Wednesday, April 8, 2015

24 एप्रिलला मुख्यमंत्र्यांची पीपीपी बैठक

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कृषी विषयक प्रकल्पांची आढावा बैठक येत्या 24 एप्रिलला मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या बैठकीचे आयोजन केले असून त्यात पीपीपी विषयी महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेज बळकटीकरणाच्या दृष्टीने कडधान्य व इतर पिकांमध्ये पीपीपी प्रकल्प राबविण्यात येत आहे. केंद्राने चालू वर्षापासून राज्याच्या देण्यात येणाऱ्या निधीत कपात करण्याचा निर्णय घेतल्याने पीपीपी प्रकल्पांवर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत सध्या या बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील पीपीपी प्रकल्पांचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे.
---------- 

No comments:

Post a Comment