Monday, May 5, 2014

पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

पुणे (ऍग्रोवन) ः भारतीय हवामानशास्त्र विभागाने पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात रविवारी सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या दोन्ही विभागांमध्ये अनेक ठिकाणी दुपारनंतर गडगडाटी ढग तयार होण्याची शक्‍यता आहे. राज्यात उर्वरीत ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात समुद्रसपाटीपासून 900 मिटर उंचीवर हवेच्या प्रवाहांमध्ये अनियमितता (विंड डिस्कन्टिन्युटी) आहे. यामुळे या भागासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बाष्पयुक्त ढगांचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः दुपारनंतर ढगांचे प्रमाण वाढून तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजा व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. उर्वरीत राज्यात हवामान मुख्यतः कोरडे होते.

शुक्रवारी सकाळपर्यंत कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे 42.7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

राज्यातील प्रमुख ठिकाणी शुक्रवारी (ता.25) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 36.5, अलिबाग 32.2, रत्नागिरी 33.4, पणजी 34.9, डहाणू 34.9, पुणे 38.9, नगर 40, जळगाव 42.3, कोल्हापूर 38.5, महाबळेश्‍वर 32.7, मालेगाव 41.3, नाशिक 39.4, सांगली 38.4, सातारा 39.6, सोलापूर 41.5, उस्मानाबाद 38.9, औरंगाबाद 39, परभणी 38.8, नांदेड 39, बीड 37.6, अकोला 42.1, अमरावती 39.6, बुलडाणा 39.5, ब्रम्हपुरी 42.7, चंद्रपूर 40.8, गोंदिया 40.3, नागपूर 41, वाशिम 39, वर्धा 41.9, यवतमाळ 40
-----------(समाप्त)----------- 

No comments:

Post a Comment