Friday, April 10, 2015

राज्यभर पूर्वमोसमीचा तडाखा

गारपीटीचा इशारा कायम, आज-उद्या सर्वाधिक शक्‍यता

*चौकट
ृ- सोमवारपर्यंत गारपिटीचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात येत्या सोमवारपर्यंत (ता.13) गारपीटीची चिन्हे आहेत. शनिवारपाठोपाठ रविवारीही (ता.12) विदर्भ व मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह गारांच्या पावसाचा आणि मध्य महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोठेही वादळी पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेली नाही.

पुणे (प्रतिनिधी) ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भासाठी वादळी वारे, पाऊस व गारपीटीच्या दृष्टीने आजचा दिवस धोक्‍याचा आहे. या तिनही विभागात काही ठिकाणी गारांचा पाऊस होण्याचा हवामान खात्याचा इशारा कायम आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे या भागात आकाश ढगाळलेले असून पावसाचे सावट आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीट झाली. नांदेडमध्ये गारांचा पडून फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान साली. नगर जिल्ह्यात कर्जत जामखेड पट्ट्यातही सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात दोन ते पाच अंश सेल्सिअसने घसरण झाली. राज्यात बहुतेक ठिकाणी आकाश ढगाळलेले होते.

उत्तर कोकण व लगतच्या गुजरातच्या भागावर हवेच्या वरच्या थरात सक्रीय असलेले चक्राकार वारे आता गुजरातच्या भागात सक्रीय असून त्यांचा विस्तार समुद्रसपाटीच्या पातळीपासून तीन किलोमिटर उंचीपर्यंत वाढला आहे. याच वेळी मध्य प्रदेश व त्यालगतच्या महाराष्ट्रात समुद्रसपाटीच्या पातळीहून दीड किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रीय झाले आहेत. तेलंगणा, कर्नाटक ते केरळपर्यंतच्या भागात हवेच्या कमी दाबाचा विस्कळीत पट्ट्याची तिव्रता कमी झाली आहे.दक्षिण अरबी समुद्र व अंदमानच्या समुद्रात ढगांची दाटी झालेली आहे. या भागातून राज्यांतर्गत भागात बाष्पयुक्त ढगांची वाटचाल सुरु आहे.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात पडलेला पाऊस (मिलीमिटरमध्ये) ः कोकण - मंडणगड 1,
मध्य महाराष्ट्र ः नारी 38, सुर्डी 16, खांदवी 14 (सोलापूर), नागठाणे 2, पाटण 12, चाफळ 15, वाठार 13, कुमठे 10 (सातारा), जत 5, मुचुंडी 10, शिराळा 25, मांगले 22, सागाव 48, चरण 15, हातकणंगले 20 (सांगली), शाहूवाडी 18, सारुड 72 (कोल्हापूर)

मराठवाडा ः पिंपळनेर 36, टाकळशिंग 12, निटरुड 22, घाटंदूर 10, उसुफ 15 (बीड), किल्लारी 11, बेलकुंड 11, पानचिंचोली 20, नितूर 42, कासारबाळकुंडा 33, कासारशिरसी 69 (लातूर), उस्मानाबाद 77, पाडोळी 13, काशेगाव 23, ढोकी 40, जगाजी 30, तुळजापूर 13, मंगरुळ 20, भूम 15, नारंगवाडी 12, लोहारा 14, तेरखेडा 17 (उस्मानाबाद), नांदेड 27, वजिराबाद 24, तुप्पा 30, वसरानी 32, विष्णूपुरी 64, लिंबगाव 60, तारोडा 12, किनवट 11, मुदखेड 10, दाभाड 15 (नांदेड), परभणी 5, गंगाखेड 41, मखनी 20 (परभणी), हिंगोली 9, शिरसाम 14, औंढा 39, जवळा 23, सेनगाव 3 (हिंगोली)

विदर्भ ः देऊळगावराजा 6, मेहकर 4 (बुलडाणा), नागपूर 10, बोरी 17, सोनगाव 25, कामठी 26.2, दिघोरी 12, देवळापूर 18, मौदा 21, सावनेर 16, बडेगाव 26, पाचगाव 15 (नागपूर), भंडारा 15, धारगाव 18, बेला 14, बहेला 22, खामरी 15, केंद्री 23.2, मोहाडी 9, तुमसर 10, अकोडी 12, लाखनी 18, पाळंदूर 18.2, पिंपळगाव 10 (भंडारा), गोंदिया 7.2, आमगाव 8.3, पारसवाडा 14 (गोंदिया)
--------(समाप्त)--------- 

No comments:

Post a Comment