Monday, September 1, 2014

माॅन्सून अंदाज, पाऊस - ३० आॅगस्ट


पुणे (प्रतिनिधी) ः कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात बहुतेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. देवगड येथे सर्वाधिक 210 मिलीमिटर पाऊस कोसळला. रविवारी (ता.31) पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्‍यता असून हवामान खात्याने कोकणात तुरळक ठिकाणी मुसधार पाऊस ते अतिवृष्टीचा तर उर्वरीत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कोकण किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा कायम आहे. याच वेळी उपसागरावरील जास्त तिव्रतेचे कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाच्या दिशेने चाल करत छत्तिसगडच्या दक्षिण भागावर दाखल झाले आहे. यामुळे राज्यातील पावसाची अनुकूलता अधिक वाढली असून ठिकठिकाणी जोरदार जलधारा कोसळत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात सर्वदूर पाऊस झाला. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

दरम्यान, शनिवारी उपसागरावरील जास्त तिव्रतेचे कमी दाबाचे क्षेत्र छत्तिसगडच्या दक्षिण भागावर दाखल झाले. या क्षेत्राशी संलग्न चक्राकार वारे समुद्रसपाटीच्या पातळीहून 7.6 किलोमिटर उंचीपर्यंत सक्रीय आहेत. मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भाग व त्यालगतचा राजस्थानच्या पूर्व भागावर सक्रीय असलेले चक्राकार वारे मॉन्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्यात विलीन झाले. अरबी समुद्रालगतचा किनारी कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणापासून केरळ पर्यंत सौम्य स्वरुपात सक्रीय आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा बारमेर, उदयपूर ते थेट छत्तिसगडवर सक्रीय असलेल्या जास्त तिव्रतेच्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रापर्यंत आणि तेथून पुढे उपसागरापर्यंत सक्रीय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीच्या पातळीहून 3.1 किलोमिटर उंचीपर्यंत वाढला आहे.

छत्तिसगडवरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे रविवारी विदर्भात सर्वदूर पाऊस व तुरळक ठिकाणी जोदार पाऊस पडण्याचा इशारा नागपूर वेधशाळेने दिला आहे. किनारी कमी दाबाच्या पट्ट्या प्रभावामुळे कोकणात मुसधार पाऊस पडण्याचा इशारा मुंबईतील कुलाबा वेधशाळेने दिला आहे. या दोन्ही हवामान स्थितीच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्‍यता आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

शनिवारी (ता.30) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
कोकण-गोवा ः पणजी 230, देवगड 210, मार्मागोवा 190, दाबोलीम 160, पेरनेम 150, मालवण, कानकोन 140, सांगे 130, फोंडा 110, मापुसा, विक्रमगड प्रत्येकी 100, दोडामार्ग 90, सावंतवाडी, वेंगुर्ला प्रत्येकी 70, वाल्पोई 60, केपे, कुडाळ, खालापूर प्रत्येकी 50, राजापूर, पोलादपूर प्रत्येकी 40, रत्नागिरी, कणकवली, कर्जत प्रत्येकी 30, वाडा, पनवेल, मोखाडा, शहापूर, पेण, खेड, तलासरी, चिपळूण प्रत्येकी 20, लांजा, दापोली, तळा, सुधागड, गुहागर, जव्हार, अंबरनाथ, रोहा, मंडणगड, संगमेश्‍वर, देवरुख, अलिबाग, मुरुड, महाड प्रत्येकी 10

मध्य महाराष्ट्र ः ओझरखेड 70, सोलापूर, दिंडोरी, मोहोळ, नाशिक प्रत्येकी 50, पुणे, अक्कलकोट, पंढरपूर, जत प्रत्येकी 40, दहिवडी, सातारा, मंगळवेढा, फलटण, कोरेगाव, खटाव, वडूज, गगनबावडा, भोर प्रत्येकी 30, सांगोला, दौंड, हरसूल, अकोले, श्रीगोंदा, पुणे शहर, वेल्हे, माळशिरस, पौंड, मुळशी, घोडेगाव, हातकणंगले, पारोळा, तासगाव, शिरुर, विटा, राजगुरुनगर, कर्जत, सासवड प्रत्येकी 20, इंदापूर, संगमनेर, बारामती, चांदवड, राहुरी, इगतपुरी, जुन्नर, मेढा, खंडाळा बावडा, नेवासा, शाहुवाडी, नवापूर, करमाळा, कागल, अमळनेर, अक्कलकुवा, जळगाव, वाळवा, इस्लामपूर, रावेर, सांगली, गडहिंग्लज, सिन्नर, कराड, मुक्ताईनगर, शहादा प्रत्येकी 10

मराठवाडा ः उदगीर 80, चाकूर 70, उमरगा 60, तुळजापूर, निलंगा प्रत्येकी 50, लोहारा, रेणापूर, अंबेजोगाई प्रत्येकी 40, लातूर, अहमदपूर, किनवट, बीड प्रत्येकी 30, बिल्लोली, कंधार, धारुर, नांदेड, देगलूर, भोकरदन, पातोडा, भोकर प्रत्येकी 20, उमरी, जाफराबाद, मंजलेगाव, कळमनुरी, पालम, आष्टी, कळंब प्रत्येकी 10

विदर्भ ः कोपर्णा, जोईती प्रत्येकी 70, महागाव, राजुरा प्रत्येकी 40, झरीझामनी, चंद्रपूर प्रत्येकी 30, नांदुरा, आर्वी, गोंडपिंपरी, खामगाव, यवतमाळ, सिरोंचा, चिखली, अरणी, उमरखेड प्रत्येकी 20, मोताळा, नारखेड, भातकुली, भामरागड, बल्लारपूर, मोर्शी, धामणगाव, धारणी, नांदगावकाझी, बुलडाणा, समुद्रपूर, सावनेर, एटापल्ली, चार्मोशी, चांदूर बाजार प्रत्येकी 10
------------------- 

No comments:

Post a Comment