Friday, July 17, 2015

कोकणात पावसाला दमदार सुरवात

पुणे (प्रतिनिधी) - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर गुरुवारपासून कोकण व घाटमाथ्यावर पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत कोकणात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मॉन्सूनच्या अनुकूलतेत वाढ होत असल्याने हवामान खात्याने मंगळवारपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून कोकण-गोव्यात बहुताशां ठिकाणी, मध्य-महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मध्य भारतात सक्रीय असलेला कमी दाबाचा पट्टा आणि उपसागरातील चक्राकार वारे यांची सक्रीयता वाढल्याने उत्तर भारतासह देशात ठिकठिकाणी पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशात मॉन्सून सक्रीय असून पुढील चार दिवस महाराष्ट्रात विशेषतः कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असून सध्या ठिकठिकाणी सुरु असलेला पाऊस किमान येत्या मंगळवारपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत.

शुक्रवारी सकाळपर्यंत कोकण-गोव्यात बहुताशां ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाडयात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भात किमान तापमान सरासरीहून दोन ते चार अंश सेल्सिअसने उंचावलेले होते. हीच स्थिती पुढील चार दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत.

मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील गंगानगरपासून ग्वाल्हेर, जमशेदपूर, दिघा ते उपसागरापर्यंतच्या भागात सक्रीय असून त्याचा विस्तार समुद्रसपाटीच्या पातळीहून 2.1 किलोमिटरपर्यंत वाढला आहे. उपसागरच्या उत्तर भागात समुद्रसपाटीच्या पातळीहून 7.7 किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांचा विस्तार वाढला आहे. त्यात आणखी वाढ होऊन रविवारी सकाळपर्यंत उपसागराच्या उत्तर भागावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याचा अंदाज आहे.

जम्मू काश्मिरच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्यांच्या स्वरुपात पश्चिमी चक्रावात सक्रीय असून तो चिनच्या दिशेने पुढे सरकत आहे. याच वेळी अफगाणीस्तानवर सक्रीय झालेला पश्चिमी चक्कावात पाकिस्तानच्या उत्तर सिमावर्ती भागात दाखल झाला आहे. आसाम व लगतच्या भागातील चक्राकार वारे नागालॅन्ड, मनीपूर, मिझोरम व त्रिपूरा राज्यांवर सरकले असून समुद्रसपाटीच्या पातळीहून 3.1 किलोमिटर उंचीपर्यंत सक्रीय आहेत.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यातील प्रमुख ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये - कोकण - वाल्पोई ५0, कर्जत ४0, कानकोन, चिपळूण, दोडामार्ग, खेड, पोलादपूर प्रत्येकी ३0, अलिबाग, गुहागर, कणकवली, लांजा, माथेरान, म्हसळा, पेण, पेडणे, सुधागड, पाली प्रत्येकी २0, अंबरनाथ, दापोली, जव्हार, खालापूर, कुडाळ, महाड, मांडणगड, रोहा, संगमेश्वर, देवरुख, सावंतवाडी, शहापूर, तळा, वाडा प्रत्येकी १0

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ५0, गगनबावडा ३0, इगतपुरी २0, रावेर, चंदगड, हरसूल, पाटण, मुळशी, शाहूवाडी, सुरगाणा, तळोदा, वडगाव मावळ प्रत्येकी १0, घाटमाथा : शिरगाव, दावडी ६ प्रत्येकी, लोणावळा, ताम्हणी प्रत्येकी 50, अम्बोणे ४0, वळवण, डुंगेरवाडी प्रत्येकी ३0, भिरा, शिरोटा, वाणगाव, कोयना, खोपोली, खांद प्रत्येकी 20, ठाकूरवाडी, भिवपुरी प्रत्येकी 10.

विदर्भ : बुलढाणा, जोईती प्रत्येकी २0, मोहाडीफाटा १0. 

No comments:

Post a Comment