विदर्भ ः यवतमाळ 110, कारंजालाड, गोंदिया प्रत्येकी 90, दारव्हा 80, तिरोडा, सेलू प्रत्येकी 70, वरुड, तुमसर, नांदगाव काझी प्रत्येकी 60, नागपूर, रामटेक, दिग्रस, नेर प्रत्येकी 50, मौदा, समुद्रपूर, चांदूर रेल्वे प्रत्येकी 40, पुसद, कुही, नांदुरा, धामणगाव रेल्वे, शेगाव, वाशीम, रिसोड, चिखलदरा, लाखनी, गोरेगाव, अंजनगाव, मनोरा प्रत्येकी 30, मेहकर, भातकुली, मंगरुळपीर, पारशिवनी, बाळापूर प्रत्येकी 20, बार्शीटाकळी, पातुर, खामगाव, मुर्तीजापूर, दर्यापूर, अहिरी, अकोला, लोणार, कळमेश्‍वर, भंडारा, भामरागड, एटापल्ली, पौनी, मोताळा, बाबुलगाव, धारणी, हिंगणा, अमरावती, सावनेर, मोहाडी, मालेगाव, मलकापूर, काटोल प्रत्येकी 10
------------------ 

Friday, August 22, 2014

आत्माचे कंत्राटी कर्मचारी न्यायालयात

पुणे ः कृषी विभागाच्या कंत्राटी सेवेतील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी केंद्र सरकारच्या आत्मा यंत्रणेतील सांगली व कोल्हापूर येथिल कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली आहे. आत्मा बरोबरच कृषी विभागाच्या स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, थेट शेतमाल विक्री, कृषी व पणन विभागाच्या योजनांची कामेही करावी लागत असल्याने कंत्राटी ऐवजी कायमस्वरुपी सेवेत सामिल करुन घ्यावे, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विस्तार विषयक योजनांना सहाय्य या योजनेअंतर्गत 2005 पासून आत्मा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत राज्य स्तरावर संचालक, जिल्हा स्तरावर प्रकल्प संचालक, प्रकल्प उपसंचालक, लेखणी लिपिक ही नियमित पदे निर्माण करण्यात आली. यावेळी राज्य स्तरावर राज्य समन्वयक (दरमहा 40 हजार रुपये, जिल्हा स्तरावर संगणक आज्ञावली (दरमहा 12 हजार रुपये) व तालुका स्तरावर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (दरमहा 20 हजार रुपये) व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (दरमहा 8,500 रुपये) ही कंत्राटी पदे 2010 मध्ये भरण्यात आली. दर 11 महिन्यांनी ही पदे पुन्हा पुन्हा मुलाखती घेवून भरली जातात. त्याऐवजी ही पदे आत्मा योजना लागू असेपर्यंतच्या कालावधीसाठी कायमस्वरुपी भरावीत, अशी मागणी आहे.
------------- 

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कार्यशाळा

पुणे ः राज्यातील 102 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीओ) प्रतिनिधींसाठी आज (शनिवारी) "शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्यांचा शाश्‍वत विकास' या विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी- चिंचवडमधील एका खासगी हॉटेलमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, त्यासाठी फक्त निमंत्रितांना प्रवेश देण्यात येणार आहे. कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार आहे.
आत्मा, स्मॉल फार्मर्स ऍग्रीबिझनेस कॉन्सॉरटियम (एसएफएसी), एशियन डेव्हलपमेंट बॅंक अँड जपान फंड फॉर पोर्व्हटी रिडक्‍शन (एडीबी-जेएफपीआर) व जागतिक बॅंकेचा महाराष्ट्र स्पर्धाक्षम शेती प्रकल्प (एमएसीपी) यांच्यामार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी आयुक्त उमाकांत दांगट, एमएसीपीच्या प्रकल्प संचालक डॉ. एम. नीलिमा केरकट्टा, एसएफएसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवेश शर्मा, केंद्रीय कृषी मंत्रालयातील विस्तार व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. आर. के. त्रिपाठी, सहायक निबंधक (कंपनी) डॉ. अमोल शिंदे, कृषी सहसंचालक ए. के. हराळ, एसएफएसीच्या डॉ. कल्पना पोखरीयाल हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
------------ 

Thursday, August 21, 2014

पुण्यात सर्वदूर पाऊस

पुणे ः गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्याच्या उत्तर भागातील काही महसूल मंडळांचा अपवाद वगळता बहुतेक तालुक्‍यात अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पुरंदर तालुक्‍यातील जेजूरी येथे जिल्ह्यातील सर्वाधिक 105 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असून मावळ पट्ट्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. गुरुवारी (ता.21) सकाळपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः जेजूरी 105, राजेवाडी 35, वेल्हा 50, कुंभरवळण 38, सासवड 13, कडेगाव 17, राहू 30, यवत 31, पाटस 43, मोरगाव 12, सुपा 31, वडगाव 31, वडगाव 23, शिरुर 20, रांजणगाव 30, तळेगाव 52, मलठण 20, न्हावरा 55, टाकळी 27, चाकण 23, बेल्हा 10, किकवी 10, नसरापूर 21, थेऊर 68, खेड 10, खडकवासला 19
-------------------------------- 

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः कर्नाटकातील चक्राकार वारे मराठवाड्यावर दाखल झाल्याने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत या दोन्ही विभागांत अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी (ता. 23) सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. कोकणात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
लक्षद्वीप बेटे व कोमोरीन परिसरात चक्राकार वारे जोरदारपणे सक्रिय झाल्याने पावसाला अनुकूल स्थिती असू,÷िअनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. मध्य प्रदेशच्या पूर्व भागापासून मराठवाडा, कर्नाटक ते केरळपर्यंतच्या भागात बुधवारी सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर गुरुवारी सकाळपर्यंत ओसरला. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टाही हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला. मात्र याच वेळी दक्षिण अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची तीव्रता वाढून शनिवारी (ता. 23) दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कर्नाटक व केरळच्या उत्तर किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मराठवाड्यावरील चक्राकार वारे आसपासच्या भागात आणखी काही काळ कायम राहिल्यास या भागात पावसाचे प्रमाण वाढू शकते, अशी माहिती हवामान खात्याच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. राज्यात सातारा येथे सर्वाधिक 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथा व कोकणाच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक होते.
राज्यात ठिकठिकाणी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः कोकण ः वेंगुर्ला, कर्जत प्रत्येकी 70, अलिबाग 50, मुंबई 30, मुरबाड, कानकोन, सुधागड, पाली प्रत्येकी 20, सावंतवाडी, खालापूर, माथेरान, चिपळून, पेण, मुरूड, मालवण, उरण, दोडामार्ग प्रत्येकी 10.
मध्य महाराष्ट्र ः सातारा 110, खंडाळा बावडा 50, सासवड 40, साक्री, गगनबावडा, जावळी, शिरूर प्रत्येकी 30, जत, मंगळवेढा, दिंडोरी, वाई, कडेगाव, बागलाण, गडहिंग्लज, अमळनेर, कळवण, कराड, दौंड प्रत्येकी 20, विटा, कर्जत, पंढरपूर, आटपाडी, चंदगड, कोरेगाव, फलटण, बारामती, शिराळा, करमाळा, भोर, हातकणंगले, वडूज प्रत्येकी 10.
मराठवाडा ः उदगीर, जळकोट, गेवराई, गंगापूर, खुलताबाद, भोकरदन प्रत्येकी 20, खंदार, बीड, पाटोदा, सिल्लोड, फुलंब्री, नायगाव खुर्द, कन्नड, लातूर, घनसावंगी प्रत्येकी 10.
विदर्भ ः लाखनी 50, मंगरुळपीर 40, सेलू, सिंदखेडराजा प्रत्येकी 30, कुरखेडा, अमरावती, वाशीम प्रत्येकी 20, देसाईगंज, मोताळा, साकोली, अर्जुनी मोरगाव, मौदा, मालेगाव, तिवसा, कुही, आष्टी, मोर्शी, गोंडपिंपरी, देवळी, मानोरा, धामणगाव रेल्वे, पोंभुर्णा प्रत्येकी 10.

Wednesday, August 20, 2014

कृषीमंत्र्यांच्या संस्थेला कृषीरत्न पुरस्कार

पुणे (प्रतिनिधी) ः राज्य शासनाने पाच दिवसांपुर्वी कृषी क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यासाठीचे सर्व पुरस्कार जाहिर केल्यानंतर कृषी विभागाच्या "खास' आग्रहास्तव खुद्द राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या "प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऍण्ड एज्युकेशन इन नॅचरल ऍण्ड सोशल सायन्सेस' (राहता, नगर) या संस्थेला डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना पुरवणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

राज्याच्या कृषीविषयक पुरस्कारांच्या इतिहासात यंदा प्रथमच पुरवणी पत्राद्वारे यापुर्वी जाहिर झालेल्या पुरस्कारांमध्ये अधिक पुरस्कारार्थींची भर टाकल्यात आली आहे. त्यातही ही भर कृषीमंत्र्यांच्याच संस्थेची आहे, हे विशेष. याबरोबरच कोतुळ (अकोले, नगर) येथिल सदाशिव गोपाळराव पोखरकर यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार तर अनंत दिगंबर प्रभुआजगांवकर (आडेली, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग), सुरेश काशिनाथ कदम (नेऊरगाव, येवला, नाशिक) व भारत एकनाथ शिंदे (बोरी, इंदापूर, पुणे) यांना 2013 साठीचे उद्यानपंडीत पुरस्कार जाहिर झाले आहेत.

कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी 1984 मध्ये प्रवरा इन्स्टिट्यूटची स्थापना केली. राधाकृष्ण विखे पाटील हे या संस्थेचे विश्‍वस्त आहेत. संगणक व्यवस्थापन, अंगणवाडी प्रशिक्षण, स्वयंरोजगार प्रशिक्षण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेमार्फत 1992 मध्ये बाभळेश्‍वर (ता. रहाता) येथे कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. या कृषी विज्ञान केंद्राने अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले असून त्यासाठी त्यांना 2000 सालचा देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्राचा पुरस्कार मिळालेला आहे.
------------------- 

कृषी विस्तारासाठी स्वतंत्र एनआरसी !

आयसीएआरच्या विस्तार विभागाचा प्रस्ताव; पुण्यात स्थापनेसाठी हालचाली

पुणे (प्रतिनिधी) ः द्राक्ष, कांदा व लसूण पिकांपाठोपाठ आता कृषी विस्तारासाठीचे स्वतंत्र राष्ट्रीय संशोधन केंद्र (एनआरसी) पुण्यात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) विस्तार विभागाने याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे सुमारे सहा महिन्यांपूर्वीच सादर केला आहे. मात्र आता सत्तापालट झाल्याने हा प्रस्ताव सध्या प्रस्तावित अवस्थेत आहे.
देशात सध्या पीकनिहाय अनेक राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांमध्ये त्या त्या पिकाच्या वा संशोधनाच्या अनुषंगाने विस्तार तंत्रज्ञानाबाबतही संशोधन होते. मात्र देशात कोठेही कृषी विस्तारासाठीचे स्वतंत्र संशोधन केंद्र कार्यरत नाही. या पार्श्‍वभूमीवर देशासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून पुण्यात कृषी विस्ताराचे राष्ट्रीय संशोधन केंद्र असावे असा मुद्दा पुढे आला असून, त्यासाठी आयसीएआरच्या विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे.

- आळंदीची जागा देण्यास आयुक्तालय तयार
भारतीय कृषी संशोधन संस्थेमार्फत कृषी विस्तारासाठी स्वतंत्र राष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असेल तर त्यासाठी पुण्यात आळंदीजवळील चऱ्होली येथील कृषी विभागाची जागा त्यासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी कृषी आयुक्तालयाने दाखवली आहे. आयसीएआरचे उपमहासंचालक (विस्तार) डॉ. किरण कोकाटे व कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या नुकत्याच बैठकीत याबाबत चर्चा झाली. पुण्यापासून हाकेच्या अंतरावर चऱ्होली येथील ही जागा या केंद्रासाठी उपयुक्त ठरेल, असा आशावाद डॉ. कोकाटे यांनी या वेळी व्यक्त केला.

- पुण्यातील जागा पुन्हा चर्चेत
कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या मोक्‍याच्या ठिकाणच्या जागा हा विषय यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडून या जागांची मागणी सातत्याने होत आहे. चऱ्होली येथे कृषी विभागाची सुमारे 32 एकर जागा आहे. यापैकी सुमारे 20-22 एकर जागा सध्या मोकळी असून त्यावर अनेकांचा डोळा आहे. महापालिकेमार्फतही त्यावर आरक्षणे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही बाजूंनी खासगी बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न चालवला आहे, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली.

- संशोधन केंद्रांतील विस्तार कमकुवत
कृषी विस्तारासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या संशोधन केंद्राची कृषी विस्ताराची बाजू अधिक बळकट करावी, अशी मागणी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञांनी केली आहे. आयसीएआरच्या संशोधन केंद्रांबरोबरच विद्यापीठांच्या संशोधन केंद्रांचीही विस्ताराच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात दुरवस्था आहे. ती दूर करण्यास प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे.

- केव्हीकेंची कार्यक्षमता वादात
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक-दोन कृषी विज्ञान केंद्रे सुरू होत आहेत. आयसीएआरच्या विस्तार विभागामार्फत हे काम सुरू आहे. आत्तापर्यंत सुरू झालेल्या केंद्रांपैकी बाभळेश्‍वर, बारामती यासह काही ठिकाणची केंद्रे चांगली काम करत आहेत. मात्र, बहुसंख्य केव्हीकेंचे काम समाधानकारक नाही. आमच्या पाहणीनुसार विदर्भ, मराठवाड्यातील काही कव्हीकेंची फाटकेही उघडली जात नाहीत, अशी अवस्था आहे. यामुळे केव्हीकेंचे बळकटीकरण आणि कार्यक्षमता वाढ अधिक महत्त्वाची आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या विस्तार यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

- विद्यापीठांचे विस्तार विभाग
देशातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये कृषी विस्तार प्रशिक्षण, संशोधन व शिक्षणासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. मात्र या ठिकाणच्या संशोधकांना मुख्य कामापलीकडची इतर कामे सांभाळता सांभाळता मूळ कामासाठी वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या विस्तार विभागातील प्राध्यापक संशोधकांचे हे दुखणे आहे. विद्यापीठ पातळीवर माहिती केंद्रे उभारण्यात आली आहेत; मात्र त्यांचे कार्य फक्त दैनंदिनी काढणे आणि उत्पादने विकण्यापुरते मर्यादित राहिले आहे. आयसीएआरने विद्यापीठांची शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी गेली पाच वर्षे विशेष प्रयत्न केले. आता आयसीएआरमधील दिल्लीकरांनी विद्यापीठांचे विस्तार विभाग बळकट करण्यास प्रथम प्राधान्य द्यावे, असे मत माजी कुलगुरूंनी व्यक्त केले.

- विस्तार शिक्षण, व्यवस्थापन संस्था
आनंद, हैदराबाद, हिस्सार यासह देशपातळीवर चार ठिकाणी विभागीय पातळीवर विस्तार शिक्षण संस्था कार्यरत आहेत. आनंद (गुजरात) येथील कृषी विस्तार संस्था ही महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दादरा व नगर हवेली, दीव व दमण आणि छत्तीसगड या राज्यांसाठीची ही संस्था आहे. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम या संस्थेमार्फत राबविला जातो. याशिवाय हैदराबाद येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर एक्‍स्टेन्शन मॅनेजमेंट ही राष्ट्रीय पातळीवरील कृषी विस्तार व्यवस्थापनाची संस्था कार्यरत आहे.

कृषी परिषदेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील कृषी संशोधनातील तृटी, मुल्यमापनाचा अभाव, आयसीएआर आणि कृषी विद्यापीठांच्या संशोधनातील दरी आणि मनुष्यबळ विकास या सर्वच आघाड्यांवर राज्यात असमाधानकारक स्थिती असल्याचे स्पष्ट करत दापोली येथे सुरु असलेल्या चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन सभेत (जॉईंट ऍग्रेस्को) तज्ज्ञांकडून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या (कृषी परिषद) कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात गेली दोन दिवस राज्यातील कृषी संशोधनाचा उहापोह सुरु आहे. यामध्ये राज्यातील कृषी संशोधनातील दरी भरुन काढण्यासाठी बारकाई लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. संशोधनातील पिछाडी वा दुरावस्थेला कृषी परिषदेचा रटाळ कारभार हे ही एक प्रमुख कारण असल्याचे माजी कुलगुरुंनी ऍग्रोवनशी बोलताना सांगितले.

राज्यातील कृषी विद्यापीठांची समन्वयक शिखर संस्था म्हणून कृषी परिषदेने ही जबाबदारी पार पाडायला हवी. मात्र कृषी परिषद ही आयएएस अधिकार्यांना बाजूला फेकण्याचे, वरिष्ठ राजकारण्यांची सोय लावण्याचे, कृषीच्या नकोशा संचालकांना बाजूला ठेवण्याचे वा कनिष्ठ अधिकार्यांची वरिष्ठ पदावर सोय यासाठीचे ठिकाण म्हणून कृषी परिषदेकडे पाहिले जात आहे. याच अनास्थेतून कित्येक महिने परिषदेची बैठकही होत नसल्याचेही प्रकार सुरु आहेत.

अतिशय अनुभवी, जेष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची या अडगळीच्या समजल्या जाणाऱ्या ठिकाणी नेमणूक केली जाते. यामुळे अनेक जण कामावर फक्त कागदोपत्रीच उपस्थित असल्याचे प्रकार यापुर्वी घडले आहे. परिषदेचे उपाध्यक्षपद राजकीय कोट्यातून भरले जात असून ते गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. तर विद्यापीठातीलच प्राध्यापक दर्जाच्या अधिकार्यांना या ठिकाणी संचालक म्हणून ओढले जाते. कृषी विभागामार्फतही त्यांना अडचणीच्या अधिकार्याची येथे विस्तार संचालक म्हणून साईड पोस्टिंग दिली जाते. या पद्धतीवरही संशोधकांनी बोट ठेवले आहे.

- मॉनिटरींग, संनियंत्रणाचा अभाव
कृषी विद्यापीठांकडे केंद्र शासनाचे आयसीएआरचे काही संशोधन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचे मॉनिटरींग व संनियंत्रण पद्धती अतिशय चांगली आहे. या तुलनेत राज्य सरकार कृषी परिषद व विद्यापीठांवर पुष्कळ पैसे खर्च करते. संशोधनाची दिशा, त्याचे मॉनिटरींग व संनियंत्रण याबाबत राज्य शासनाची यंत्रणा असलेल्या कृषी परिषदेचे लक्ष नसल्याबाबत संशोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिषदेच्या दुर्लक्षामुळे राज्यात अनेक कालबाह्य संशोधन प्रकल्प सुरु असून नवीन संशोधन प्रकल्पांची वाट रोखली जात असल्याची शास्त्रज्ञांची भावना आहे.

*चौकट
- इमारती दिल्या भाड्याने
कृषी परिषदेची स्थापना झाल्यानंतर त्यासाठी पुण्यात भांबुर्डा येथे भव्य इमारत बांधण्यात आली. सुरवातीच्या काळात प्रवेश प्रक्रीया व इतर कामांच्या लगबगीने ही इमारत गजबजलेली असायची. मात्र टप्प्याटप्प्याने ही लगबग आणि गजबजही कमी होत गेली. आता तर कृषी परिषदेने आपल्या मुख्य इमारतीतील अनेक दालने भाड्याने देण्याचा धडाका सुरु केला आहे. यातूनच राष्ट्रीय बागवाणी मंडळासह इतर काही कार्यालये या इमारतीत सद्या सुरु आहे. अशिच स्थिती संशोधन व विस्ताराच्या समन्वयाची असून परिषद फक्त विद्यापीठांच्या फायली मंत्र्यांकडे पाठविणारे मध्यस्त म्हणून उरल्याची भावना विद्यापीठीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

- उत्तरे शोधण्याचे आव्हाण
हवामानातील बदल, गारपीट, पावसातील खंड यांना उत्तरे शोधणे हे राज्यातील कृषी संशोधकांपुढील खरे आव्हाण आहे. काही प्रकल्पांमध्ये बदल करुन, कालबाह्य प्रकल्प बंद करुन, नवे प्रकल्प सुरु करुन ही उत्तरे शोधली गेली पाहीजेत. खरीप ज्वारी क्षेत्र खुप कमी होत चाललेले आहे. मग त्यावरील संशोधनासाठी किती काम करायचे, गवार फॉर गम सारखी नवीन पिके, फलोत्पादन यात मोठी क्षमता असताना त्याकडे किती दुर्लक्ष करायचे याचा कुठेतरी पुर्नविचार झाला पाहिजे. आयसीएआरच्या पातळीवर पाच वर्षातून एकदा हे सारे खुप चांगल्या प्रकारे होते. कृषी परिषदेच्या पातळीवर मात्र काहीच होत नाही, अशी खंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांनी ऍग्रोवनशी बोलताना व्यक्त केली.

*कोट
कृषी परिषद ही यंत्रणा सर्वात कार्यक्षम पाहिजे. राजकीय, प्रशासकीय व कमी पात्रतेच्या संचालकांचे हे काम नाही. याठिकाणी अधिकाधीक तांत्रिक व त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींची गरज आहे. संशोधनाचे मुल्यमापन, दिशा ठरविण्याचे व अंमलबजावणीच्या संनियंत्रणाचे काम परिषदेमार्फत व्हायला हवे. दुदैवाने आज याकडे कुणीच लक्ष देत नाही.
- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.
-------------------------- 

कोकणात पाच वर्षांत लावा तीन लाख हेक्‍टर फलोत्पादन

महत्त्वाचे...
बातमीसह अहवालातील शिफारशींचे स्वतंत्र पान आहे.
--------------------------------------------------------
कोकणात पाच वर्षांत लावा तीन लाख हेक्‍टर फलोत्पादन
कृषी हवामाननिहाय गटाची शिफारस; स्वतंत्र संशोधन केंद्रांचाही आग्रह
पुणे (प्रतिनिधी) ः येत्या पाच वर्षांत कोकणातील आंबा, काजू, केळी, अननस, कंद पिके यांचे क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्‍टरने वाढवावे, जुन्या बागांच्या पुनरुज्जीवनासाठी 50 टक्के अनुदान देऊन धडक मोहीम राबवावी, नारळ सुपारी व मसाला पिकांचे गटशेतीतून क्षेत्र वाढवावे, एक खिडकी बंद करून कृषी विभागाची पुनर्रचना करावी, ऊस, पणन आदीविषयक स्वतंत्र संशोधन केंद्रे स्थापन करण्यात यावीत आदी मागण्यांचा समावेश असलेल्या शिफारशी कोकणच्या कृषी हवामान विभागनिहाय गटाने नुकत्याच शासनाला सादर केल्या आहेत.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून राज्यात कृषी हवामान विभागनिहाय कृषी विकास धोरण निश्‍चित करून त्याप्रमाणे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागनिहाय गट स्थापन करण्यात आले होते. यापैकी दक्षिण कोकण किनारपट्टी प्रदेश व उत्तर कोकण किनारपट्टी प्रदेश या दोन कृषी हवामान विभागांसाठीच्या अभ्यास गटाने आपल्या शिफारशी राज्य शासनास नुकत्याच सादर केल्या आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने या शिफारशी आपल्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केल्या आहेत. इतर विद्यापीठांनी अद्याप या शिफारशी जाहीर केलेल्या नाहीत.
कोकणातील हवामान विभागनिहाय गटाने केलेल्या शिफारशींमध्ये फलोत्पादन पिकांचा क्षेत्र विस्तार आणि संशोधनाच्या दृष्टीने नवीन केंद्रांची स्थापना यावर विशेष जोर देण्यात आला आहे. आंबा, काजू, चिकू, भात अशी प्रमुख पिके, कृषी विभाग, पणन विभाग, कृषी विस्तार, यांत्रिकीकरण, कृषी शिक्षण, निविष्ठा व कर्जपुरवठा, प्रक्रिया व मूल्यवर्धन आदी विषयांवर गटामार्फत शिफारशी करण्यात आल्या आहेत. यात कृषी सहायकाला ग्रामपंचायतीत स्वतंत्र कार्यालय देण्यापासून ते कृषी विभागाच्या पुनर्रचना आणि सिंधुदुर्गात ऊस संशोधन केंद्रापर्यंत अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत.
पुढील पाच वर्षांत नवीन क्षेत्रावर आंब्याची 50 हजार हेक्‍टर, ठाणे व रायगडमध्ये काजूचे 50 हजार हेक्‍टर, पाणी उपलब्ध असलेल्या भागात 30 हजार हेक्‍टरवर केळी व अननस तर कोकम, करवंद, फणस, जांभूळ यांचे क्षेत्र 25 हजार हेक्‍टरने वाढवावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. भाजीपाला, कंदपिके व फुलशेती याखाली 75 हजार हेक्‍टर नवीन क्षेत्र आणण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. गळीत धान्य विकासासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्राचा विकास करून तेथे क्षेत्रवाढीची शिफारस करण्यात आली आहे.

- या संशोधनासाठी हवीत स्वतंत्र केंद्रे
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत आंबा पिकासाठी स्वतंत्र संशोधन व विस्तार केंद्र, ऊस संशोधनासाठी सिंधुदुर्गात स्वतंत्र केंद्र, काजू व कोको संचालनालय कोचीन यांचे विभागीय कार्यालय कोकणात असावे, चिकू काढणी, हाताळणी व मूल्यवर्धन यावर संशोधन व्हावे, केळी व अननस लागवड तंत्रज्ञान संशोधनासाठी स्वतंत्र केंद्र, कोकम, जांभूळ, करवंद या पिकांसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र, भाजीपाला, कंद पिके व फुलशेतीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्रे असावीत, अशी मागणीवजा शिफारसही यात करण्यात आली आहे. 

एमपीकेव्हीचा २३ शासकीय महाविद्यालयांचा मास्टर प्लॅन

पुणे (प्रतिनिधी) ः प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी व संलग्न महाविद्यालय सुरु करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी 23 नवीन कृषी व संलग्न महाविद्यालये सुरु करण्याचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केला आहे. यापैकी सात महाविद्यालयांना विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने मान्यता दिली असून त्यांचे प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविण्यात आले आहेत. उर्वरीत महाविद्यालयांचे प्रस्ताव कार्यकारी परिषदेच्या पुढील बैठकीत सादर करण्यात येणार आहेत.

पुण्यात पाच, राहुरीत चार, धुळ्यात तीन, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नाशिक व जळगावात प्रत्येकी दोन तर सांगलीत एक महाविद्यालय प्रस्तावित आहे. यापैकी सात महाविद्यालयांचे प्रस्ताव कार्यकारी परिषदेच्या बैठकीत संमत होऊन राज्य शासनाच्या मान्यतेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे सादर करण्यात आले आहेत. उर्वरीत महाविद्यालयांचे प्रस्ताव कार्यकारी परिषदेच्या पुढील बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव सुनिल वानखेडे यांनी दिली.

राहुरीमध्ये प्रस्तावित असलेल्या महाविद्यालयांसाठी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील सुमारे 100 हेक्‍टर जमीन तर पुण्यातील महाविद्यालयांसाठी पुणे कृषी महाविद्यालयाची जमीन उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. जळगावमध्ये कृषी महाविद्यालयासाठी आवश्‍यक 40 हेक्‍टरपैकी 13.01 हेक्‍टर जमीन जळगावच्या बिजगुणन केंद्राकडून तर उर्वरीत जमीन स्थानिक पातळीवर जवळच्या भागात उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा आहे. सांगलीत कृषी महाविद्यालयासाठी डिग्रज तालुका बीज गुणन केंद्राची 11.91 हेक्‍टर व कुपवाडच्या शासकीय रोपवाटीकेची 25.56 हेक्‍टर जमीन उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. इतर ठिकाणी शासनाकडून जमीन उपलब्ध होण्याची विद्यापीठाची अपेक्षा आहे

सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत 49 कायमस्वरुपी विना अनुदानित महाविद्यालये कार्यरत आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यात 11, पुणे जिल्ह्यात 8, नाशिमध्ये 9, साताऱ्यात 6, सांगलीत 3, सोलापूरात 4, जळगावमध्ये 3, कोल्हापूरात 3 तर धुळे व नंदुरबारमध्ये प्रत्येकी एक महाविद्यालय सुरु आहे.

- जिल्हानिहाय प्रस्तावित महाविद्यालये
पुणे --- पशुसंवर्धन, कृषी पशु संवर्धन, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन
धुळे --- वनिकी, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान
कोल्हापूर --- मत्स्य व्यवसाय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन
नगर (राहुरी) --- काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी
नाशिक --- कृषी, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान
सातारा (कराड) --- अन्न तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान,
सोलापूर --- कृषी, उद्यानविद्या
जळगाव --- कृषी, उद्यानविद्या
सांगली --- उद्यानविद्या
--------------
- कार्यकारी परिषदेची संमती, कृषी परिषदेकडे प्रस्तावित
प्रस्तावित महाविद्यालय --- आवश्‍यक जमीन (हेक्‍टर) --- प्रस्तावित पदे --- एकूण खर्च (कोटी रुपये)
कृषी, राहुरी --- 40 --- 60 --- 52.76
कृषी जैवतंत्रज्ञान, राहुरी --- 20 --- 84 --- 54.69
अन्न तंत्रज्ञान, राहुरी --- 20 --- 54 --- 48.71
कृषी व्यवसाय व्यवस्थापन, पुणे --- 20 --- 88 --- 58.49
कृषी, सांगली --- 40 --- 101 --- 61.61
कृषी, सोलापूर --- 40 --- 101 --- 42.70
कृषी, जळगाव --- 40 --- 101 --- 61.61
------------- 

"कृषी'चे संकेतस्थळ विभागाकडूनच "हॅक'!

ताज्या माहितीचा अभाव ः विद्यापीठांची संकेतस्तळेही बिनकामी

पुणे (प्रतिनिधी) ः ऐन खरिपाच्या तोंडावर राज्यातील शासकीय यंत्रणा सुस्त असल्याचा दाखला खुद्द कृषी विभागानेच आपल्या संकेतस्थळावर दिला आहे. सारे काही सुरळीत असल्याचा दावा करणाऱ्या कृषी विभागाने गेल्या दोन वर्षांपासून संकेतस्थळावरील अनेक प्रकारची अत्यावश्‍यक माहितीही अपडेट केलेली नाही. दोन वर्षांपूर्वीचे शासन आदेश आणि मार्गदर्शक सूचना या ठिकाणी कायम आहेत. कृषी विद्यापीठांनीही कृषी विभागाचीच री ओढत संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना हद्दपार केल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यातील इंटरनेट व संकेतस्थळांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात गावोगावच्या नागरी सुविधा केंद्रांमुळे या माहितीचा प्रसारही वाढला आहे. खरिपाच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील (www.mahaagri.gov.in) योजनांचा विभाग अशा शेतकऱ्यांबरोबरच कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठीही उपयुक्त व मार्गदर्शक ठरतो. नेमक्‍या याच बाबीकडे कृषी विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे.

फलोत्पादन विभाग, सांख्यिकी विभाग, जलसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभाग, कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग आणि आत्मा यांनी आपल्या कोणत्याही योजनेची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्याची अद्याप तसदी घेतलेली नाही. यंदा पाऊस कमी होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतरही आपत्कालीन नियोजन तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने अद्याप काहीही उपाययोजना हाती घेतल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- विना अनुदानितची घाई
याउलट कृषी विस्तार विभागाने काम सुरू असल्याचा व योजनांना मान्यता मिळत असल्याचा चित्र निर्माण करत केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे जशीच्या तशी योजनांच्या रकान्यात टाकली आहेत. राष्ट्रीय गळीतधान्य अभियान व तेलताड कार्यक्रम, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान यांच्या मार्गदर्शक पुस्तिका जशाच्या तशा इंग्रजीत प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने मांडण्याची वा मराठीकरण करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. बीजप्रक्रिया मोहीम, गाजर गवत निर्मूलन कार्यक्रम अशा परभारे विना अनुदानित पद्धतीने करावयाच्या उपाययोजनांव्यतिरिक्त शासनाच्या इतर सर्व योजनांविषयी विस्तार विभागाने अद्याप ब्र ही उच्चारलेला नाही.

- लाभार्थ्यांची माहिती गायब
योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती 2009-10 पासूनची काहीही माहिती कृषी विभागाने संकेतस्थळावर उपलब्ध केलेली नाही. चालू वर्षासाठीचा एकही शासन आदेश या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. राज्यात राबविण्यात येत असलेल्या कृषिविषयक कोणत्याच योजनेच्या सद्यःस्थितीची माहिती कृषीच्या संकेतस्थळावर नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी विभागाचे संकेतस्थळ असून अडचण आणि नसून खोळंबा ठरत आहे. अधिकाऱ्यांची याबाबतची उदासीनता राज्यातील कृषी तंत्रज्ञान प्रसाराला बाधक ठरण्याचा धोका आहे.

- विद्यापीठांकडूनही तुटपुंजे प्रदर्शन
महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची संकेतस्थळेही शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या दृष्टीने बिनकामाचीच असल्यासारखी आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आपले संकेतस्थळ (http://www.mpkv.ac.in/) बिगरकृषी विद्यापीठांप्रमाणे फक्त प्रशासकीय स्वरूपात व विद्यार्थ्यांपुरते मर्यादित ठेवले आहे. यावर शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन नियोजन, कृषी सल्ले आदी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने 2012 पर्यंतची माहिती उपलब्ध केली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन, विस्तार व उपक्रमांविषयीची चांगली अद्ययावत माहिती उपलब्ध केली आहे. मात्र चारही कृषी विद्यापीठांनी संकेतस्थळावर फक्त इंग्रजीचाच अवलंब केला असून, मराठीचा पर्याय उपलब्ध केलेला नाही. विशेष म्हणजे संगणकीकरणासाठी दर वर्षी निधी व मनुष्यबळ उपलब्ध असतानाही कृषिविषयक संकेतस्थळांची ही दुरवस्था कायम आहे. 

स्वयंचलित हवामान केंद्रासाठी फेरनिविदा


पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या काही वर्षांपासून नियोजन व निविदांच्या पातळीवर रखडलेल्या कृषी विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणी प्रकल्पाच्या फेरनिविदा प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. निविदा दाखल करण्यासाठीचा अर्ज कृषी आयुक्तालयातून विकत घेण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट असून 19 ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत निविदा स्विकारण्यात येणार आहेत. इच्छूक कंपन्यांमधून सर्वात कमी खर्चात प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीची निवड यातून करण्याचे नियोजन आहे.

राज्य शासनाने सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्याचा निर्णय 2011 मध्ये घेतला. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सुरवातीला 50 कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले. मार्च 2013 अखेरीस ही केंद्रे सुरु करण्याचे उद्दिष्ट होते. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून एका खासगी कंपनीला ही केंद्रे उभारण्याचे कंत्राटही देण्यात आले होते. मात्र 50 कोटींच्या या प्रकल्पाचा खर्च 116 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे सांगत कंपनीने निविदेत दिलेल्या बजेटमध्ये केंद्रे बसविण्यास नकार दिला. त्यानुसार कृषी विभागाने आता या वाढिव खर्चानुसार पुन्हा एकदा निविदा मागविल्या आहेत.
---------------------- 

Wednesday, August 6, 2014

शेती देशोदेशीची- 2 - आॅस्ट्रिया, नेदरलॅन्ड

"ऑस्ट्रिया'तील शेतकऱ्यांचे
एकात्मिक शेतीला प्राधान्य
-------------
काशिनाथ श्रीपत डुकरे
-------------
ऑस्ट्रियामधील शेतकरी एखाद्या परिपूर्ण उद्योगासारखी एकात्मिक शेती करतात. अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कंदपिके उत्पादन, दुग्धव्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन, शेतमाल प्रक्रीया व उत्पादनांच्या विक्रीबरोबरच घराच्या छपरावर सौर उर्जा निर्मितीचा पुरक व्यवसाय करण्याची आधुनिकता व व्यवहारीपणा यांचा सुरेख मेळ येथिल प्रगतशिल शेतकऱ्यांनी साधला आहे. यामुळे त्यांचा शेती व्यवसाय कमी धोक्‍यांचा, जादा नफ्याचा व अधिक शाश्‍वत झाला आहे.
--------------
स्वित्झरलॅन्ड, इटली, जर्मनी, हंगेरी आदी सात देशांच्या नजिकतेमुळे शेती उत्पादन व बाजारपेठेच्या दृष्टीनेही ऑस्टीयाचे युरोपमधील स्थान महत्वपुर्ण आहे. सुमारे 84 हजार चौरस किलोमिटरच्या या देशात 30 ते 35 हजार चौरस किलोमिटर क्षेत्र शेतीखाली असून लोकसंख्येच्या फक्त 10 टक्के लोक हा व्यवसाय करतात. त्यातही निम्मे शेतकरी 10 हेक्‍टरपेक्षा कमी जमीनधारणा असलेले तर 40 टक्के शेतकरी पाच हेक्‍टरहून कमी जमीनधारणा असलेले आहेत. कॉर्पोरेट फार्मिंगचे प्रमाणही येथे जास्त आहे. अन्नधान्य, दुध, पशुपालन व मांस उत्पादन या चार बाबींवर त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

फ्लॉरेसबर्ग जवळच्या एका गावातील शेती आम्ही पाहिली. या शेतकऱ्यांकडे गहू, बार्ली, ओट, बटाटा अशी पिके होती. पिकाची पेरणी, तणनाशकांची फवारणी व पिकाची काढणी या तिनच गोष्टी त्याच्यासाठी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. खात्रीशीर हवामान व रोगराईचे प्रमाण कमी असल्याने उत्पन्नही खात्रीशीर आहे. चार देशांच्या 10 दिवसांच्या प्रवासात कुठे एखादा किडा किंवा चिलटे दिसली नाहीत. वातावरण एवढे स्वच्छ व निर्मळ आहे की पिकांवर फार काही प्रकारची रोगराई नाही. बटाट्याचे पिक फुलांवर आले होते पण एक पानही किडीने चाटलेले, खाल्लेले नव्हते. किटकनाशके, बुरशीनाशकांचा वापर त्यांच्याकडे नगण्य आहे. तणनाशकांचा वापर मात्र जास्त आहे. आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्याचे दोन गोठे होते. गोठ्यांबरोबरच मुक्त पद्धतीचाही अवलंब केलेला होता. त्यासाठी शेतीच्या काही भागात गोठ्याजवळच कुरण राखून ठेवलेले होते. शेतकऱ्यांच्या आहारात गहू, बार्ली पासून बनविलेले रेडी टू ईट प्रकारचे ब्रेडसारखे खाद्यपदार्थ जास्त असतात.

- गाईंच्या नैसर्गिक गर्भधारणेवर भर
येथिल बहुतेक शेतकर्यांकडे तांबड्या-पांढर्या रंगाच्या होस्टेन फ्रिजियन जातीच्या गाई आहेत. आपल्यासारख्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या गाई त्यांच्याकडे दिसल्या नाहीत. त्याचे दुग्धउत्पादनासाठीच्या पशुपालनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाईंची गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने घडून आणतात. यासाठी गाईंच्या कळपात जातीवंत वळू आवर्जून ठेवले जातात. त्यापासून तयार झालेल्या कालवडी वाढवून अधिक दुध उत्पादन देणाऱ्या गाई घरच्या घरी तयार करण्याकडेही त्यांचा कटाक्ष असतो. दररोज 35 ते 40 लिटर दुध देणाऱ्या गाई त्यांच्याकडे आहेत. आपल्यासारखी तीन वेळा दुध काढण्याची पद्धत त्यांच्याकडे नाही. ते गाईंचे दुध सकाळ-संध्याकाळ याप्रमाणे दोन वेळा आढतात. त्यांच्याकडे म्हशी नाहीत. यामुळे दुध उत्पादन म्हणजे गाईचेच दुध असे त्यांचे सर्वसाधारण समिकरण आहे.

- करार शेती, पुरक व्यवसाय
आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्यांची स्वतःची 10 हेक्‍टर शेती होती. याशिवाय त्याने आणखी 30 हेक्‍टर शेती करार पद्धतीने कसायला घेतली होती. इथले शेतकरी पिक उत्पादनाबरोबरच विविध प्रकारचे पुरक व्यवसायही कौशल्याने करतात. या शेतकऱ्यांचा मांसासाठीचा वराहपालन प्रकल्प होता. एका जोडीपासून 30 वराह तयार झाले होते. त्यांचे मांसही हा शेतकरी स्वतःच ड्रेसिंग करुन ग्राहकांना थेट विकत होता. त्यासाठी त्याने त्याचे स्वतःचे छोटे दुकानही तयार केले होते. त्याच्याकडे तयार केले जाणारे पदार्थ, धान्य, भाजीपालाही याच ठिकाणी विक्रीला ठेवत होता. सर्व उत्पादने पॅकिंगमध्ये व प्रत्येकावर किमतीचे लेबल लेबल होते.

- फिरते कुक्कुटपालन
फ्रान्समधील एका विशिष्ट जातीच्या कोंबड्या ऑस्ट्रियामध्ये अधिक प्रमाणात पाळण्यात येत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्याकडेही याच प्रकारच्या 500 कोंबड्या होत्या. त्यासाठी त्याने आपल्या कंटेनरएवढी ट्रॅक्‍टरला ट्रॉलीसारखी जोडता येईल, कोठेही नेता येईल अशी फिरती पोल्ट्री तयार केलेली आहे. अंडी व मांस दोन्हींचे उत्पादन तो घेत होता. ग्राहकाच्या मागणीनुसार कोंबडी कापून, मांस ड्रेसिंग करुन स्वतःच्या शेतावरील दुकानात पॅकिंगमध्ये विकण्याचे कामही तो स्वतःच करत होता.

- सौर उर्जानिर्मितीचा पुरक व्यवसाय
ऑस्ट्रियातील विशेषतः फ्लॉरेसबर्ग परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या तिव्र उताराच्या दुपाखी घराच्या संपूर्ण छपरावर सौर उर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरु केले आहेत. यासाठी तेथिल शासनामार्फत त्यांना विविध प्रकारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. सौर प्रकल्पासाठी शेतकर्यांना कर्जही उपलब्ध करण्यात येत आहे. प्रकल्प उभारणी, व्यवस्थापन आदी बाबत शेतकर्यांना मार्गदर्शनही सहज उपलब्ध आहे. शेतकऱ्यांकडील अतिरिक्त विज विकत घेण्याची यंत्रणा येथिल शासनाने चांगली राबवली आहे. शेतकरी स्वतःची गरज भागवून उरलेली विज आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा शासनाला विकतात.


Friday, August 1, 2014

शेती देशोदेशीची - भाग १ - जर्मनी


ऑगस्टचा पहिला आठवडा कमी पावसाचा ?

कोकणात पावसाचा अंदाज कायम

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्टचा पहिला आठवडा कमी पावसाचा जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या आठ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प (सबड्युड) राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान खात्याच्या कमी कालावधीच्या अंदाजानुसार येत्या रविवारपर्यंत (ता.3) कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. याच वेळी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाठोपाठ मध्यम कालावधीच्या अंदाजात चार ते आठ ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हवामान अंदाजाच्या उपविभागांमध्ये महाराष्ट्राचा समावेश पेनान्सुलार इंडिया या क्षेत्रात केला जातो. नेमक्‍या याच भागात सर्वत्र आठ ऑगस्टपर्यंत पाऊस अत्यल्प (सबड्युड) राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त पश्‍चिम किनारपट्टीवर बहुतेक ठिकाणी तर हिमालयाच्या पायथ्याकडील भाग, उत्तर प्रदेश, पुर्व व लगतच्या मध्य भारतातील राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात ओडिशा व लगतच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र विरुन गेले. याच वेळी समुद्रसपाटीच्या पातळीवर दक्षिण गुजरात, कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत सक्रीय असलेल्या किनारी कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार केरळच्या किनाऱ्यापर्यंत वाढला. सौराष्ट्र व कच्छच्या भागावर समुद्रसपाटीच्या पातळीहून सुमारे 900 मिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. याच वेळी उपसागराच्या उत्तर भागातही समुद्रसपाटीच्या पातळीहून 5.8 ते 9.5 किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय झाले आहेत.
----------(समाप्त)----------- 

घाटमाथ्यावर मुसळधार कायम, इतरत्र जोर ओसरला

पुणे (प्रतिनिधी) ः पश्‍चिम घाटमाथा व लगतच्या भागात नैऋत्य मोसमी पावसाचा जोर कायम असून उर्वरीत भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणिय घट झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात माथेरान येथे 190 तर महाबळेश्‍वर येथे 180 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. राज्यात उर्वरीत ठिकाणी अधूनमधून पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः कोकण-गोवा ः माथेरान 190, वाडा 170, पनवेल 160, भिवंडी, पालघर प्रत्येकी 150, वाल्पोई, विक्रमगड, शहापूर प्रत्येकी 140, मुरबाड 130, ठाणे, अंबरनाथ प्रत्येकी 120, उल्हासनगर, कल्याण, जव्हार प्रत्येकी 110, खेड, भिरा, कर्जत प्रत्येकी 100, खालापूर, पेण, उरण, मोखाडा, मुंबई, चिपळून, तलासरी प्रत्येकी 90, मंडणगड, पोलादपूर, दापोली प्रत्येकी 80, वसई, कणकवली प्रत्येकी 70, डहाणू, सुधागड, पाली, तळा, रोहा प्रत्येकी 60, हर्णे, संगमेश्‍वर, देवरुख, गुहागर, लांजा, माणगाव, महाड प्रत्येकी 50, म्हसाळा, फोंडा, राजापूर, सांगे, अलिबाग, श्रीवर्धन प्रत्येकी 40, वैभववाडी, दोडामार्ग, सावंतवाडी, मुरुड, कोनकोन, पेडणे प्रत्येकी 30, देवगड, कुडाळ, रत्नागिरी प्रत्येकी 20

मध्य महाराष्ट्र ः महाबळेश्‍वर 180, गगनबावडा, शाहुवाडी प्रत्येकी 110, इगतपुरी 90, पौड 80, वेल्हे, भोर प्रत्येकी 70, वडगाव मावळ 60, पन्हाळा 50, नाशिक, अक्कलकुवा, जुन्नर, राधानगरी, अकोले, आजरा, पाटण प्रत्येकी 40, भुदरगड, सुरगणा, शिराळा, कळवण, राजगुरुनगर, हरसूल, आंबेगाव, वाई, सातारा, नंदूरबार, शिरपूर प्रत्येकी 30, कोल्हापूर, सांगली, चंदगड, हातकणंगले, पेठ, कोरेगाव, गडहिंग्लज, कागल, नवापूर, वाळवा, इस्लामपूर, सिंदखेडा, खंडाळा, बावडा प्रत्येकी 20

विदर्भ ः मौदा, वरोरा, मलकापूर, करंजलाड प्रत्येकी 30, नेर, पांढरकवडा, सावळी, धानोरा, देवळी, मारेगाव, यवतमाळ प्रत्येकी 20, गडचिरोली, वर्धा, मुल, बल्लाळपूर, कोर्ची, आमगाव, चार्मोशी, बाभूळगाव, उमरखेड, झारीझामनी, पातुर, भिवापूर, आरमोरी, कामठी, चांदूर रेल्वे प्रत्येकी 10

मराठवाडा ः खंदार, खुलदाबाद, कन्नड, किनवट प्रत्येकी 10
--------------------
1 Aug

मावळात मुसळधार, इतरत्र रिमझिम

पुणे (प्रतिनिधी) ः जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील मावळ पट्ट्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर कायम असून उर्वरीत भागात रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. जुन्नरपासून ते भोर-वेल्ह्यापर्यंत घाटमाथ्यालगतच्या संपूर्ण पटट्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. याउलट पुणे-नाशिक महामार्ग व पुणे-सातारा महामार्गाच्या पुर्व भागात पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे. जिल्ह्यात

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः खडकवासला 47, थेऊर 42, वाघोली 30, घोटावडे 60, माले 96, मुठे 150, पिरंगुड 72, भोर 38, भोलवडे 110, आंबावडे 77, संगमनेर 99, निगुडघर 105, वडगाव मावळ 39, लोणावळा 113, काले 73, वेल्हा 60, पानशेत 87, जुन्नर 54, नारायणगाव 34, राजुर 80, डिंगोरे 61, आपटाळे 45, ओतूर 41, वाडा 34, कुडे 75, पाईट 49, आळंदी 60, आंबेगाव 57, मंचर 32, तळेगाव 14, पाबळ 13, बारामती 8, भिगवण 4, राहु 8, सासवड 16, भिवंडी 26, जेजुरी 11, परिंचे 14
----------- 

चुकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तालयाचा लगाम

पुणे (प्रतिनिधी) ः बदली किंवा पदोन्नती होताना "सोई'चे ठिकाण मिळाले नाही म्हणून नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न होता महिनो न्‌ महिने रजेवर जाणाऱ्या चुकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना लगाम घालून शिस्तभंगाबद्दल कारवाईच्या बडग्याने वठणीवर आणनारी नवी नियमावली कृषी आयुक्तालयामार्फत नुकतिच लागू करण्यात आली आहे. यामुळे यापुढे कृषी विभागात संचालक, सहसंचालक, अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागिय कृषी अधिकारी, उपसंचालक व बीज परिक्षण अधिकारी या पदांवर काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मनमर्जीपणे रजेवर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

काही अधिकारी किरकोळ, अर्जित, वैद्यकिय कारणास्तव परावर्तीत रजा संदर्भात सक्षम प्राधिकाऱ्यांकडून रजा मंजूर करुन न घेता परस्पर स्वतःच्या सोयीनुसार अनुपस्थित राहतात आणि नंतर विलंबाने रजेचा अर्ज सादर करतात. त्याचप्रमाणे बदलीनंतर, पदोन्नतीनंतर इच्छित ठिकाणी पदस्थापना न मिळाल्यास ते पूर्वीच्या पदावरुन कार्यमुक्त होऊन पदलीचे किंवा पदोन्नतीच्या पदावर पदग्रहण अवधी समाप्त झाल्यानंतरही हजर होत नाहीत. अशा अधिकाऱ्यांना नियमानुसार वेतन किंवा रजा वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही. पदग्रहण अवधी संपल्यानंतर बुद्धिपुरस्सर अनुपस्थित राहणे हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम, 1981 नुसार गैरवर्तन आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी अधिकाऱ्यांसाठी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

कृषी आयुक्तालयामार्फत "अ' वर्ग अधिकाऱ्यांच्या विविध प्रकारच्या रजांबाबत नवीन नियमावलीनुसार कार्यवाही सुरु झाली आहे. यानुसार राज्यातील कोणत्याही "अ' वर्ग अधिकाऱ्याला किमान सात दिवस आधी आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय रजेवर जाता येणार नाही. त्याने तसे केल्यास अधिकाऱ्यांच्या या कृतीस गैरवर्तन समजून त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. विना परवानगी रजा काळाची सेवा खंडीत करणे, पुढील एक पदोन्नती, पगारवाढ रोखणे आदी प्रकारची कारवाई होणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून या पद्धतीने रजांची कार्यवाही सुरु झाली असून आस्थापना विभागामार्फत याबाबतच्या कार्यवाहीचे संनियंत्रण करण्यात येत आहे.

चौकट
- "त्यांना' कारणे दाखवा नोटीसा
कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाने राज्यातील सर्व कृषी कार्यालयांना नुकतेच एक परिपत्रक पाठवून गेल्या तीन महिन्यात बदलीच्या अथवा पदोन्नतीच्या ठिकाणी निर्धारीत वेळेत रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागवली आहे. अशा सर्व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावरुन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आस्थापना विभागाच्या सुत्रांनी दिली.
------------------------ 

कृषी पदव्यत्तर पदवी प्रवेश परिक्षेचा निकाल जाहिर

यतिश देशमुख राज्यात प्रथम

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या कृषी व संलग्न पदव्यत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षांचे निकाल नुकतेच जाहिर झाले आहेत. कृषी शाखेत यतिश विजयराव देशमुख या विद्यार्थ्याने 77 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रवेश परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमधून चारही विद्यापीठातील विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठीच्या 1325 जागा भरण्यात येणार आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील 10 प्रकारच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परिक्षा सहा जुलै ते 11 जुलै या कालावधीत 10 केंद्रांवर पार पडली. या परिक्षेसाठी 12 हजार 126 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. प्रत्यक्षात त्यापैकी 10 हजार 748 विद्यार्थी परिक्षेस उपस्थित राहीले. या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात आली होती. पाठोपाठ विद्यार्थ्यांना आपल्या गुणांच्या स्वयंपडताळणीसाठी प्रश्‍नपत्रिकेची उत्तरपत्रिकाही जाहिर करण्यात आली होती. यानुसार आता परिक्षेचा अंतिम निकाल कृषी परिषदेच्या http://mcare.org या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

* चौकट
- प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी
विद्याशाखा --- विद्यार्थी --- गुण (100 पैकी)
कृषी -- यतिश विजयराव देशमुख --- 77
उद्यानविद्या --- अर्जुन मनोहर परब --- 75
कृषी व्यवसाय व्यवस्थापन --- ओंकार विजयकुमार मुडके --- 60
वनिकी --- मिलींद दिगंबर पाटील --- 70.50
कृषी अभियांत्रिकी --- योगेश विलास देसाई --- 68.50
मत्स्यकी --- कृपेश सखाराम सावंत --- 79
कृषी जैवतंत्रज्ञान --- विशाल पांडुरंग पाटील --- 69.50
अन्न तंत्रज्ञान --- संगिता जयराम गिराम --- 77
गृह विज्ञान --- रेश्‍मा उद्धवराव माशेले --- 74
काढणी पश्‍चात व्यवस्थापन --- शितल बापू पाचर्णे --- 54
---------------------
*चौकट
- पदव्युत्तर पदवी प्रवेशाची स्थिती
विद्याशाखा --- प्रवेश क्षमता --- इच्छूक विद्यार्थी
कृषी --- 879 --- 6328
उद्यानविद्या --- 116 --- 2014
कृषी व्यवसाय व्यवस्थापन --- 125 --- 840
कृषी अभियांत्रिकी --- 67 --- 236
कृषी जैवतंत्रज्ञान --- 32 --- 573
काढणी पश्‍चात व्यवस्थापन --- 30 --- 283
मत्स्यकी --- 28 --- 16
वनिकी --- 21 --- 214
अन्न तंत्रज्ञान --- 15 --- 233
गृह विज्ञान --- 12 --- 11
-------------------
*कोट
""परिक्षा मंडळाने यंदा 100 टक्के पारदर्शकता राहून प्रवेश परिक्षेची सर्व प्रक्रीया पार पाडली आहे. आता प्रवेश परिक्षेच्या गुणांचा 70 टक्के व पदवीच्या गुणांचा 30 टक्के असा एकत्रित विचार करुन नवीन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत प्रवेशप्रक्रीया राबविण्यात येणार आहे.''
-डॉ. आर. के. रहाणे, नियंत्रक, महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परिक्षा मंडळ.
--------------------