Wednesday, July 15, 2015

द्राक्ष डाळिंब महायात्रा

21 ऑगस्टपासून अॅग्रोवनची
द्राक्ष डाळिंब महायात्रा

- राज्यात प्रथमच पिकनिहाय कृषी प्रदर्शनांची मुहूर्तमेढ
- सांगली, बारामती, नाशिकमध्ये आयोजन

पुणे (प्रतिनिधी) - राज्यभरातील शेतकऱ्यांना त्यांची गरज व मागणीनुसार हवे ते सर्व काही उपलब्ध करुन देण्याचा विडा उचललेल्या दै. अॅग्रोवनमार्फत खास शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव पिकनिहाय राज्यस्तरीय कृषी प्रदशर्नाची नवी मालिका सादर करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच अभिनव उपक्रम असून त्याअंतर्गत सांगली, बारामती व नाशिकमध्ये द्राक्ष-डाळींब महायात्रा कृषी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 21 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान प्रत्येकी तीन दिवसांची ही प्रदर्शने होणार आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गरजांमध्ये मोठ्या प्रमाणात समानता असली तरी पिकनिहाय या गरजा वेगळ्या असतात. सर्वसाधारण प्रदर्शनामध्ये एखाद्या पिकाच्या लागवड पूर्व स्थितीपासून ते प्रक्रीया उत्पादनांची विक्री किंवा निर्यातीपर्यंतची इत्यंभूत माहिती मिळण्यात अनेक अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठीच्या नेहमीच्या कृषी प्रदर्शनाशिवाय शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध पिकांना वाहिलेली कृषी प्रदर्शने त्या त्या पिकाच्या बालेकिल्ल्यांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय अॅग्रोवनने घेतला आहे. या अंतर्गत द्राक्ष व डाळिंब या दोन्ही पिकांसाठीची तीन कृषी प्रदर्शने जाहिर करण्यात आली आहेत.

द्राक्ष व डाळींब पिकांचे इत्यंभूत अत्याधुनिक तंत्रज्ञान या प्रदर्शनांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असून लागवडीपासून ते निर्यातीपर्यंतच्या संपूर्ण मुल्य साखळीतील विषयांच्या मान्यवर तज्ञांशी संवाद साधण्याची संधीही या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रदर्शनाची प्रसिद्धी दै. सकाळ, अॅग्रोवन आणि साम टीव्हीवर करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील या पिकांकडे वळू पाहणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही पर्वणी साधता येणार आहे.

अॅग्रोवनच्या या कृषी प्रदर्शनांतून शेतकऱ्यांप्रमाणेच द्राक्ष व डाळींब या पिकांसाठी कार्यरत असलेल्या विविध कंपन्या, खते, औषधे, रोपे, यंत्र व अवजारे उत्पादक, वित्तपुरवठादार, निर्यातदार, सुक्ष्म सिंचन, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, संशोधन संस्था, शासनाचे विविध विभाग यांनाही यातून संबंधीत पिकांच्या जाणकार, जिज्ञासू आणि तंत्रज्ञान लगेच अमलात आणण्यासाठी इच्छूक असलेल्या लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याची संधी मिळणार आहे.

- चौकट
- प्रदर्शन स्थळ व कालावधी
सांगली - 21 ते 23 ऑगस्ट
बारामती - 28 ते 30 ऑगस्ट
नाशिक - 4 ते 6 सप्टेंबर

- चौकट
- सुवर्णसंधी सर्वांसाठी
प्रदर्शनात स्टॉल बुकिंगसाठी संपर्क - 9850569808, 8975675353 (पुणे), 9881129293 (कोकण, सांगली, कोल्हापूर, बेळगाव), 9881303883 (नाशिक), 9011030045 (औरंगाबाद), 9821973760 (मुंबई), 9881136035 (जळगाव), 8380072049 (सातारा, सोलापूर), 8888966582 (नगर), 8888718600 (नागपूर), 8586912108 (दिल्ली)
----------------------------- 

No comments:

Post a Comment