Tuesday, September 16, 2014

अतिवृष्टी नुकसानीपोटी संगमनेरला भरपाई मंजूर



पुणे (प्रतिनिधी) ः संगमनेर (नगर) तालुक्‍यात 25 ऑगस्ट 2014 रोजी अतिवृष्टीने सायंकाळी साडे सात ते रात्री 10 दरम्यान झालेल्या नुकसानीला विशेष बाब म्हणून मदत मंजूर झाली आहे. नुकसानग्रस्त घरे, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक, शेतपीके, जमीनी व मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्ती, जनावरांच्या वारसांना ही मदत देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने जुन व जुलै 2013 मधील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या आपत्तीग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्यासाठी लागू केलेल्या 14 ऑगस्ट 2013 च्या शासन आदेशातील तरतूदीनुसार कृषी विभागामार्फत ही मदत देण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने जाहिर केले आहे. नुकसानग्रस्त शेतीपिकांना जास्तीत जास्त दोन हेक्‍टरसाठी मदत देण्यात येणार आहे. ही मदत नुकसानग्रस्तांच्या बचत खात्यात थेट जमा केली जाईल. ही मदत योग्य पात्र व्यक्तींनाच दिली जाईल, याची खबरदारी घेण्याची जबाबदारीही कृषी विभागावरच राहणार आहे. महसूल व वन विभागामार्फत मदतीसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

*अशी आहे मदतीची मर्यादा
मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्ती - प्रति व्यक्ती 2.50 लाख रुपये
मृत्यूमुखी मोठे जनावर - 25 हजार रुपये (कमाल एका जनावरासाठी)
मृत्यूमुखी पडलेले लहान जनावर - 5 हजार रुपये (कमाल एका जनावरासाठी)
पूर्ण उध्वस्त पक्के घर - 70 हजार रुपये
पूर्ण उध्वस्त कच्चे घर - 25 हजार रुपये
अंशतः उध्वस्त घर - 15 हजार रुपये
दुकानदार - 10 हजार रुपयांपर्यंत
टपरीधारक - 5 हजार रुपयांपर्यंत
हातगाडीधारक - दोन हजार 500 रुपयांपर्यंत
50 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झालेली शेतीपिके - धान ः 7 हजार 500 रुपये (प्रति हेक्‍टर), इतर पिके ः 5 हजार रुपये (प्रति हेक्‍टर)
खरडून गेलेली जमीन - 20 हजार रुपये (रोख स्वरुपात)
वाहून गेलेली जमीन - 25 हजार रुपये (रोख स्वरुपात)
-------------- 

No comments:

Post a Comment