Wednesday, October 1, 2014

कृषी व संलग्न विद्याशाखा, समकक्षता - कृषी मंत्रालय खुलासा

पुणे (प्रतिनिधी) ः जमीन मशागत, पिकांची वाढ, उत्पादन, काढणी; पशु, पक्षी व माशांची पैदास, पालन व उत्पादन यांच्याशी संबंधीत व्यवसाय व माहिती क्षेत्रास कृषी व संलग्न क्षेत्र असे म्हणतात. जैवतंत्रज्ञान, अन्न प्रक्रीया, गृह विज्ञान, वनिकी व कृषी विपणन यांचा कृषी व संलग्न क्षेत्रात समावेश होत नाही. मात्र, बॅंकींग क्षेत्रात भरती करताना कृषी मंत्रालयाने निश्‍चित केलेल्या कृषी व संलग्न विद्याशाखांच्या या व्याख्येवर अवलंबून न राहता संबंधीत भरतीच्या पदांच्या कामाच्या स्वरुपाचा विचार करुन पात्रता निश्‍चित करावी, असा सल्ला केंद्रीय कृषी विभागाने "दी इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्‍शन' (आयबीपीएस) यांना दिला आहे.

कृषी व समकक्ष विद्याशाखांचा वाद बॅंकिंग वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि कृषी विद्यापीठांनी कृषी विद्यापीठांतील सर्व पदवी अभ्यासक्रम समकक्ष असल्याचे यापुर्वीच जाहिर केले आहे. मात्र काही बॅंकांनी या मुद्यावर आक्षेप घेतल्याने काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयबीपीएसने केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला कृषी व संलग्न विद्याशाखांच्या समकक्षतेबाबत खुलासा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार कृषी मंत्रालयाच्या धोरण विभागाचे अवर सचिव कमलजीत सिंग यांनी हा नुकताच खुलासा जाहिर केला आहे.

जैवतंत्रज्ञान हे नव्याने विकसीत होणारी स्वतंत्र विज्ञानशाखा आहे. अन्न प्रक्रीया ही कृषीपासून स्वतंत्र असलेली शाखा आहे. तर कृषी विपनन (ऍग्री मार्केटींग) हा कृषी विकासाचा एकात्मिक भाग आहे. जैवतंत्रज्ञान, गृह विज्ञान, अन्न प्रक्रीया व वनिकी या विद्याशाखा बॅंकिंग क्षेत्रात कृषी क्षेत्र अधिकारी (ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर) पद भरतीसाठी कृषीच्या समकक्ष पात्रता नाहीत. याउलट कृषी वनिकी व उद्यानविद्या यांचा कृषी क्षेत्र अधिकारी पदाच्या भरतीसाठी दुग्धशास्त्र, मत्स्यकी व कृषी अभियांत्रिकी या विद्याशाखांऐवजी समावेश करता येऊ शकतो, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
------------
* चौकट
- माहिती देऊन फॉलोअप घेणार
तत्पुर्वी विद्यार्थ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधीत बॅंका व संस्थांकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रथम नकार दिलेल्या काही बॅंकांनी समकक्ष विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना रुजू करुन घेतले आहे. आता कृषी मंत्रालयाने कृषी व समकक्ष विद्याशाखांबाबत स्पष्ट केलेली भुमिका कृषी अभियांत्रिकी, अन्न प्रक्रीया यासह काही विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना पसंत पडलेली नाही. या अभ्यासक्रमांची त्यातील कृषीविषयक भागासह सविस्तर माहिती व याबाबत कृषी परिषद व राज्य शासनाने घेतलेले निर्णयांची माहिती कृषी मंत्रालयाला सादर करुन विद्यापीठामार्फत याबाबत पाठपुरावा (फॉलोअप) करण्यात येणार असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुनिल वानखेडे यांनी सांगितले.
-------------
*चौकट
- असोसिएशनचा निर्णय अंतिम !
केंद्रीय कृषी मंत्रालयाने केलेली व्याख्या व स्पष्टीकरण बरोबर आहे. त्या भुमिकेत चुक नाही. कृषी मंत्रालय पदव्यांच्या समकक्षतेबाबत अभिप्राय देवू शकते. मात्र त्यांचा याबाबतचा निर्णय बंधनकारक किवा गृहित धरावाच असे नसते. कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी असा प्रश्‍न उपस्थित झाल्यास "इंडियन युनिर्व्हसिटी असोसिएशन' किंवा "इंडियन ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी असोसिएशन'चा निर्णय अंतिम मानला जातो. सध्या पदव्यांच्या समकक्षतेबाबत आक्षेप असतील तर एसोसिएशनकडे बाजू मांडून निर्णय होणे योग्य ठरेल, अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांनी दिली.
------------- 

1 comment:

  1. आपण आर्थिक अडचण माध्यमातून होणार आहेत तर किंवा आपण कोणत्याही आर्थिक गोंधळ आहेत अशा आर्थिक help.So म्हणून मदत करते, ख्रिश्चन संघटना गरजा लोकांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आहेत, आणि आपण निधी, आपल्या स्वत: च्या व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे आपण आर्थिक शोधत आहात कोणत्याही प्रकारची मदत? आम्ही एक खाजगी कर्ज टणक आर्थिक मदत इच्छा त्या सर्वांना निधी / कर्ज सर्व प्रकारच्या उपलब्ध आहेत. किंवा आपण adamsjohnloanfirm@hotmail.com बायबल "" म्हणतो Luke 11:10 जो कोणी विचारतो प्राप्त, ते हार्ड स्थानिक बँकांकडून राजधानी कर्ज प्राप्त करण्यासाठी शोधत आहेत; जो शोधतो; आणि दार वाजवतो होता त्याचे व्हावे, दार उघडले जाईल "म्हणून त्यांना मदत करण्यासाठी येथे होणार येशू काल, आज आणि अनंतकाळ more.Please या गंभीर मनाचे आणि देवाचे भय बाळगणारा लोक आहे कारण या संधी करून आपण पास करू नका, help.Email गरज कोण आहेत adamsjohnloanfirm@hotmail.com

    ReplyDelete