Wednesday, April 8, 2015

फार्म इनोव्हेशन्स in North India

गरजेला दिलाय नवनिर्मितीने आधार 

नवी दिल्ली ः एखाद्या गोष्टीत गरजेनुसार छोटे छोटे बदल केले तर अत्यंत कमी खर्चाच मोठी कामे करण्याची साधीसोपी साधणे तयार होतात. दिल्ली परिसरातील सर्वसामान्य माणसांनी आपल्या दैनंदिन समस्यांना स्वतःच साध्या सोप्या सुधारणांनी, निर्मितीने जुगाड जुळवून उत्तर शोधले आहे. उपलब्ध साधणांमध्ये बदल करुन, कल्पकतेने जोडणी करुन किंवा पूर्णतः नवीन रचना करुन अत्यंत कमी खर्चात, कमी श्रमात रोजचे जगणे सोपे करणाऱ्या काही फार्म इनोव्हेशन्सची ही झलक... 
----------- 
छायाचित्रे - संतोष डुकरे 
----------- 



आझादपूर मार्केट, नवी दिल्ली - पाठीवर पोतं वाहून नेताना ते खाली सरकू नये आणि पोत्याचा भार खांद्यांनी पेलता यावा म्हणून इथल्या हमालांनी हे असे जॅकेट तयार केले आहे. पाठीवरल्या सॅगप्रमाणे दोन्ही खांद्यावर बेल्ट आणि कमरेजवळ आडवा लाकडाचा तुकडा. यामुळे गोणींची वाहणे अधिक सोपे झाले आहे.


गाजीपूर, दिल्ली ः हातगाडी पेक्षा गतीमान आणि इतर लहान मालवाहू वाहनांपेक्षा नगण्य खर्चिक असा हा मालवाहू सायकलीचा फंडा इथल्या लोकांनी विकसित केलाय. सायकलीचे हे आगळे वेगळे मॉडिफिकेशन उत्तर भारतात स्थानिक ठिकाणी शेतमाल वाहतूकीसाठी वेगाने लोकप्रिय होत आहे. 
----------- 



गाजीपूर, दिल्ली ः मालवाहू सायकलीचा हा पुढचा अवतार. यात सायकलप्रमाणे पॅडल मारावे लागत नाहीत. यासाठी जुन्या मोटरसायकल किंवा स्कुटरचे इंजिन सायकलच्या चासीला फिट करतात. पेट्रोल, रॉकेलवर चालतात. कोणत्याही प्रकारचे परवाने यासाठी लागत नाहीत. अशा प्रकारचे मॉडिफिकेशन करणारे खास मॅकॅनिक या भागात तयार झाले आहेत. 
------------- 

गाझियाबाद, उत्तर प्रदेश ः दिल्ली लगतच्या भागात या अशा फिरत्या रसवंती सर्रास दिसतात. एका लोखंडी सांगाड्यावर पाणी उपसायला वापरले जाते तसे इंजिन बसवतात. हे इंजिन रसवंती फिरविण्यासाठी व एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी अशा दुहेरी कामासाठी वापरले जाते. हे असे जुगाड करुन देणारे काही ठरावीक कारागिर आहेत. 
-------------- 

दिल्ली ः इथल्या सिमावर्ती भागात हे जुगाड प्रसिद्ध आहे. विहीरीवर पाणी उपसा करण्यासाठी वापरले जाणारे डिझेल इंजिन एखाद्या जुन्या टेम्पोच्या किंवा जीपच्या सांगाड्यावर चढवून ही मालगाडी तयार केली जाते. तिची कुठेही नोंदणी वगैरे होत नाही. मात्र स्थानिक ठिकाणी अतिशय कमी खर्चात वाहतूक करण्यासाठी ते वापरले जाते. या जुगाडांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 



------------ 

No comments:

Post a Comment