Tuesday, September 16, 2014

कोरडवाहू क्षेत्र विकास - २५ कोटीचे अनुदान वाटप सुरु

पुणे (प्रतिनिधी) ः केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्‍वत शाश्‍वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी पहिल्या हप्क्‍याचे 25 कोटी रुपये कृषी विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. अनुसुचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील विविध घटकांना यातून कोरडवाहू क्षेत्र विकासासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

चालू वर्षी (2014-15) कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यासाठी 48 कोटी 19 लाख 55 हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने यापुर्वीच प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. केंद्राने या कार्यक्रमाच्या पहिल्या हप्त्यापोटी 25 कोटी रुपये निधी वितरीत केलेला आहे. यामध्ये अनुसुचित जमातीसाठी दोन कोटी रुपये, अनुसुचित जातीसाठी चार कोटी रुपये आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 19 कोटी रुपये एवढ्या रकमेचा समावेश आहे.

मंजूर निधीपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे 19 कोटी रुपये अनुदान वितरीत करण्यास राज्य शासनाने यापुर्वीच मान्यता दिली आहे. आता अनुसुचीत जातीसाठीचे चार कोटी रुपये व अनुसुचित जमातीसाठीचे दोन कोटी रुपये असे एकूण सहा कोटी रुपयांच्या कार्यक्रमा राज्य शासनामार्फत वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालकांमार्फत हा सर्व निधी खर्च करण्यात येणार आहे.
-------------------- 

No comments:

Post a Comment