Wednesday, July 15, 2015

आयएटी संस्थेची स्थापना

कृषी पदवीधरांमार्फत कृषी विकासासाठी
आयएटी संस्थेची स्थापना

अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील, उपाध्यक्षपदी उमाकांत दांगट

पुणे (प्रतिनिधी) - राज्यभरातील कृषी पदवीधर तंत्रज्ञांच्या पुढाकाराने आणि राज्यातील शेतीला स्थिरता प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने फक्त कृषी पदवीधरांचाच समावेश असलेली इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजिस्ट, महाराष्ट्र (आयएटी) ही संस्था नुकतीच कार्यरत झाली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे विभागिय आयुक्त उमाकांत दांगट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये १९६८ पासून इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स ही संस्था कार्यरत आहे. याच संस्थेच्या धर्तीवर गेल्या वर्षी (२०१४) आयएटी, महाराष्ट्र ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील शेतीला स्थिरता प्राप्त करुन देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असून त्यासाठी कृषी पदवीधर संघटन, कृषी प्रक्रीया, विपणन, प्रशिक्षण आदी विविध क्षेत्रात क्षेत्रात काम करण्यात येणार आहे.

संस्थेच्या संचालक मंडळाची पहिली बैठक श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच औरंगाबाद येथे पार पडली. राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांचे पदवीधर या संस्थेचे सदस्य होऊ शकतात. राज्याच्या कृषी विकासासाठी भरिव योगदान देण्याची संधी यातून कृषी पदवीधरांना उपलब्ध करण्यात येणार आहे. सभासद नोंदणीसाठी संस्थेच्या www.iatmaharashtra.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

संस्थेचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे - राधाकृष्ण विखे पाटील (अध्यक्ष), डॉ. उमाकांत दांगट (उपाध्यक्ष), डॉ. रामकृष्ण मुळे (सचिव), विजय घावटे, विनायक देशमुख (सहसचिव), डॉ. सु. ल. जाधव (खजिनदार), गोविंद हांडे (सहखजिनदार), डॉ. शंकरराव मगर, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. कृष्णा लव्हेकर, डॉ. जे. पी. महल्ले, डॉ. आप्पासाहेब भुजबळ, डॉ. पी. एन. राऊत, अरुण नरके, जयंत देशमुख, जनार्दन जाधव, अशोक लोखंडे, विनयकुमार आवटे, डॉ. भगवानराव कापसे, डॉ. मेघना केळकर, अरिफ शहा, अर्चना कडू, श्रीराम गाढवे, सोपान कांचन, संतोष डुकरे, के. एम लवांडे, किशोर राजहंस, संदिप केवटे, अंजना सोनवळकर, प्रेमचंद मांगवे (सदस्य) 

No comments:

Post a Comment